श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य
श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य
योगी श्रीअरविंद यांचे प्रामुख्याने इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्यांनी थोडे लेखन बंगाली व संस्कृत या भाषांमध्येही केले आहे. त्यांच्या साहित्याची अनेक भारतीय व परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. मराठी भाषेमध्येही असे प्रयत्न सुमारे १९५० सालापासून सुरू आहेत. त्यामध्ये सेनापती पां.म.बापट, भा.द.लिमये आणि विमल भिडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रयत्नामधून मराठीमध्ये काही पुस्तकांची निर्मिती झाली आहे.
त्याचप्रमाणे द.गं.पाळंदे, डॉ.ग.ना.जोशी, सदानंद सुंठणकर, नृसिंहाग्रज, प्रा.शिवाजीराव भोसले इत्यादी लेखकांनी श्रीअरविंद विचार मराठीत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
संजीवन या त्रैमासिकातून आणि अभीप्सा या मासिकामधूनही श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या तत्त्वज्ञानाचा व पूर्णयोगाशी संबंधित साहित्याचा, वाङ्मयाचा अनुवाद करण्यात येत असतो.
'श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य' यामध्ये सदर विषयाशी संबंधित मराठीतील बहुतांशी सर्व संदर्भ-साहित्य एकत्रितपणे उपलब्ध आहे.