फुलटोचा
Appearance
फुलटोचा (इंग्लिश:Indian Thicbilled Flowerpecker; हिंदी:मोटी चोच फुलचुही) हा एक पक्षी आहे.
ओळखण
[संपादन]हा फुलटोचा आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. त्याचा वरील भागाचा रंग राखाडी पार्श्व हिरवट शेपटीवर पांढरा पट्टा असतो. खालील भागाचा वर्ण पांढरा. छातीवरफिकट रंगाच्या तपकिरी रेषा असतात. नर व मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
[संपादन]या पक्षाचा निवास हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे भूतान, बंगाल देश ते दक्षिणेकडे राजस्थान व गुजरात ते केरळ पर्यंत आढळून येतात.
निवासस्थाने
[संपादन]हा पक्षी पानगळीचे किंवा निमहरितपर्णी जंगले येथे निवास करतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली