गव्हाणी घुबड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गव्हाणी घुबड, कोठीचे घुबड
Tyto alba close up.jpg
शास्त्रीय नाव Tyto alba (Scopoli)
कुळ उलूकाद्य (Tytonidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Barn Owl, Screech Owl
संस्कृत कुवय, कुटरू
हिंदी कुरैया, करैल

वर्णन[संपादन]

गव्हाणी घुबड पक्षी हा साधारण ३६ सें. मी. आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्या-पांढर्‍या रंगाचे पट्टे असलेला, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाचा भाग आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. याचे डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहर्‍याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वास्तव्य/आढळस्थान[संपादन]

गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. हे पक्षी एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारती, किल्ले, कडेकपारी, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात.

खाद्य[संपादन]

उंदीर, घुशी, सरडे, पाली हे यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ[संपादन]

या पक्ष्यांचा वीणीचा निश्चीत काळ नाही. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येवू शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना अस्सते. मादी एकावेळी पांढर्‍या रंगाची, गोलसर, ४ ते ७ अंडी देते.

इतर[संपादन]

भारतीय संस्कृतीत हे अपशकुनी मानले गेले आहेत परंतु इंग्लंडमध्ये मात्र गव्हाणी घुबड विद्वतेचे प्रतीक मानले गेले आहे.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.