पंचरंगी सूर्यपक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पंचरंगी सूर्यपक्षी
Purple-rumped Sunbird (Male) I2 IMG 7524.jpg
शास्त्रीय नाव Nectarinia zeylonica,
Leptocoma zeylonica
कुळ शिंजिराद्य (Nectariniidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Purple-rumped Sunbird
हिंदी शक्कर खोरा

आकार[संपादन]

पंचरंगी सूर्यपक्षी हा चिमणीपेक्षा लहान अंदाजे १० सें. मी. आकाराचा असतो. नराचे डोके, छातीचा भाग हिरवा, नारिंगी, जांभळ्या रंगाचे मिश्रण असते तर मागील भाग निळसर जांभळा, पोटाखालचा भाग पिवळा. तर मादीचा वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, साधारण जांभळ्या सूर्यपक्षी मादी सारखीच फक्त गळा राखाडी-पांढरा, पोटाखालाचा भाग जास्त पिवळा.

वास्तव्य/आढळस्थान[संपादन]

सातपुड्याच्या दक्षिण भागात (भारतीय द्वीपकल्प) श्रीलंका, बांगलादेश इ. ठिकाणी याचे वास्तव्य आहे.


प्रजनन काळ[संपादन]

साधारणपणे मार्च ते मे हा वीण हंगाम असून मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते, मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.याचे घरटे जांभळ्या सूर्यपक्षी सारखेच लटकणारे असते,

चित्रदालन[संपादन]

गोवा, नोव्हेंबर १९९७


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.