पळस मैना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पळस मैना
शास्त्रीय नाव
(Sturnus roseus)
कुळ सारिकाद्य
(Sturnidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश रोझी स्टार्लिंग
(Rosy Starling)
संस्कृत पाटल सारिका
हिंदी गुलाबी मैना

पळस मैना (अन्य नावे : भोरडी (अनेकवचन : भोरड्या), मधुसारिका) हा मैनेसारखा हा मुख्यत्वे गुलाबी रंगाचा पक्षी असून याचे डोके, गळा, छाती, पंख, शेपटी काळ्या रंगाची असते. याच्या डोक्याच्या मागील भागावर मानेकडे येणारी शेंडी असते. कोणी या पक्षास 'गुलाबी मैना' असेही म्हणतात.

पळस मैना हा, पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशिया येथून हिवाळी स्थलांतर करून, जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतात येणारा पक्षी आहे. शेताचे खुले क्षेत्र ते निमवाळवंटी प्रदेश हे त्याचे आवडते ठिकाण आहे. शेतातील कीट, वड, पिंपळ वृक्षांच्या बिया, सावरीच्या फुलांतला मध हे याचे प्रमुख खाद्य आहे.

चित्रदालन[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: