रोहित (पक्षी)
रोहित (शास्त्रीय नाव : Phoenicopterus Phoenicoparrus, फिनिकोप्टेरस फिनिकोपारस; इंग्लिश: Flamingo, फ्लेमिंगो ;) हा पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात. याच्या चार प्रजाती अमेरिका खंडांत व दोन प्रजाती जुन्या जगात आढळतात.
अनुक्रमणिका
वास्तव्य[संपादन]
जगामध्ये मुख्यत्वे उष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे. मोठे मोठे हजारोंच्या संख्येने यांचे थवे आढळून येतात. भारतात पण हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो.
भारतातील स्थान[संपादन]
रोहित पक्षी भारतात स्थानिक स्थलांतर करतात. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुढगाभर उथळ पाणी असते अश्या ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात व पिल्लांना वाढवतात.पाणी व उन पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. तसेच कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचे शहर असे म्हणतात. आफ्रिकेत पण व्हिक्टोरिया सरोवर, टांगलिका सरोवरामध्ये अशीच मोठी मोठी रोहित पक्ष्याची वसतीस्थाने आहेत.
पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात.
वर्णन[संपादन]
काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात.
जाती[संपादन]
बऱ्याच स्त्रोतांनुसार रोहित पक्ष्याच्या सहा जाती आढळून येतात, आणि त्यांना सामान्यतः एकाच कुळात ठेवले जाते. पैकी अँडियन आणि जेम्सचा रोहित ह्या दोन जातींना फिनिकोप्टेरस ह्या कुळाऐवजी फिनिकोपारस मध्ये बहुधा ठेवले जाते.
जाती | भौगोलिक स्थळ | |
---|---|---|
महा रोहित (फि. रोझस) |
जुने जग | आफ्रिकेचा काही भाग, द. युरोप आणि द. आणि आ. आशिया (मोठ्याप्रमाणावर असलेले रोहित). |
लहान रोहित (फि. मायनर) |
आफ्रिका (उ. ग्रेट् रिफ्ट् व्हॅली) पासून वायव्य भारत (बहुसंख्य रोहित). | |
चिलीयन रोहित (फि. चिलेन्सिस) |
नवे जग | दक्षिण अमेरिका. |
जेम्सचा रोहित (फि. जेम्सि) |
पेरू, चिली, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत. | |
अँडियन रोहित (फि. अँडिनस) |
पेरू, चिली, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत. | |
अमेरिकन रोहित (फि. रुबर) |
कॅरिबियन बेटे, कॅरिबियन मेक्सिको, बेलिझ आणि गालापागोस बेटे. |
खाद्य[संपादन]
याचे मुख्य खाद्य म्हणजे छोटे मासे, किडे, पाणवनस्पती व शेवाळे हे होय.