सुभग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुभग
शास्त्रीय नाव एजिथीना टिफिया [टीप १]
कुळ सुभगाद्य [टीप २]
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश कॉमन आयोरा [टीप ३]
संस्कृत सुभग
हिंदी शाऊबीगी

सुभग (शास्त्रीय नाव: Aegithina tiphia, एजिथीना टिफिया ; इंग्लिश: Common Iora, कॉमन आयोरा ;) ही दक्षिणआग्नेय आशिया या भूभागांत आढळणारी सुभगाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. साधारण १४ सें. मी. आकाराचा सुभग सुंदर शिटी वाजवणारा पक्षी आहे. वीणीच्या काळात नर सुभग वरून काळा आणि खालून पिवळ्या रंगाचा असून पंखावर काळे-पांढरे पट्टे असतात. एरवी नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. मुख्य रंग हिरवट पिवळा फक्त नराची शेपटी काळी तर मादीची हिरवट पिवळी. सुभग पक्षी सहसा जोडीने फिरतात.

आवाज[संपादन]

Common Iora.ogg सुभगचा आवाज ऐका

आढळ[संपादन]

सुभग संपूर्ण भारतभर आढळतो शिवाय पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशातही आढळतो. याची वस्ती मैदानी भाग ते १००० मी. उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागात असते. आकार आणि रंगावरून सुभग पक्ष्याच्या किमान ५ उपजाती आहेत.

खाद्य[संपादन]

सुभग झाडांवर राहणारा [टीप ४] पक्षी असून जुन्या आमराया, जुन्या चिंचेच्या वृक्षांवर, कडुनिंबावर, गावाभोवतालच्या जंगलात हमखास आढळतो. सुभग दिसणे कठीण असले तरी त्याचा आवाज नेहमी ऐकू येतो. हा सतत उद्योगी पक्षी आहे, कीटक शोधत फांद्याफांद्यांवर फिरत राहतो. कीटकांशिवाय अळ्या, कीटकांची अंडी हे याचे खाद्य आहे.

प्रजनन[संपादन]

मे ते सप्टेंबर हा काळ सुभग पक्ष्याचा वीणीचा हंगाम काळ असून याचे घरटे खोलगट पेल्याच्या आकारचे, काटक्या, कोळ्याचे जाळे वगैरे वापरून, २ ते ४ मी. उंच झाडांवर व्यवस्थित बांधलेले असते. अंडी गुलाबी रंगाची व त्यावर जांभळे-तपकिरी रंगाचे ठिपके असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]

तळटिपा[संपादन]

  1. ^ एजिथीना टिफिया (रोमन: Aegithina tiphia)
  2. ^ सुभगाद्य (इंग्लिश: Irenidae, आयरिनिडे)
  3. ^ कॉमन आयोरा (रोमन: Common Iora)
  4. ^ झाडांवर राहणारे (इंग्लिश: Arboreal, आर्बोरियल)

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "सुभगांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)