लहान पाणकावळा
Appearance
लहान पाणकावळा (शास्त्रीय नाव: Phalacrocorax niger, फॅलाक्रॉकरॅक्स नायजेर ; इंग्लिश: Little Cormorant, लिटल कॉरमरंट) हा पाणथळी जागेत आढळणारा, कर्मोराद्य कुळातील पक्षी आहे. हे पक्षी रंगाने काळे व पाणथळी जागेत आढळणारे असल्याने पाणकावळा या नावाने ओळखले जातात. पूर्व आशियातील चीनपासून आग्नेय आशिया व दक्षिण आशियापर्यंतच्या भूप्रदेशांत नदी, तलाव, खाडी, समुद्राजवळील झाडींमध्ये हे पक्षी थव्याने आढळतात. मासे हे यांचे मुख्य खाद्य होत. पाण्यात सूर मारून हे आपले भक्ष्य पकडतात. सूर मारण्यात व पोहोण्यात हे पक्षी अतिशय तरबेज आहेत. परंतु बदकांसारखी खास पिसे नसल्याने त्यांची पिसे चांगलीच ओली होतात. सूर मारल्यानंतर पंख वाळवताना हे पक्षी बऱ्याचदा नदीकाठच्या दगडांवर पंख पसरून वाळवताना दिसतात.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |