Jump to content

विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकल्पःबावन्नकशी २०१० या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रकल्प बावन्नकशी २०१०

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)







मराठी विकिपिडीयामध्ये २०१० या वर्षात किमान २५०० मौलिक लेखांची भर घालणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. एका वर्षातील प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे एका सदस्याने एकुण ५२ मौलिक लेखांची भर घालणे आणि अश्या किमान ५२ समविचारी सदस्यांनी मिळून एका वर्षात २५०० लेखांचा आकडा गाठणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप राहील.

जे सदस्य आठवड्याला एक लेख हे बंधन पाळू शकत नाहीत तेही या प्रकल्पात सामिल होऊ शकतात. किमान एक ते जास्तीत जास्त कितीही लेख एक सदस्य लिहू शकतो. लेखांचा दर्जा हे मुख्य मानक असून बावन्नकशी हे नाव फक्त सुचक आहे.

मराठी विकिपिडीयामध्ये भर घालण्यासाठी जाणीवपुर्वक सामुहिक प्रयत्न करणे हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. जाणकारांनी या प्रकल्पात सहभागी होऊन आपल्या मातृभाषेतील हा विश्वकोश अधिक सन्माननीय करण्यात हातभार लावावा ही विनंती. इच्छूक सदस्यांनी आपल्या नावांची खालील यादीत नोंद करावी. चर्चा पानावर आपली मते, सुचना, व दुरुस्त्या मांडाव्यात.

या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

समसमीक्षा

[संपादन]

या प्रकल्पातील लेखांचे समसमिक्षण सदस्यांद्वारा समसमीक्षा पृष्ठ येथे केल्या जावे. समसमिक्षीत लेखांची यादी समसमीक्षित बावन्नकशी लेख इथे नोंदवावी.