जगदंबा (पुस्तक)
Appearance
जगदंबा हे पुस्तक म्हणजे श्रीअरविंद यांच्या द मदर [१] या पुस्तकाचे हे मराठी भाषांतर आहे. भाई कोतवाल यांनी हे भाषांतर केले आहे.
जगदंबा | |
लेखक | श्रीअरविंद |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | The Mother |
अनुवादक | भाई कोतवाल |
भाषा | इंग्रजी - मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | लेखसंग्रह |
प्रकाशन संस्था | रामचंद्र नारायण कुळकर्णी, इंदूर |
प्रथमावृत्ती | १९३० |
विषय | आद्य शक्ती आणि तिची रूपे, पैलू |
पृष्ठसंख्या | ७९ |
पुस्तकाची मांडणी
[संपादन]मूळ पुस्तकाचा भाव भाषांतरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे अनुवादक भाई कोतवाल प्रस्तावनेत लिहितात.
पुस्तकामध्ये खालील प्रमाणे लेख आहेत. लेखांना नावे दिलेली नाहीत.
पूर्वार्ध
- ईशप्रसादाची साधने
- साधकाच्या प्रयत्नाची दिशा
- जगदंबेचा प्रसाद आणि साधकाचे प्रयत्न
- संपत्ती - मूलत: ईश्वरी शक्ती
- ईश्वरी कार्याचे कार्यवाहक होण्यासाठी...
उत्तरार्ध
- विश्वमातेची चतुर्विध रूपे
- महेश्वरी, महाकाली आणि महालक्ष्मी
- महासरस्वती
- मानवाचे कर्तव्य [२]