Jump to content

धर्म (नियतकालिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'धर्म' हे एक बंगाली साप्ताहिक होते. कलकत्ता येथून ते प्रकाशित होत असे.

साप्ताहिक धर्म (बंगाली)

प्रारंभ आणि अखेर

[संपादन]

प्रारंभ - दि. २३ ऑगस्ट १९०९

अखेर - दि. २८ मार्च १९१०[]

कार्यालय

[संपादन]

०४, श्याम पुकुर लेन, कलकत्ता येथून हे साप्ताहिक प्रकाशित होत असे. []

संस्थापक

[संपादन]

योगी श्री अरविंद घोष हे या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते.[]

सह -संपादक

[संपादन]

श्री. नोलिनी कांत गुप्ता हे सन १९०९-१९१० या काळात या साप्ताहिकाचे सह-संपादक होते.[]

पार्श्वभूमी

[संपादन]

श्रीअरविंद जेव्हा मे १९०९ मध्ये कारावासातून बाहेर पडले तेव्हा त्यांना देशाच्या राजकीय स्थितीमध्ये पूर्णतः पालट झालेला आढळला. बरेचसे राजकीय पुढारी हे कारावासात तरी होते किंवा काही जण स्वतःहून स्वीकारलेल्या विजनवासामध्ये गेले होते. राष्ट्रप्रेमाची भावना ही अगदी पूर्णतः नाहीशी झालेली नसली तरी, सर्वसाधारणपणे एक अनुत्साह आणि उदासीनता होती; आणि राष्ट्रप्रेमाची भावना आत्ता केवळ दबली गेली आहे आणि त्या दमनातूनच ती अधिक उफाळून येत आहे असेही त्यांना जाणवले.

श्री अरविंदांनी इंग्रजी सत्तेविरुद्धचा संघर्ष चालूच ठेवायचा असे ठरविले. त्या कृति-कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून त्यांनी इंग्रजी व बंगाली भाषेमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे दोन साप्ताहिके काढली. एक 'कर्मयोगिन्' आणि दुसरे 'धर्म', त्या दोन्हींचेही वितरण बऱ्यापैकी चांगले होते आणि ही दोन्ही साप्ताहिके स्वयंपूर्ण होती.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c Life of Sri Aurobindo by A.B.Purani
  2. ^ "The Incarnate Word". incarnateword.in. 2023-10-28 रोजी पाहिले.
  3. ^ Nolini_Kanta_Gupta. "en.wikipedia.org".
  4. ^ Sri Aurobindo (2006). Collected Works of Sri Aurobindo, Vol 36. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.