कमळपक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमळपक्षी,पियू
Pheasant-tailed Jacana (Hydrophasianus chirurgus)- Breeding in an Indian Lotus (Nelumbo nucifera) Pond in Hyderabad, AP W IMG 7860.jpg
शास्त्रीय नाव
(Hydrophasianus chirurgus)
कुळ जकानाद्य
(Jacanidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश
(Pheasant-tailed Jacana)
संस्कृत जलमंजोर
हिंदी जलकपोत, पिहो

कमळपक्षी हा दलदलीत, तलावात आणि कमळवेलींच्या तळ्यात आढळणारा साधारण ३१ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. वीणीच्या हंगामात नर पियूला कोयत्याच्या आकाराची लांब आणि टोकदार शेपटी असते. वीण काळानंतर ही शेपटी झडून पडते. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. छातीच्या वरील भागात काळा पट्टा, गळ्याचा भाग पांढरा, चोच व मानेचा भाग पिवळा, डोळ्याजवळून एक उभी, लांब काळी रेघ, उर्वरीत पाठ, पोट इ. तपकिरी रंगाचे. यांच्या पायाची बोटे लांब असतात. वीण काळात नराला शेपटी असते तर त्याचा तपकिरी रंग जास्त गडद होतो.

कमळपक्षी एकट्याने किंवा थव्याने तलावात, कमळवेलींच्या आसापास दिवसभर पोहतांना दिसतात. हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत भारतभर सर्वत्र आढळ्तो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार हा देशातही याची वस्ती आहे.

कीटक, पाण वनस्प्तींच्या बिया, त्यांचे कोंब हे कमळपक्ष्याचे खाद्य असून तो शिंगाड्याच्या किंवा कमळाच्या पानावर आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ३ ते ४, चमकदार हिरवट-तपकिरी रंगाची अंडी देते. कमळपक्ष्याची मादी बहुपतिकत्व स्वभावाची असून पिलांचे संगोपन नर कमळपक्षी करतो.

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.