Jump to content

माता (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माता हे पुस्तक म्हणजे श्रीअरविंद लिखित 'द मदर' [१] या पुस्तकातील एका विभागाचे भाषांतर आहे. अनुवाद श्री. भा.द. लिमये आणि श्रीमती विमल भिडे यांनी केला आहे. मूळ पुस्तक ४९६ पानी आहे.

लेखन-काळ[संपादन]

माता
लेखक श्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The Mother
अनुवादक भा.द.लिमये आणि विमल भिडे
भाषा इंग्रजी-मराठी
देश भारत
साहित्य प्रकार लेखसंग्रह
प्रकाशन संस्था श्रीअरविंद आश्रम
प्रथमावृत्ती १९८१
चालू आवृत्ती २००६
विषय आद्यशक्ती आणि तिचे स्वरूप
पृष्ठसंख्या ७१
आय.एस.बी.एन. 81-7058-375-6

इंग्रजीमधील 'द मदर' हे पुस्तक प्रथमत: १९२८ साली प्रकाशित झाले. १९२७ साली याचे लेखन झाले आहे.[२]

लेखन-निमित्त[संपादन]

२४ नोव्हेंबर १९२६ रोजी अधिमानसाचे अवतरण झाल्यानंतर श्रीअरविंद यांनी एकांतवास स्वीकारला आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी आलेल्या सर्व साधकांची भौतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी त्यांनी श्रीमाताजी यांच्यावर सोपविली. त्यानंतर श्रीमाताजींचे स्वरूप, त्यांची कार्यपद्धती, त्याची कृपा, साधकाची जबाबदारी या सर्व गोष्टींचे वर्णन करणारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.[२]

उपयुक्तता[संपादन]

हे पुस्तक पूर्णयोगाची साधना करणाऱ्या साधकासाठी महत्त्वाचे आहे. स्वतः श्रीअरविंद यांनी यांनी या पुस्तकाला त्यांच्या समग्र साहित्यामध्ये महत्त्वाचे स्थान दिले आहे. [३]

पुस्तकाची मांडणी[संपादन]

या पुस्तकात एकंदर सहा प्रकरणे आहेत.

 1. भगवती शक्ती आणि तिच्याप्रति केलेले समर्पण
 2. अभीप्सा, नकार आणि समर्पण - त्रिविध तपस्या
 3. भगवती मातेची कृपा आणि साधकाची आंतरिक स्थिती
 4. धनशक्ती - विश्वशक्तीची दृश्य खूण
 5. दिव्य कर्म, त्याचे स्वरूप आणि त्यासाठी आवश्यक असणारी साधकाची स्थिती
 6. भगवती मातेची चार रूपे - महेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती [४]

पूरक वाचन[संपादन]

जगदंबा (पुस्तक) [५]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Sri Aurobindo (1972). The Mother. 25 (SRI AUROBINDO BIRTH CENTENARY LIBRARY • POPULAR EDITION ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram.
 2. ^ a b Sri Aurobindo (2012). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 32. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
 3. ^ Sri Aurobindo (2012). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department., pg 653
 4. ^ माता, श्रीअरविंद, अनुवाद - भा.द.लिमये व विमल भिडे
 5. ^ जगदंबा, भाई कोतवाल, १९३० च्या सुमारास लेखन