डिचोली
डिचोली | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | गोवा |
जिल्हा | उत्तर गोवा |
समुद्रसपाटीपासुन उंची | २५६ फूट (७८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १६,९८६ |
अधिकृत भाषा | कोंकणी, मराठी. |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
डिचोली किंवा दिवचल किंवा बिचोलीम (Bicholim) हे भारताच्या गोवा राज्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यातील एक लहान नगर व डिचोली तालुक्याचे मुख्यालय आहे. डिचोली गोवाच्या उत्तर भागात डिचोली तालुक्यात असून ते राजधानी पणजीच्या ३० किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली डिचोलीची लोकसंख्या सुमारे १७ हजार होती. खाणकाम हा येथील प्रमुख उद्योग आहे.
डिचोली हा गोवा विधानसभेच्या ४० मतदारसंघांपैकी एक आहे. डिचोली नगराला भतग्राम असे नाव होते. डिचोली नगरात 'नवा सोमवार' हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या ठिकाणी विविध मंदिरे आहेत. श्री शांतदुर्गा देवस्थान,श्री महामाया देवस्थान, इत्यादी मंदिरे आहेत. डिचोलीतील नार्वे गावामध्ये श्री सप्त्कोटेश्वर देवस्थान आहे. श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केलेला आहे असे दाखले आढळतात. इतर तालुक्यांप्रमाणे डिचोली तालुक्यातही शिमगोत्सव धुमधडाक्यात होतो. डिचोली तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध गायक श्री अजीत कडकडे यांचे मूळ गाव आहे. डिचोलीमध्ये 'हिरा टॉकीज' नावाचा एक चित्रपटगृह आहे.