Jump to content

भारतीय पक्ष्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची श्रेणी (Order) आणि कुल (Family) नुसार यादी.


ग्रीबाद्या (Podicipediformes)[संपादन]

ग्रीबाद्य (Podicipedidae)[संपादन]

टिबुकली (Little Grebe or Dabchick) सह काही ग्रीब पक्ष्यांचे ग्रीबाद्य कूल (कुळ) आहे.

पेशीगलाद्या (Pelecaniformes)[संपादन]

पेशीगलाद्य (Pelecandidae)[संपादन]

पेलिकन पक्षी पेशीगलाद्य कुळातील आहेत.

कर्मोराद्य (Phalacrocoracidae)[संपादन]

सापमान्या आणि लहान पाणकावळा पक्ष्यांचे कुळ.

बकाद्या (Ciconiiformes)[संपादन]

बकाद्य (Ardeidae)[संपादन]

बकाद्य कूळ हे बगळ्यांचे (Herons, Egrets, Bitterns) कूळ आहे.

बलाकाद्य (Ciconiidae)[संपादन]

करकोचे बलाकाद्य कुळातील पक्षी आहेत.

अवाकाद्य (Threskiornithidae)[संपादन]

चमच्या (पक्षी) आणि काळा अवाक सह इतर अवाक पक्ष्यांचे हे कूल आहे.

रोहिताद्य (Phoenicopteridae)[संपादन]

रोहित (पक्षी) आणि इतर रोहितांचे रोहिताद्य कूळ आहे.

कादंबाद्या (Anseriformes)[संपादन]

कादंबाद्य (Anatidae)[संपादन]

हे बदकांचे (Ducks, Geese, Swans) कूळ आहे.

श्येनाद्या (Falconiformes)[संपादन]

गृध्राद्य (Accipitridae)[संपादन]

घार, ब्राम्हणी घार, शिक्रा, कापशीसह (Kite), (Eagle), (Vulture), (Harrier) या पक्ष्यांचे कादंबाद्य कूळ आहे.

श्येनाद्य (Falconidae)[संपादन]

बहिरी ससाणा, शाही ससाणासह ससाणे (Falcon), (Falconet) खरुची (Kestrel) या पक्ष्यांचा समावेष श्येनाद्य कुळात होतो.

कुक्कुटाद्या (Galliformes)[संपादन]

कुक्कुटाद्य (Phasianidae)[संपादन]

कुक्कुटाद्या श्रेणीतील कुकुटाद्य कुळात कोंबडी, मोर, तितर वगैरे पक्षी आहेत.

क्रौंचाद्या (Gruiformes)[संपादन]

दुर्लावाद्य (Turnicidae)[संपादन]

लावे (Bustard-Quail) पक्षी या कुळात आहेत.

क्रौंचाद्य (Gruidae)[संपादन]

सायबेरियन क्रौंच, सारस क्रौंच वगैरे क्रौंच पक्षी क्रौंचाद्य कुळात येतात.

कारंडवाद्य (Rallidae)[संपादन]

जांभळी पाणकोंबडी, काळी पाणकोंबडी वगैरे (Moorhen), (Waterhen), (Rail), (Crake) या कुळात येतात.

हूक्कुटाद्य (Otididae)[संपादन]

माळढोक, तणमोर हे पक्षी हूक्कुटाद्य कुळातील आहेत.

टिट्टिभाद्या (Charadriiformes)[संपादन]

जकानाद्य (Jacanidae)[संपादन]

कमळपक्षी जकानाद्य कुळातील पक्षी आहे.

टिट्टिभाद्य (Charadriidae)[संपादन]

टिटवीसह (Lapwing), (Plover), (Sandpiper), (Stint) पक्षी टिट्टिमाद्य कुळाचे आहेत.

जललावाद्य (Rostratulidae)[संपादन]

(Painted Snipe) हा पक्षी जललावाद्य कुळाचा सदस्य आहे.

उच्चराद्य (Recurvirostridae)[संपादन]

शेकाट्या (Black-winged Stilt) आणि उचाट (Avocet) हे उच्चराद्य पक्षी आहेत.

पिकविंकाद्य (Burhinidae)[संपादन]

पिकविंकाद्य कुळात (Stone Curlew), (Thick-knees) या पक्ष्यांचा समावेष होतो.

धाविकाद्य (Glareolidae)[संपादन]

भारतीय धावी आदी धावी पक्षी (Courser), (Pratincole) या कुळातील आहेत.

सुरयाद्य (Laridae)[संपादन]

(Gulls), (Terns) पक्षी या कुळातील आहेत.

कपोताद्या (Columbiformes)[संपादन]

पाकोराद्य (Pteroclidae)[संपादन]

(Sandgrouse) पक्षी या कुळातील आहेत.

कपोताद्य (Columbidae)[संपादन]

कपोताद्य वर्ग हरियालसह कबुतर (Pigeons) आणि (Doves) पक्ष्यांचे कूळ आहे.

शुकाद्या (Psittaciformes)[संपादन]

शुकाद्य (Psittacidae)[संपादन]

(Parakeets), (Lorikeets) आदी पोपट या कुळातील आहेत.

कोकिलाद्या (Cuculiformes)[संपादन]

कोकिलाद्य (Cuculidae)[संपादन]

चातक, पावशा, कोकिळ, भारद्वाज वगैरे पक्षी या कुळातील आहेत.

घूकाद्या (Strigiformes)[संपादन]

घूकाद्य (Strigidae)[संपादन]

हुमा घुबड, पिंगळा आदी घुबड पक्ष्यांचे हे कूळ आहे.

उलूकाद्य (Tytonidae)[संपादन]

गव्हाणी घुबड हा उलूकाद्य कुळातील पक्षी आहे.

रात्रिंचराद्या (Caprimulgiformes)[संपादन]

रात्रिंचराद्य (Caprimulgidae)[संपादन]

रातवा, रानरातवा पक्षी या कुळातील आहेत.

पंगुलाद्या (Apodiformes)[संपादन]

पुंगुलाद्य (Apodidae)[संपादन]

पंकोळी पक्ष्यांचे पुंगुलाद्य हे कूळ आहे.

धीवराद्या (Coraciiformes)[संपादन]

धीवराद्य (Halcyonidae)[संपादन]

खंड्यासह आणखी काही धीवर पक्षी या कुळात आहेत.

पत्रिंगाद्य (Meropidae)[संपादन]

वेडा राघू पक्षी या कुळातील आहे.

चासाद्य (Coraciidae)[संपादन]

हे चास पक्ष्याचे कूळ आहे.

उपूपाद्य (Upupidae)[संपादन]

हुदहुद्या पक्ष्याचा समावेष हा कुळात होतो.

धनचंचवाद्य (Bucerotidae)[संपादन]

मलबारी धनेश, राखी धनेश वगैरे धनेश पक्ष्यांचे धनचंचवाद्य हे कूळ आहे.

ताम्रकाराद्या (Piciformes)[संपादन]

ताम्रकाराद्य (Capitonidae)[संपादन]

तांबट या कुळातील सदस्य आहे.

सूत्रधराद्य (Picidae)[संपादन]

सोनपाठी सुतार सह आणखी सुतार पक्षी या कु़ळात आहेत.

काकाद्या (Passeriformes)[संपादन]

चंडोलाद्य (Alaudidae)[संपादन]

हे चंडोल पक्ष्यांचे कूळ आहे.

पंकालुकाद्य (Hirundinidae)[संपादन]

पंकोळी आणि मार्टीन पक्षी या कुळातील आहेत.

सौनिकाद्य (Laniidae)[संपादन]

भुरा खाटीक सह सर्व खाटीक पक्ष्यांचे कूळ सौनिकाद्य आहे.

पीलकाद्य (Oriolidae)[संपादन]

हळद्या पक्षी या कुळातील आहे.

कोष्ठपालाद्य (Dicruridae)[संपादन]

सर्व कोतवाल (पक्षी) कोष्ठपालाद्य कुळातील आहेत.

सारिकाद्य (Sturnidae)[संपादन]

मैना. डोंगरी मैना, पळस मैना वगैरे मैना पक्षी या कुळातील आहेत.

काकाद्य (Corvidae)[संपादन]

कावळे, दयाळ (पक्षी), चास आणि रेव्हन आदी पक्ष्यांचे काकाद्य कूळ आहे.

अंगारकाद्य (Campephagidae)[संपादन]

निखार (Minivet) आणि कुहुवा (Cuckoo-Shrike) पक्ष्यांचे कुळ.

सुभगाद्य (Irenidae)[संपादन]

सुभग, हरेवा वगैरे पक्ष्यांचे कूळ सुभगाद्य आहे.

वल्गुवदाद्य (Pycnonotidae)[संपादन]

काळ्या शेंडीचा बुलबुल, लाल बुडाचा बुलबुल सह बुलबुल पक्षी या कुळातील आहेत.

जल्पकाद्य (Muscicapidae)[संपादन]

हे सातभाई, वटवटे, कस्तूर आणि स्वर्गीय नर्तकासह सर्व नर्तक पक्ष्यांचे कूळ आहे.

टीटाद्य (Paridae)[संपादन]

बल्गुली (Tit) पक्षी या कुळात येतात.

रजकाद्य (Motacillidae)[संपादन]

परीट (पक्षी) आणि चरचरी (Pipit) पक्ष्यांचे कुळ.

पुष्पचूषाद्य (Dicaeidae)[संपादन]

फुलटोचे (Flowerpecker) पक्षी पुष्पचूषाद्य कुळात आहेत.

शिंजिराद्य (Nectariniidae)[संपादन]

या कुळात जांभळा सूर्यपक्षी, पंचरंगी सूर्यपक्षी यांच्यासह इतर सूर्यपक्षी आणि Spiderhunter यांचा समावेष आहे.

चक्षुष्याद्य (Zosteropidae)[संपादन]

हे कूळ चष्मेवाला (White-Eye) या पक्ष्यांचे आहे.

चटकाद्य (Ploceidae)[संपादन]

यात चटक म्हणजे चिमणी हा पक्षी मुख्य मानला असल्याने या कुळाचे नाव चटकाद्य. पीतकंठी चिमणी, सुगरण, लाल मुनिया, ठिपकेदार मुनिया हे पक्षी चटकाद्य कुळात येतात.

अरुणचटकाद्य (Fringillidae)[संपादन]

(Rosefinch) आदी फिंच पक्षी या कुळात आहेत.

बंटिंगाद्य (Emberizidae)[संपादन]

भारीट (Bunting) पक्ष्यांचा समावेष बंटिंगाद्य कुळात झालेला आहे.