प्रेमा नंदकुमार
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डॉ. प्रेमा नंदकुमार
(जन्म - १९३९, तिरुची.)
या 'श्रीअरविंद साहित्या'च्या अभ्यासक आहेत. त्या लेखिका, समीक्षक, अनुवादक आहेत.
वारसा
[संपादन]डॉ. प्रेमा नंदकुमार या श्रीअरविंदांचे पहिले चरित्रकार श्रीनिवास अय्यंगार यांच्या कन्या आहेत.
संशोधन कार्य
[संपादन]डॉ. प्रेमा नंदकुमार यांनी १९६१ मध्ये, श्रीअरविंदांच्या सावित्री या महाकाव्यावर पीएच.डी.साठी संशोधन केले. 'अ स्टडी ऑफ सावित्री' हे त्यांच्या प्रबंधाचे नाव आहे. सावित्रीवर शैक्षणिक संशोधन या स्वरूपाचा असा हा पहिला प्रबंध होता. डॉक्टरेटच्या प्रबंधानंतर डॉ. नंदकुमार यांनी दांते आणि श्रीअरविंद यांची तुलना करणारे पोस्ट-डॉक्टरेट संशोधन कार्य केले.
लेखन आणि व्याख्याने
[संपादन]डॉ. नंदकुमार या श्रीअरबिंदोज अक्शन, मदर इंडिया, द अडव्हेंट आणि द कॉल बियॉन्ड यांसहित आश्रमाशी संबंधित अनेक जर्नल्समध्ये वारंवार योगदान देतात. त्या तेलगु भाषेमध्ये व्याख्याने देतात.[१] तमिळ आणि इंग्रजी भाषेमध्ये त्या लेखन करतात. त्यांनी तमिळ आणि इंग्लिश भाषेत एकूण २५ ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यामध्ये सुब्रह्मण्यम भारती, स्वामी विवेकानंद, आदि शंकराचार्य, श्री मध्व, द मदर, द मदर ऑफ श्रीऑरोबिंदो आश्रम, सिस्टर निवेदिता अँड श्रीअरबिंदो, कुमुदिनी, टी.व्ही.कपालीशास्त्री इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे.[२]
पुस्तकांचा तपशील
[संपादन]०१) अ स्टडी ऑफ सावित्री, प्रथम आवृत्ती - श्रीअरविंद आश्रम, १९६२
०२) श्रीऑरोबिंदो - अ ब्रिफ बायोग्राफी, मिनिस्ट्री ऑफ इन्फोर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, भारत सरकार, १९७२
०३) श्रीऑरोबिंदो - अ क्रिटीकल इंट्रोडक्शन, ओरिएन्तल युनिव्हर्सिटी प्रेस, लंडन, १९८८
०४) भारती - मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर, साहित्य अकादमी, दिल्ली, १९८९,
०५) कुमुदिनी, मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर, साहित्य अकादमी, दिल्ली, २००८, ISBN: 9798126024390
०६) द मदर ऑफ श्रीऑरोबिंदो आश्रम, नॅशनल बुक ट्रस्ट, २०१२, (श्रीमाताजी यांचे चरित्र)
०७) पोएम्स ऑफ सुब्रह्मण्यम भारती, साहित्य अकादमी, दिल्ली - सुब्रह्मण्यम भारती यांचे लिखाण या पुस्तकाच्या निमित्ताने प्रथमच इंग्लिश भाषेत अनुवादित झाले. त्यानंतर त्यांच्या अन्य साहित्याचे भाषांतर करण्यासाठी युनेस्कोतर्फे डॉ.प्रेमा नंदकुमार यांना विनंती करण्यात आली.[१]
अन्य कार्य
[संपादन]- डॉ. नंदकुमार, तीस वर्षांहून अधिक काळ श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या लेखनावर कार्यशाळा देत असतात.
- त्या अनुवादक म्हणून कार्यरत आहेत.
- सुब्रह्मण्यम भारती यांच्या साहित्याचा अनुवाद त्यांनी केला आहे.
- 'मणिमेकलई' या प्राचीन बौद्ध तमिळ महाकाव्याचा अनुवादही त्यांनी केला आहे.[३]
- त्या समीक्षक म्हणून देखील कार्यरत आहेत.
पुरस्कार
[संपादन]- भारतीय साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना श्रीअरविंद पुरस्कार, पंडित रत्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत. [४]
- जानेवारी २०१३ मध्ये त्यांना तमिळ साहित्यातील योगदानासाठी 'द तमिळ थेन्द्रल थिरू वि.का. अवार्ड' (The Thamizh Thendral Thiru. Vi. Ka. Award) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. [५]
बाह्य दुवे
[संपादन]डॉ.प्रेमा नंदकुमार यांची मुलाखत (इंग्रजी)