तणमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तणमोर
Eupodotis indica.jpg
शास्त्रीय नाव Sypheotides indicus /
Eupodotis indica
कुळ हूक्कुटाद्य (Otididae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Lesser Florican
हिंदी लीख

वर्णन[संपादन]

तणमोर पक्षी साधारण ४५ सें.मी. आकाराचा, कोंबडीएवढा आहे. वीण काळात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजुने एक तुरा येतो तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात मातकट रंगाचे त्यावर तुटक काळ्या रेषा असलेले. यांचे शेपूट आखूड असते. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसते.

वास्तव्य/आढळस्थान[संपादन]

भारताचा पूर्वोत्तर भाग सोडून तणमोरचे इतरत्र वास्तव्य आहे. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. तणमोर हे उंच गवताळ भागात आणि शेताच्या प्रदेशात सहसा एकटे राहणे पसंत करतात.

खाद्य[संपादन]

गवताचे अंकुर {कोंब), धान्य, कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ[संपादन]

जुलै ते ऑक्टोबर हा काळ तणमोर पक्ष्यांचा वीणीचा काळ असून गवताच्या रांजीत, शेतातील रोपांमध्ये मादी घरटे तयार करते आणि त्यात हिरवट-पिवळ्या रंगाची त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली ३ ते ४ अंडी देते. पिलांचे संगोपन करण्याची जबाबदारी एकटी मादी पेलते.

वीण काळात नर मादीला आकर्षित करण्यासाठी आणि साम्राज्य निश्चितीसाठी एकाच जागेवर उंच उंच उड्या मारतो. नराच्या या सवयीमुळेच शिकार्‍यांचे लक्षही त्याच्याकडे सहजपणे वेधले जाते. हे पक्षी दुर्मिळ होत चालले असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.