बंगाली भाषा
बंगाली | |
---|---|
বাংলা (बांग्ला) | |
स्थानिक वापर | भारत, बांगलादेश |
प्रदेश | बंगाल, ईशान्य भारत, आसाम काही प्रमाणात- म्यानमार, ओडिशा |
लोकसंख्या | २३ कोटी २० लक्ष (अनुमान) |
क्रम | ५ |
लिपी | पूर्व नागरी लिपी, |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
बांगलादेश भारत राज्यभाषा- पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, अंदमान आणि निकोबार |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | bn |
ISO ६३९-२ | ben |
ISO ६३९-३ | ben (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
बंगाली (बंगाली लिपीत: বাংলা ভাষা; लिप्यंतरण: बांला भाषा) ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बांग्लादेशात बोलली जाणारी भाषा आहे. संस्कृत, पाली व प्राकृत या भाषांमधून बंगाली भाषेचा जन्म झाला. बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून, या प्रदेशात सध्याचा बांग्लादेश व भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होतो. बंगाली भाषिकांची एकूण संख्या २३ कोटीच्या आसपास असून, जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते.[१] (भाषिक संख्येनुसार जगभरात पाचवी). बंगाली बांग्लादेशातील प्रमुख भाषा असून भाषिक संख्येत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बंगाली व आसामी भाषा भाषा इंडो-इराणी भाषाकुळातील भौगोलिकदृष्ट्या सर्वांत पूर्वेकडच्या भाषा आहेत.
इतिहास
[संपादन]बंगाली भाषेच्या विकासाचे तीन टप्पे आहेत.
- जुनी बंगाली (इ.सन ९००/१००० - १४००) "चर्यापद" या जुन्या ग्रंथाची रचना; भक्तिगीते, आमी, तुमी या सर्वनामांचा उदय; -इल -इब या अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शविणाऱ्या क्रियापदांच्या वापरास प्रारंभ; ओरिया, आसामी यांचा स्वतंत्र भाषा म्हणून उदय.
- मध्य बंगाली (१४०० - १८००)-- चैतन्यचरितामृत, चंडीदासकृत "श्रीहरिकीर्तन" अशा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रंथांची रचना; फारसी शब्दांची भर.
- आधुनिक बंगाली (१८००-पुढे) क्रियापदांचे संक्षेपीकरण, चलित भाषेचा उदय.
भौगोलिक विस्तार
[संपादन]- भारत : पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांची राजभाषा; आसाम राज्यात सह-राजभाषेचा दर्जा.
- बांग्लादेश : राष्ट्रभाषा व बांग्लादेश प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा.
विविध बोली व प्रमाण भाषा
[संपादन]प्रमाण भाषा
[संपादन]ऐतिहासिकदृष्ट्या लिखित भाषेच्या २ शैली आहेत.
- साधुभाषा(সাধুভাষা) : बंगालीत साधुभाषा म्हणजे शुद्ध वा उच्च कोटीची भाषा. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन (कवी: रवींद्रनाथ टागोर) व भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम ( कवी: बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय) या दोन्ही रचना साधुभाषेत आहेत. आधुनिक साहित्यात साधुभाषेचा वापर नगण्य होतो. तत्सम शब्दांचा मोठ्या प्रमाणावर भरणा व क्रियापदांची लांबडी रूपे हे साधुभाषेचे वैशिष्ट्य होय.
- चलति अथवा चलितभाषा ( চলতিভাষা /চলিতভাষা): साधुभाषा ही जुनी लिखित बंगाली होती. मौखिक व साधुभाषेतील फरक कालांतराने वाढत गेला. यामुळे १९ व्या शतकच्या प्रारंभास चलितभाषा हे "चालू भाषेचे लिखित रूप" उदयाला आले. नवद्वीप वा आजचा नादिया जिल्हा तत्कालीन बंगालचे सांस्कृतिक केंद्र असल्याने तिथली बोली ही नव्या प्रमाणभाषेसाठी प्रमाण ठरली. क्रियापदांचे संक्षिप्त रूप हा चलितभाषा व साधुभाषा प्रमुख फरक. "मी जात आहे" याचे साधुभाषेतील रूप "चोलितेछि" याचा चलितभाषेत "चोलछि" असा संक्षेप होतो. रवींद्रनाथ टागोर यांचे बहुतांश लिखाण चलितभाषेत आहे.
बोलीभाषा
[संपादन]भाषाशास्त्री सुनिती कुमार चॅटर्जी बंगालीच्या बोलींचे रठ, बंग, कामरूप व वरेन्द्र अशा ४ गटांत विभाजन करतात. बोलींचे बदलातील सातत्य (dialect continuum) हे बंगालीचे आणखी एक वैशिष्ट्य. मराठीप्रमाणेच भौगोलिक अंतरासोबत बंगाली हळूहळू बदलत जाते. ठळकपणे दाखवता येईल असा बोलीभेद म्हणजे पश्चिम व पूर्व बंगालमधील भाषाभेद. पूर्व बंगाल (आजचा बांग्लादेश) मुस्लिमबहुल असून पश्चिम बंगाल हा हिंदूबहुल आहे. त्यामुळे ह्या धार्मिक फरकाचे प्रतिबिंबही या प्रदेशातल्या बोलींवर जाणवते.
लिपी
[संपादन]व्याकरण
[संपादन]मुख्य लेख: बंगाली व्याकरण
बंगाली संज्ञांना लिंग दिली जात नाही, ते विशेषतः विशेषण बदलते. तथापि, संज्ञा आणि सर्वनामांची मोजमाप कमी केली जाते. (वाक्यात त्यांच्या कार्यानुसार बदललेले) चार क्रियांमध्ये बदलते, क्रियापद मोठ्या प्रमाणावर जुळतात आणि क्रियापद नावाच्या लिंगनुसार क्रिया बदलत नाहीत.
जेवण झालं का
[संपादन]बंगाली भाषा आंदोलन
[संपादन]मराठी बंगाली मधील साम्य व भेद
[संपादन]साम्य
[संपादन]भेद
[संपादन]नमुना मजकूर
[संपादन]बंगाली भाषेतील खालील नमुना मजकूर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार घोषणापत्राचे पहिले कलम आहे.
इंग्रजी मजकूर
[संपादन]Article 1: All human beings are born free and equal in dignity and rights. They are endowed with reason and conscience. Therefore, they should act towards one another in a spirit of brotherhood.
- ধারা ১: সমস্ত মানুষ স্বাধীনভাবে সমান মর্যাদা এবং অধিকার নিয়ে জন্মগ্রহণ করে। তাঁদের বিবেক এবং বুদ্ধি আছে; সুতরাং সকলেরই একে অপরের প্রতি ভ্রাতৃত্বসুলভ মনোভাব নিয়ে আচরণ করা উচিৎ।
बंगालीचे रोमनीकरण
[संपादन]- Dhara êk: Shômosto manush shadhinbhabe shôman môrjada ebong odhikar nie jônmogrohon kôre. Tãder bibek ebong buddhi achhe; shutorang shôkoleri êke ôporer proti bhrattrittoshulôbh mônobhab nie achorôn kôra uchit.
देवनागरी लिप्यंतरण
[संपादन]- धारा १: समस्त मानुष स्वाधीनभाबे समान मर्यादा एबं अधिकार निये जन्मग्रहण करे. तॉंदेर बिबेक एबं बुद्धि आछे; सुतरां सकलरेई एके अपरेर प्रति भ्रातृत्वसुलभ मनोभाब निये आचरण करा उचित .
मराठी भाषांतर
[संपादन]- कलम १: सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे.
संदर्भ
[संपादन]- ^ "The World's Most Widely Spoken Languages". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2206-11-17 रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)