Jump to content

"दत्तात्रेय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५७: ओळ ५७:
==दत्ताची तीर्थक्षेत्रे==
==दत्ताची तीर्थक्षेत्रे==
दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो.
दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो.
* [[गिरनार]] हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू [[नेमिनाथ|नेमिनाथांचे]] मंदिर आहे. तसेच [[गोरखनाथ]] मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेरयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
* [[गिरनार]] हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू [[नेमिनाथ|नेमिनाथांचे]] मंदिर आहे. तसेच [[गोरखनाथ]] मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेरयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर इथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून [[नेपाळ]]मध्ये पूजले जाते.
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर इथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून [[नेपाळ]]मध्ये पूजले जाते.
* श्रीचांगदेव राऊळ [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
* श्रीचांगदेव राऊळ [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
* नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थान[[सांगली]] पासून चाळीस किलो्मीट्रवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
* नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थान[[सांगली]] पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
* [[नृसिंहवाडी]] - [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असा एक मतप्रवाह आहे.
* [[नृसिंहवाडी]] : [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले.. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
* [[अक्कलकोट]] - दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. १४५८ मध्ये कर्दळीवनात गेलेले नृसिंहसरस्वतीच स्वामींच्या रूपाने परत अवतरले असे दत्तभक्त मानतात. [[सोलापूर]] जवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
* [[अक्कलकोट]] : दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. १४५८ मध्ये कर्दळीवनात गेलेले नृसिंहसरस्वतीच स्वामींच्या रूपाने परत अवतरले असे दत्तभक्त मानतात. [[सोलापूर]]जवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
* [[गरुडेश्वर]] - योगी श्री [[वासुदेवानंद सरस्वती]] अर्थात [[टेंबेस्वामी]] यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. [[नर्मदा नदी]]च्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.
* [[गरुडेश्वर]] - योगी श्री [[वासुदेवानंद सरस्वती]] अर्थात [[टेंबेस्वामी]] यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. [[नर्मदा नदी]]च्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.


===इतर मंदिरे व स्थाने===
===इतर मंदिरे व स्थाने===
* [[विजापूर]]-विजापूरला आपल्याला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* [[विजापूर]] : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र - [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ कि.मी. वर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र : [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* [[कोल्हापूर]] - दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले [[कुंभारस्वामी]] यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
* [[कोल्हापूर]] : दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले [[कुंभारस्वामी]] यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
* माणिकनगर - बीदर येथील [[हुमणाबाद]] या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. [[श्रीमाणिकप्रभू]] यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. [[अहमदाबाद]] येथील [[बाबा त्रिवेदी महाराज]] या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी [[नानासाहेब पेशवे|नानासाहेब पेशव्यांनी]] रंगराव यांना श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवला होता. जवळचे रेल्वे स्टेशन [[गुलबर्गा]] असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
* माणिकनगर : बीदर येथील [[हुमणाबाद]] या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. [[श्रीमाणिकप्रभू]] यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. [[अहमदाबाद]] येथील [[बाबा त्रिवेदी महाराज]] या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी [[नानासाहेब पेशवे|नानासाहेब पेशव्यांनी]] रंगराव यांना श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे [[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
* चौल - चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये [[रेवदंडा|रेवदंडय़ापासून]] ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
* चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये [[रेवदंडा|रेवदंडय़ापासून]] ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
* अष्टे
* अष्टे :
* [[खामगाव]] - [[बुलढाणा]] जिल्ह्यातील खामगाव हे दत्त स्थान आहे. येथे [[संत पाचलेगावकर महाराज|संत पाचलेगावकर महाराजांचा]] मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
* [[खामगाव]] : [[बुलढाणा]] जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे [[संत पाचलेगावकर महाराज|संत पाचलेगावकर महाराजांचा]] मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
* [[अंबेजोगाई]] - आद्यकवी [[मुकुंदराज]] आणि [[संत दासोपंत]] यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील [[बीड]] जिल्ह्यात [[अंबेजोगाई]] येथे आहे
* [[अंबेजोगाई]] : आद्यकवी [[मुकुंदराज]] आणि [[संत दासोपंत]] यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील [[बीड]] जिल्ह्यात या [[अंबेजोगाई]] येथे आहे
* सांखळी ([[गोवा]]) - [[डिचोली]] तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी [[रामनवमी]], अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि [[दत्तजयंती]] असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्त भक्ताने या मंदिराची स्थापना केली.
* सांखळी ([[गोवा]]) : [[डिचोली]] तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी [[रामनवमी]], अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि [[दत्तजयंती]] असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्त भक्ताने या मंदिराची स्थापना केली.
* [[नारेश्वर]] - हे [[गुजरात]] राज्यात आहे. [[रंगावधूत महाराज]] यांच्या वास्तव्याने पावन क्षेत्र आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी '[[दत्त बावनी]]' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील [[वडोदरा]] या पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि [[गोकुळाष्टमी]] हे उत्सव साजरे होतात.
* [[नारेश्वर]] : हे [[रंगावधूत महाराज]] यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र [[गुजरात]] राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी '[[दत्त बावनी]]' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील [[वडोदरा]] या पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि [[गोकुळाष्टमी]] हे उत्सव साजरे होतात.
* फलटण (सातारा जिल्हा) : येथे एकमुखी दत्तचे एक देऊळ आहे. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे भणगे यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.


== शिष्य व कार्य==
== शिष्य व कार्य==
ओळ १११: ओळ ११२:


==गीते==
==गीते==
[[आर. एन. पराडकर]] या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने अनेक प्रसिद्ध दत्तगीतांचे गायन केले आहे. पराडकर यांनी यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी अशा अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा [[गायक]] [[अजित कडकडे]] हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे [[आशा भोसले]] यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे.
[[आर. एन. पराडकर]] या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा [[गायक]] [[अजित कडकडे]] हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे [[आशा भोसले]] यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे.


===पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते===
===पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते===

१२:५०, ४ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

दत्तात्रेय

राजा रविवर्म्यांनी काढलेले दत्तात्रेयांचे चित्र
मराठी दत्तात्रेय
संस्कृत दत्तात्रेयः
कन्नड ದತ್ತಾತ್ರೇಯ
तमिळ தத்தாத்ரேயர்
गुजरार्ती દત્તાત્રેય
वाहन उंदीर
शस्त्र त्रिशूळ, चक्र
वडील अत्री ऋषि
आई अनसूया
अन्य नावे/ नामांतरे दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद,
या देवतेचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ
या अवताराची मुख्य देवता ब्रह्मा, विष्णू, महेश
मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
नामोल्लेख गुरुचरित्र
तीर्थक्षेत्रे नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर

दत्त (दत्तात्रेय) हा हिंदू धर्मातील एक देवयोगी आहे. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनसूया यांचा पुत्र असून त्याला दुर्वाससोम नावाचे दोन भाऊ आहेत[]. हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णु, ब्रह्माशिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले[]. दत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे.

स्वरूप

दत्तात्रेय ही तीन डोकी असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो. यांची दाढी वाढलेली असून, स्वरूप दिगंबर म्हणजे नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसते. चार कुत्री हे वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो तंत्रातील स्मशानात राहणार्‍या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

इतिहास

सुमारे पाचव्या शतकापासून पुढे दत्तात्रेय पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झालेले आढळते. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयचा उल्लेख आहे. यादवपूर्व काळांत महाराष्ट्रात शिव-पार्वतीची उपासना व्यापक प्रमाणावर रूढ होती असे उल्लेख शिलालेखांतून आढळतात.

दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे वेदातील पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे बंधू, ही दत्ताचे नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणात वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे दिसून येतात. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.

संप्रदाय

एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, लीळाचरित्र,दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात.

नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात मुसलमान धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तोत्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना ११०० च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे.

समावेशकता

गोरक्षनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय वारकर्‍यांनाही पूज्य आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे श्रेष्ठ दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.

आखाडे

दशनामी नागा साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे.

उपासनेची वैशिष्ट्ये

दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. अवधूत गीतेत दत्तात्रेय जातिव्यवस्थेस मानताना दिसत नाहीत.

दत्ताची तीर्थक्षेत्रे

दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो.

  • गिरनार हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू नेमिनाथांचे मंदिर आहे. तसेच गोरखनाथ मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेरयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
  • नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर इथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून नेपाळमध्ये पूजले जाते.
  • श्रीचांगदेव राऊळ माहूरच्या यात्रेनिमित्त फलटणहून निघाले होते. तसेच ते द्वारका येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
  • नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
  • नृसिंहवाडी : वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले.. विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे आदिलशहाने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
  • अक्कलकोट : दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. १४५८ मध्ये कर्दळीवनात गेलेले नृसिंहसरस्वतीच स्वामींच्या रूपाने परत अवतरले असे दत्तभक्त मानतात. सोलापूरजवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
  • गरुडेश्वर - योगी श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. नर्मदा नदीच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.

इतर मंदिरे व स्थाने

  • विजापूर : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
  • कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र : कर्नाटक राज्यात गुलबर्गा शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
  • कोल्हापूर : दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले कुंभारस्वामी यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
  • माणिकनगर : बीदर येथील हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. श्रीमाणिकप्रभू यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. अहमदाबाद येथील बाबा त्रिवेदी महाराज या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी रंगराव यांना श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे गुलबर्गा रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
  • चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये रेवदंडय़ापासून ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
  • अष्टे :
  • खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे संत पाचलेगावकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
  • अंबेजोगाई : आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात या अंबेजोगाई येथे आहे
  • सांखळी (गोवा) : डिचोली तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्तजयंती असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्त भक्ताने या मंदिराची स्थापना केली.
  • नारेश्वर : हे रंगावधूत महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र गुजरात राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी 'दत्त बावनी' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील वडोदरा या पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी हे उत्सव साजरे होतात.
  • फलटण (सातारा जिल्हा) : येथे एकमुखी दत्तचे एक देऊळ आहे. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे भणगे यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.

शिष्य व कार्य

श्रीपाद वल्लभ व त्यांचे शिष्य नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.

संप्रदायाचे ग्रंथ

  • श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
  • परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्‍नास खंडांची रचना केली.
  • सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
  • अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
  • अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
  • गोरक्षनाथ लिखित हिंदी रचनांचे संकलन गोरखबानी या ग्रंथात झाले आहे.
  • मुकुंदराज या आद्य मराठी कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
  • महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
  • दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.
  • गुरुगीता
  • दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.

दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.

संबंधित ग्रंथ

  • श्रीगुरुचरित्र लेखक सरस्वती गंगाधर
  • दत्तप्रबोध
  • दत्तमाहात्म्य
  • गुरुलीलामृत
  • नवनाथभक्तिसार
  • नवनाथ सार - लेखक धुंडिसुत मालू
  • दक्षिणामूर्ती संहिता
  • दत्तसंहिता

आधुनिक पुस्तके

  • दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक डॉ. रा.चिं. ढेरे पद्मगंधा प्रकाशन
  • श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. प्र.न. जोशी
  • 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन

गीते

आर. एन. पराडकर या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे.

पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते

  • अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु)
  • आज मी दत्तगुरू पाहिले
  • कृष्णाकाठी दत्तगुरुंचा नित्य असे संचार
  • गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई)
  • गुरूदत्त पाहिले कृष्णातिरीं
  • गेलो दत्तमयी हौउनी
  • जय जय दत्तराज माऊली (कवी सुधांशु)
  • दत्तगुरूंना स्मरा
  • दत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धाम
  • दत्त दिगंबर दैवत माझे (कवी सुधांशु)
  • दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी
  • दत्ता दिगंबरा या हो
  • दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)
  • धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची (पारंपरिक गीत)
  • निघालो घेऊन दत्ताची पालखी
  • पुजा हो दत्तगुरू दिनरात (कवी गुलाब भेदोडकर)
  • मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
  • माझी देवपूजा पाय तुझे (कवी शिवदीन केसरी),

वगैरे. .

संदर्भ

  1. ^ Empty citation (सहाय्य)
  2. ^ रा.चिं. ढेरे. Missing or empty |title= (सहाय्य)