Jump to content

हुमा घुबड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुमा घुबड
शास्त्रीय नाव Bubo coromandus (Latham)
कुळ घूकाद्य (Strigidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Dusky Eagle-owl, Dusky Horned-owl
संस्कृत उलूक, भासोलूक
हिंदी जंगली घुघू

वर्णन[संपादन]

हुमा घुबड हे साधारण ५८ सें. मी. (२३ इं.) उंचीचे, पिसांची शिंगे असलेले मोठे घुबड आहे. याचा मुख्य रंग धुरकट-राखाडी असून याचे डोळे मोठे, पिवळ्या रंगाचे असतात. हुमा घुबड बसल्यावर याच्या डोक्यावरील पिसे शिंगासारखी वर, एकमेकांजवळ येतात.

वास्तव्य[संपादन]

भारतात सर्वत्र आढळणारा हा पक्षी विशेषतः पठारी भागात, माणसाच्या वस्तीजवळ, पाण्याच्या जवळ, जुन्या चिंच वृक्षांवर, आमरायात वगैरे राहणे पसंत करतो. हुमा घुबडाची एकदा जोडी जमली की कित्येक वर्षे एकाच ठिकाणी राहते. हुमा घुबड भारताशिवाय बांगलादेश, चीन, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड हा देशातही आढळून येतो.

प्रजनन[संपादन]

नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ हुमा घुबडाचा वीणीचा काळ असून मादी एकावेळी २ ते ३ पांढऱ्या रंगाची अंडी देते. सहसा पाण्याजवळच्या उंच झाडावर, काटक्यांच्या मदतीने हुमा घुबड आपले घरटे बांधतात. लहान सस्तन प्राणी, पक्षी, पाली, सरडे, मोठे कीटक हे हुमा घुबडाचे प्रमुख अन्न आहे.