टिबुकली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टिबुकली
Little Grebe (Tachybaptus ruficollis)- Non-breeding- preening after bath in an Indian Lotus (Nelumbo nucifera) Pond in Hyderabad, AP W IMG 7611.jpg
शास्त्रीय नाव Tachybaptus ruficollis (Pallas),
Podiceps ruficollis capensis
कुळ ग्रीबाद्य (Podicipedidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Little Grebe or Dabchick
संस्कृत लघु रक्तकंठक
हिंदी छोटी पनडुब्बी, चुरका

आकार[संपादन]

टिबुकली(डॅबचिक) हा पाठीचा भाग भुर्‍या रंगाचा, पोटाकडे रेशमी पांढर्‍या रंगाचा, शेपटी नसलेला, गुबगुबीत असा साधारण कबुतराएवढा (२३ ते २९ सें. मी.) पाणपक्षी आहे. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात तर विणेच्या काळात नराच्या डोक्याचा आणि मानेचा रंग गडद तपकिरी होतो.

वास्तव्य[संपादन]

टिबुकली संपूर्ण भारतासह, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान येथे जोडीने किंवा लहान थव्यात लहान-मोठ्या तलावात, झिलाणीत राहते.

आढळस्थान[संपादन]

टिबुकली समुद्रसपाटीपासून सुमारे २५०० मीटर उंचीपर्यंत सर्वत्र आढळते.

प्रजाती[संपादन]

टिबुकलीच्‍या रंग आणि आकारावरून किमान नऊ उपजाती आहेत. भारतात आढळणारी एकमेव उपजात Tachybaptus ruficollis capensis ही आहे.

खाद्य[संपादन]

टिबुकली हा पाणकीटक, बेडूक, अळ्या व इतर छोटे जलचर खाणारा पक्षी आहे. याचे घरटेही पाण्यात तरंगणारे व छोटे असते. ते काटक्यांचे बनविलेले असते.

प्रजनन काळ[संपादन]

विणीचा हंगाम एप्रिल ते ऑक्टोबर असून टिबुकली मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढर्‍या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.


पहा पक्ष्यांची मराठी नावे

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.