रेणुका चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Renuka Chowdhury (es); রেণুকা চৌধুরি (bn); Renuka Chowdhury (hu); Renuka Chowdhury (ast); Renuka Chowdhury (ca); Renuka Chowdhury (yo); Renuka Chowdhury (de); ରେଣୁକା ଚୌଧୁରୀ (or); Renuka Chowdhury (ga); रेणुका चौधरी (mr); Renuka Chowdhury (nn); Renuka Chowdhury (da); Renuka Chowdhury (sl); رینوکا چودھری (ur); Renuka Chowdhury (fr); Renuka Chowdhury (en); رينوكا شودرى (arz); Renuka Chowdhury (pl); Renuka Chowdhury (nb); Renuka Chowdhury (nl); రేణుకా చౌదరి (te); रेणुका चौधरी (hi); ರೇಣುಕಾ ಚೌಧರಿ (kn); ਰੇਣੂਕਾ ਚੌਧਰੀ (pa); ৰেণুকা চৌধুৰী (as); രേണുക ചൗധരി (ml); Renuka Chowdhury (sv); ரேணுகா சவுத்ரி (ta) política india (es); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); indische Politikerin der Kongresspartei (de); politikane indiane (sq); سیاست‌مدار هندی (fa); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); indisk politiker (sv); פוליטיקאית הודית (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); ਭਾਰਤੀ ਸਿਆਸਤਦਾਨ (pa); ভাৰতীয় ৰাজনীতিবিদ (as); Indian politician (en-ca); இந்திய மாநிலங்களவை உறுப்பினர் (ta); politica indiana (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); femme politique indienne (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (nl); former Union Minister of India and Member of Rajya Sabha (en); Indian politician (en-gb); política indiana (pt); भारतीय राजकारणी (mr); política india (gl); سياسية هندية (ar); indisk politiker (da); سياسيه من الهند (arz) രേണുകാ ചൗധരി, Renuka Chowdary (ml)
रेणुका चौधरी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट १३, इ.स. १९५४
विशाखापट्टणम
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रेणुका चौधरी (जन्म १३ ऑगस्ट १९५४) ह्या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेत राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी भारत सरकारमध्ये महिला आणि बाल विकास आणि पर्यटन मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणूनही काम केले आहे.

प्रारंभिक जीवन[संपादन]

१३ ऑगस्ट १९५४ रोजी मदनपल्ले, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे एर कमोडोर सूर्यनारायण राव आणि वसुंधरा यांची लेक म्हणुन त्यांचा जन्म झाला. रेणुका ही तीन मुलींमध्ये सर्वात मोठी होती. त्यांनी वेल्हॅम गर्ल्स स्कूल, देहरादून येथे शिक्षण घेतले आणि बंगळूर विद्यापीठातून औद्योगिक मानसशास्त्रात बी.ए. केले. रेणुका यांचा १९७३ मध्ये श्रीधर चौधरी यांच्याशी विवाह झाला.[१]

कारकीर्द[संपादन]

चौधरी यांनी १९८४ मध्ये तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला.[२] १९८६ ते १९९८ या काळात त्या सलग दोन वेळा राज्यसभेच्या सदस्य होत्या आणि तेलगू देसम संसदीय पक्षाच्या मुख्य होत्या.[३][४] एच. डी. देवे गौडा यांच्या मंत्रिमंडळात १९९७ ते १९९८ त्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री होत्या. १९९८ मध्ये त्यांनी तेलुगु देसम पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ आणि २००४ मध्ये, त्यांनी खम्मम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत अनुक्रमे १३व्या आणि १४व्या लोकसभेत निवडून आल्या. त्यांच्या इतर पदांमध्ये अर्थ समिती (१९९९-२०००) आणि महिला सक्षमीकरण समिती (२०००-०१) च्या सदस्यत्वांचा समावेश आहे.[१]

मे २००४ मध्ये त्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये पर्यटन राज्यमंत्री झाल्या. जानेवारी २००६ ते मे २००९ या काळात त्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होत्या. मे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रेणुका चौधरी यांचा खम्मममधून टीडीपीच्या नामा नागेश्वर राव यांनी १,२४,४४८ मतांनी पराभव केला होता.[५] चौधरी ह्या काँग्रेसचे प्रवक्ते बनले आणि सन् २०१२ मध्ये त्यांची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Members Bioprofile". Lok Sabha. 26 May 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Phadnis, Aditi (12 February 2018). "Renuka Chowdhury, 'Rajini of Rajya Sabha' unlikely to make a return". Business Standard. Business Standard. Business Standard Private Limited. 26 May 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Untitled - Rajya Sabha" (PDF). Rajya Sabha. 26 May 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Political Complexion of Rajya Sabha" (PDF). Rajya Sabha. 26 May 2020 रोजी पाहिले.
  5. ^ Election Commission of India, General Elections, 2009 (15th LOK SABHA)
  6. ^ (25 March 2012) 55 elected unopposed to Rajya Sabha the Hindu, retrieved 30 March 2012