सदस्य चर्चा:Ketaki Modak

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत Ketaki Modak, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Ketaki Modak, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८१,९१९ लेख आहे व १८३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

श्री.के. क्षीरसागर[संपादन]

नमस्कार,

श्री.के. क्षीरसागर हा लेख आहे. नवीन प्रा. श्री.के. क्षीरसागर नावाने लेख बनवण्यापेक्षा आहे त्या लेखात आपणास भर घालता येईल.

एक खुलासा- विकिपीडियावर व्यक्तिविषयक लेख पूर्ण नावाने ठेवण्याचा किंवा नवीन तयार करण्याचा संकेत आहे नावच्या आधी संबोधने जोडली जात नाहीत जसे की प्रा., डॉ., संबोधनाच्या नावाने पुनर्निर्देशने देता येतात.

-संतोष दहिवळ १५:१३, १६ जानेवारी २०१२ (UTC)

नमस्कार आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. योग्य ती कालजी घेईन.

नमस्कार केतकी ! किरण नगरकर या लेखात विकिकरणाच्या दृष्टीने व संदर्भ देण्याच्या दृष्टीने मी काही किरकोळ सुधारणा केल्या आहेत. येथे त्यांतील फरक थोडक्यात दाखवला आहे. कृपया एकवार तिकडे नजर टाकावी, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:०१, १७ जानेवारी २०१२ (UTC)

कॉपीपेस्ट व प्रताधिकारभंग[संपादन]

नमस्कार केतकी !

लोकसत्तेत प्रकाशित झालेल्या या बातमीचा/सदराचा मजकूर] तंतोतंत कॉपी करून श्रीधर व्यंकटेश केतकर या लेखात एका विभागात पेस्ट केल्याचे आढळल्यामुळे मी साचा:कॉपीपेस्ट लावला आहे. विकिपीडिया:प्रताधिकार धोरणांनुसार विकिपीडियावर लिहिली जाणारी माहिती प्रताधिकारमुक्त (कॉपीराइट-फ्री) असावी लागते अथवा संबंधित संस्थांकडून सार्वजनिक वापरासाठी खुली केली गेल्याचा अधिकृत जाहीरनामा लागतो. तसे नसल्यास असा कॉपीपेस्ट मजकूर प्रताधिकारभंगाचा मासला धरला जाऊ शकतो.

विकिपीडियावरापण आपल्या स्वतःच्या लेखणीने माहिती लिहिणे अभिप्रेत आहे. तुम्ही एखाद्या वृत्तपत्रात/पुस्तकात/नियतकालिकात जे काही वाचले असेल, ते तुम्ही तुमच्या भाषेत मांडून लिहू शकता. किंबहुना तसेच करणे श्रेयस्कर.

तुमच्या उत्साही सहभागाचे कौतुक आहेच; मात्र ही काही पथ्ये जरूर पाळावीत.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:१३, १७ जानेवारी २०१२ (UTC)

धन्यवाद केतकी. तुम्ही संपादलेल्या मजकुरात श्री.के. क्षीरसागरांची व्यक्तिगत टिप्पणी बरीच शिल्लक होती; त्यामुळे त्यांच्या टिप्पण्यांचा सारांश काढून तो श्रीधर व्यंकटेश केतकर येथे दोनेक वाक्यांत नोंदला आहे. तसेच त्या दोन ठिकाणी क्षीरसागरांच्या लोकसत्तेतल्या पुनर्प्रकाशित लेखाचे दुवेही दिले आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल अन्य विद्वान समीक्षकांनी नोंदलेली मते संक्षेपाने व सारांशाने लिहिण्याच्या संकेतास धरून हे बदल केले आहेत. शिवाय केतकरांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दलची (शिक्षण वगैरे) माहिती एक नवीन उपविभाग बनवून भरली आहे. या सर्वांत तुम्हांला अजून काही भर घालता आली/संपादन करता आले, तर उत्तमच!
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०३:००, २१ जानेवारी २०१२ (UTC)

धन्यवाद संकल्प द्रविड, आपण केलेले संपादन मी बघितले. आणि त्यामुळे मला नेमके विकिपीडिया मध्ये कसे संपादन केले जाते ते कळले. यापुढे मी निश्चितच हे लक्षात ठेवीन. आपण मराठीसाठी हे जे कार्य करीत आहात त्यसाठी शुभेच्छा.

सुधा मूर्ती[संपादन]

तुम्हाला बहुधा सुधा मूर्ती या लेखात भर घालायची आहे असे वाटते. इंग्रजी शीर्षकाचे लेख सहसा मराठी लिहित नाहीत. - कोल्हापुरी २२:०४, ६ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]


नमस्कार केतकी,

आपण मराठी विकिपीडियावर देत असलेले योगदान उत्तम आहे. आपण सुधा मूर्ती याचेवर बनवलेल्या लेखाच्या निमित्याने आपणास काही सूचना देत आहे. आशा आहे कि यामुळे भविष्यात आपणास लेख बनवणे अधिक सोपे पडेल.

  1. मराठी विकिपिडीयावर लेख नाव हे मराठीतच आणि देवनागरी लिपीतच असावे असा संकेत आहे.
  2. त्यामुळे रोमन लेख नावे देण्याचे टाळावे.
  3. लेख लिहिण्या पूर्वी शोध यंत्रात जर संबंधित माहिती देऊन तपासले तर तशा आशयाचा लेख अगोदरच उपलब्द्ध आहेका ते दिसते. ह्या मुळे एकाच तर्हेचे दोन लेख तयार होण्याच्या धोक्या पासून वाचता येते.

आपल्या पुढील संपादन कार्यास अनेक अनेक शुभेच्छा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०९:५१, ७ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

"मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन[संपादन]

सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.

नमस्कार Ketaki Modak, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

वर्गीकरण व विकिकरण[संपादन]

एखाद्या लेखात वरील साचे लावल्यावर कोणास त्रास देण्याचा विचार किंवा कोणाची त्रुटी दाखविण्याचा विचार त्यामागे नसतो हे कृपया ध्यानात घ्यावे.विकिवर अनेक लेख लिहिण्यात येतात. त्या लेखांचे योग्य नियोजन व्हावे व ते योग्य वर्गात असावेत म्हणजे माहिती घेणार्‍यास ते सोपे होते. विकिच्या प्रथेप्रमाणे त्या लेखात योग्य दुवे असावेत. नंतर वेळ मिळेल तेंव्हा हे अपूर्ण काम करण्यास सोपे व्हावे म्हणुन हा उपद्व्याप करावा लागतो. आपण काढलेले संपादन मी उलवटले आहे यात गैरसमज नसावा ही विनंती.आपणास विकिवर पुढील लेखनास शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:२२, १४ जून २०१३ (IST)[reply]

आता या लेखात मी केलेले बदल कृपया बघावेत.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:४९, १४ जून २०१३ (IST)[reply]

नीरजा[संपादन]

कृपया नीरजा यांचे संपूर्ण नाव नीरजा या लेखात लिहावे ही विनंती.त्यायोगे त्यांची ओळख प्रदर्शित होईल. त्या लेखातील सध्याचे मजकूराने विशेष अर्थबोध होत नाही. धन्यवाद.

तसेच आपण नुकतेच चढविलेले [[चित्र:Niraja.jpg ]]हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे किंवा कसे याचा कृपया खुलासा त्या संचिकेच्या पानात करावा ही पण विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३२, २३ जून २०१३ (IST)[reply]

कमल देसाई[संपादन]

कृपया कमल देसाई हा लेख बघावा. त्यात मी किरकोळ बदल केलेले आहेत. त्यात संदर्भ टाकला आहे. तो कसा टाकला हे आपणास 'संपादन' वर टिचकी मारली असता कळेल. धन्यवाद.

तसेच आपणास पुढील लेखनास शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:२९, २३ जून २०१३ (IST)[reply]

विनंती[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर सध्या क्रियापद नावाचा लेख आहे सोबतच सदस्य:J मराठी भाषेतील धातू वरही काम करत आहेत.मराठी भाषेतील धातू मध्ये काही माहिती लेखन उपलब्ध होऊ शकल्यास तसेच यादीत सवडी नुसार अधून मधून बघावी अशी नम्र विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४२, २७ जून २०१३ (IST)[reply]

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार Ketaki Modak,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकी लव्हज् वुमन २०२१[संपादन]

Wiki Loves Women South Asia-mr.png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:०१, १६ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]

वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य[संपादन]

नमस्कार, आपण वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य येथे लिखाण करत आहात. कृपया लक्षात घ्या, वर्ग हे शक्यतो रिकामे असतात. तेथील लिखाण इतर लेखात जोडल्यास जास्त बरे होईल. - संतोष गोरे ( 💬 ) १०:५३, ३० नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]

माहितीसाठी धन्यवाद. एक शंका - अरविंद घोष यांचे साहित्य याच नावाचे एक page करून तो मजकूर तेथे लिहू का? Ketaki Modak (चर्चा) १३:२७, ३० नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]
अरे वाह, का नाही... अजून विस्तृत माहिती टाकू शकता. - संतोष गोरे ( 💬 ) १४:०३, ३० नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]
धन्यवाद. तसे करते. Ketaki Modak (चर्चा) १५:०१, ३० नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]