"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: संदर्भ हवा
ओळ ६७: ओळ ६७:
==संदर्भ व नोंदी==
==संदर्भ व नोंदी==
<references />
<references />
* २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
* ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
* ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
* ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)


{{विस्तार}}
{{विस्तार}}

००:२४, १० जून २०१३ ची आवृत्ती

शिवसेना
चित्र:In shivsena.gif
स्थापना १९६६
मुख्यालय शिवसेना भवन, दादर, मुंबई.
युती राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन
लोकसभेमधील जागा ११/५४५[१]
राज्यसभेमधील जागा ४/२४५[१]
राजकीय तत्त्वे हिंदुत्व
प्रकाशने सामना
संकेतस्थळ शिवसेना.ऑर्ग

शिवसेना हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.

शिवसेनेचा इतिहास

शिवसेनेची स्थापना

१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी भारतात भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. मराठी आणि गुजराती लोकांना मात्र भाषिक राज्य मिळाले नाही. ते मिळवण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांतामधे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठी चळवळ झाली. शेवटी, १९६० मधे मुंबई प्रांत विभागून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळच्या हैद्राबाद राज्यातील तसेच मध्य प्रदेशातील मराठीभाषक लोकसंख्या असलेला भाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. मुंबई प्रांतात असलेले मराठीभाषी बेळगाव-कारवार मात्र म्हैसूर प्रांतात घालण्यात आले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी ठरवली गेली. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी १९ जून १९६६ रोजी बाळ ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसेनेची स्थापना केली.

निवडणूक १९९५

१९९५ मध्ये सेना-भाजप युतीने महाराष्ट्राची निवडणूक जिंकली. सरकारी ताकद मिळाल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमुख परिषद" तयार केली.

निवडणूक चिन्ह

"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.

शिवसेना गीत

आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जिवाचे रान।
पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्तान।।

अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा।
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।धृ।।

वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हांस
खड्ग घउनि हाती भरली हिंदुत्वाची कास।
लालकिल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास
महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास।
बस पुरे आता ना होउनि देऊ माणुसकीची दैना
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।१।।

धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा
जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा।
अरे हिशेब आम्हीं ठेवत नसतो अशा भेकडांचा
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा।
अरे घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।२।।

कायापालट कोंकणचा ह्या आम्ही करुनि दावू
मराठवाण्या हिरवा शालू आम्ही नेसवुनि दावू।
अरे लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी .......
धूळ चारुनि पुन्हा त्यांना सोने पिकवुनि दावू।
विदर्भ आमुचि शान असे अन् मान असे हो आमुची
कशी छाटुनि देऊ आम्हीं प्राण पणाला लावू।
जळगाव असे हो आमुचे जितके बेळगावही तितके
एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ।
अरे आठवा Bombayचे ह्या मुंबई आम्हीच हो केलेना
जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।३।।

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b (PDF) http://www.shivsena.org/Padadhikari_shivsenaN.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  • २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
  • ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
  • ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
  • ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)