Jump to content

"मुंबई उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २९: ओळ २९:

==क्षेत्र व मार्गं==
==क्षेत्र व मार्गं==
[[पश्चिम रेल्वे]] व [[मध्य रेल्वे]] हे [[भारतीय रेल्वे|भारतीय रेल्वेचे]] दोन क्षेत्रीय विभाग, ही रेल्वे प्रणाली चालवतात. सध्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर जलद उपनगरी गाड्या, मालगाड्या व दूर अंतरावरच्या मेन लाईन गाड्या एकाच रुळावर चालतात. हार्बर मार्ग मध्य तसेच पश्चिम या दोन्ही क्षेत्रांच्या रुळांवरुन धावतात.
[[पश्चिम रेल्वे]] व [[मध्य रेल्वे]] हे [[भारतीय रेल्वे|भारतीय रेल्वेचे]] दोन क्षेत्रीय विभाग, ही रेल्वे प्रणाली चालवतात. सध्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर जलद उपनगरी गाड्या, मालगाड्या व दूर अंतरापर्यंत चालणार्‍या मुख्य रेल्वे लाइनवरच्या गाड्या एकाच रूळजोडीवर धावतात. हार्बर मार्गावरच्या लोकल मध्य तसेच पश्चिम या दोन्ही विभागांचे लोहमार्ग वापरतात.

===पश्चिम रेल्वे===
===पश्चिम रेल्वे===
पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेटपासून डहाणू रोडपर्यंत जाते. समुद्रकिनार्‍याला साधारण समांतर १२४ किमी धावणार्‍या या मार्गावर दोन मंदगती (स्थानिक), दोन द्रुतगती आणि वसई रोडपर्यंत एक अधिक असे चार/पाच लोहमार्ग आहेत. चर्चगेट ते विरारदरम्यानच्या ६० अंतरात ईएमयूने ही सेवा पुरवली जाते तर विरार-डहाणू रोड मार्गावर (६४ किमी) एमईएमयू (मल्टिपल इलेक्ट्रिक मेनलाइन युनिट किंवा मेमू) द्वारे ही सेवा पुरवली जाते. या मेमू गाड्यांच्या काही फेर्‍या डहाणू रोड पासून वसई रोडद्वारे पनवेललाही जातात. उपनगरी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी महालक्ष्मी येथे कार्यशाळा आहे. शिवाय छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी तसेच रात्रीच्या मुक्कामास नेण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि कांदिवली येथे कार्यशाळा (कारशेड) आहेत. याशिवाय नाला सोपारा आणि विरारच्या मध्ये एक नवीन कार्यशाळा बांधली जात आहे. ही नवीन कार्यशाळा बांधून झाल्यावर आशियातील सगळ्यात मोठी कार्यशाळा होईल.
पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेटपासून डहाणू रोडपर्यंत जाते. समुद्रकिनार्‍याला साधारण समांतर असे १२४ किमी ये-जा करणार्‍या या मार्गावर दोन मंदगती (स्थानिक), दोन द्रुतगती आणि वसई रोडपर्यंत एक अधिक असे चार/पाच लोहमार्ग आहेत. चर्चगेट ते विरारदरम्यानच्या ६० किलोमीटर अंतरात ईएमयूने ही सेवा पुरवली जाते तर विरार-डहाणू रोड मार्गावर (६४ किमी) एमईएमयू (मल्टिपल इलेक्ट्रिक मेनलाइन युनिट किंवा मेमू) द्वारे ही सेवा पुरवली जाते. या मेमू गाड्यांच्या काही फेर्‍या डहाणू रोड पासून वसई रोडद्वारे पनवेललाही जातात. उपनगरी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी महालक्ष्मी येथे कार्यशाळा आहे. शिवाय छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी तसेच रात्रीच्या मुक्कामास नेण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि कांदिवली येथे कार्यशाळा (कारशेड) आहेत. याशिवाय नाला सोपारा आणि विरारच्या मध्ये एक नवीन कार्यशाळा बांधली जात आहे. ही नवीन कार्यशाळा बांधून झाल्यावर ही आशियातील सगळ्यात मोठी कार्यशाळा होईल.

पश्चिम रेल्वेच्या इएमयू गाड्या ९, १२ किंवा क्वचित १५ डब्यांच्या असतात. या गाड्या मंदगती (सगळ्या स्थानकांवर थांबणार्‍या) किंवा जलदगती (विशिष्ट स्थानकांवरच थांबणार्‍या) सेवा पुरवतात. उपनगरी फेर्‍या सहसा मोठ्या व महत्वाच्या स्थानकांपासून तशाच स्थानकांपर्यंत असतात. या सेवांचे गंतव्यस्थान पहिल्या डब्याच्या दर्शनी भागात असते. हे गंतव्यस्थान रोमन लिपीतील एक किंवा दोन अक्षरांनी दर्शविले जाते.

२१:४४, २१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

मुंबई उपनगरी रेल्वे
स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
वाहतूक प्रकार सार्वजनिक परिवहन
मार्ग ३ (मध्य, हार्बर आणि पश्चिम)
मार्ग लांबी ४२७.५ कि.मी.
एकुण स्थानके १२२
दैनंदिन प्रवासी संख्या ६९.५ लाख
सेवेस आरंभ १८५७
मार्ग नकाशा

mumbai suburban rail map.svg

मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेपश्चिम रेल्वे या दोन क्षेत्रीय विभाग ती चालवतात. उपनगरी रेल्वेने मुंबईत ६९ लाखहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणार्‍या शहरी रेल्वे प्रणाल्यांपैकी ही एक आहे.. सर्वसामान्य लोक या लोहमार्गांवर चालणार्‍या आगगाड्यांना लोकल ट्रेन किंवा फक्त लोकल असे म्हणतात.

भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेनची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली.

मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच थोडी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणार्‍या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत एक मेट्रो प्रणाली व मोनोरेल प्रणाली बांधली जात आहे.

मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे तीन मुख्य विभाग आहेत:

सेवा व सुविधा

विरार ते चर्चगेट तसेच कसारा ते टिटवाळा या मार्गांवर धावणार्‍या उपनगरी रेल्वेच्या गाड्या डोक्यावर टांगलेल्या विजेच्या तारांमधून मिळणार्‍या २५,००० व्होल्ट ए.सी. वीज पुरवठ्यावर चालतात. तर बाकीच्या उपनगरी गाड्यांची वीज १५०० व्होल्ट डी.सी. असते. एकूण ४६५ किलोमीटर लांबीचे मार्ग असलेली ह्या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी ३, ४ किंवा पाच ई.एम.यू. (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटे) जोडलेली असतात. युनिटांच्या संख्येनुसार गाडीला ९, १२ ,किंवा (फक्त पश्चिम रेल्वेमध्ये) १५ डबे असतात. अशा एकूण १९१ गाड्यांद्वारे २,३४२ फेर्‍यांतून रोज सुमारे ६९.४ लाखांहून जास्त प्रवाशी प्रवास करतात.

क्षेत्र व मार्गं

पश्चिम रेल्वेमध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेचे दोन क्षेत्रीय विभाग, ही रेल्वे प्रणाली चालवतात. सध्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर जलद उपनगरी गाड्या, मालगाड्या व दूर अंतरापर्यंत चालणार्‍या मुख्य रेल्वे लाइनवरच्या गाड्या एकाच रूळजोडीवर धावतात. हार्बर मार्गावरच्या लोकल मध्य तसेच पश्चिम या दोन्ही विभागांचे लोहमार्ग वापरतात.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेटपासून डहाणू रोडपर्यंत जाते. समुद्रकिनार्‍याला साधारण समांतर असे १२४ किमी ये-जा करणार्‍या या मार्गावर दोन मंदगती (स्थानिक), दोन द्रुतगती आणि वसई रोडपर्यंत एक अधिक असे चार/पाच लोहमार्ग आहेत. चर्चगेट ते विरारदरम्यानच्या ६० किलोमीटर अंतरात ईएमयूने ही सेवा पुरवली जाते तर विरार-डहाणू रोड मार्गावर (६४ किमी) एमईएमयू (मल्टिपल इलेक्ट्रिक मेनलाइन युनिट किंवा मेमू) द्वारे ही सेवा पुरवली जाते. या मेमू गाड्यांच्या काही फेर्‍या डहाणू रोड पासून वसई रोडद्वारे पनवेललाही जातात. उपनगरी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी महालक्ष्मी येथे कार्यशाळा आहे. शिवाय छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी तसेच रात्रीच्या मुक्कामास नेण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि कांदिवली येथे कार्यशाळा (कारशेड) आहेत. याशिवाय नाला सोपारा आणि विरारच्या मध्ये एक नवीन कार्यशाळा बांधली जात आहे. ही नवीन कार्यशाळा बांधून झाल्यावर ही आशियातील सगळ्यात मोठी कार्यशाळा होईल.

पश्चिम रेल्वेच्या इएमयू गाड्या ९, १२ किंवा क्वचित १५ डब्यांच्या असतात. या गाड्या मंदगती (सगळ्या स्थानकांवर थांबणार्‍या) किंवा जलदगती (विशिष्ट स्थानकांवरच थांबणार्‍या) सेवा पुरवतात. उपनगरी फेर्‍या सहसा मोठ्या व महत्वाच्या स्थानकांपासून तशाच स्थानकांपर्यंत असतात. या सेवांचे गंतव्यस्थान पहिल्या डब्याच्या दर्शनी भागात असते. हे गंतव्यस्थान रोमन लिपीतील एक किंवा दोन अक्षरांनी दर्शविले जाते.

संक्षिप्त नाव स्थानक संक्षिप्त नाव स्थानक
A अंधेरी B वांद्रे
BC मुंबई सेंट्रल BO बोरिवली
BY भाईंदर BS वसई रोड
C चर्चगेट D दादर
DR डहाणू DS दहिसर
G गोरेगांव M मालाड
MR मीरा रोड PL पनवेल
V विरार