ठिपकेदार मुनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ठिपकेदार मुनिया
Scaly breasted Munia I IMG 4769.jpg
शास्त्रीय नाव Lonchura punctulata (Linnaeus)
कुळ चटकाद्य (Ploceidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Scaly-breasted Munia, Spotted Munia

हिंदी नाव : तेलिया मुनिया, सिनेवाज
ठिपकेदार मिनिया हा साधारण १० सें. मी. आकारमानाचा, चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके याची महत्त्वाची ओळख आहे तर थव्याने राहणे हे याचे वैशिष्ट्य आहे. एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहतात.

राजस्थान, पंजाब, हिमालयाचा काही भाग वगळता (हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुनिया सापडतात) संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत.

जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या विणीचा काळ असून त्यासाठी तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची ४ ते ८ अंडी देते. ठिपकेदार मुनिया नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात. एखादा धोका जाणवला की वेडा राघू 'टीर! टीर! टीर!' असा किणकिणणारा आवाज काढून जमिनीवरच्या मुनियांना सावध करतो. लगेच सगळे मुनिया जमिनीवरून उडतात आणि 'पटी! पटी!' अशा मंजूळ आवाज करत एखाद्या झुडपात लपून बसतात. म्हणजे आजूबाजूला एखादा रखवाली करणारा वेडा राघू असणे हे मुनियाच्या फायद्याचे असते. कदाचित जमिनीवर चरणाऱ्या मुनियांच्या हालचालीमुळे उडणारे किडे वेड्या राघूला टिपता येत असावेत.

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.