वीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पारंपारिक वीट भट्टी
पारंपारिक वीट भट्टी परीसराचे दृश्य

वीट हे इमारत बांधकामाचे साहित्य आहे. त्याचा वापर भिंती फरसबंदी व इतर ठिकाणच्या बांधकामात होतो. पारंपारिकरित्या वीट म्हणजे एक एकक/आयताकार ठोकळा जो मातीपासून बनविल्या जातो पण आजकाल कोणताही आयताकार पदार्थ ज्यास सिमेंटच्या मसाल्याद्वारे बांधण्यात येते, त्यास वीट म्हणतात. वीट ही माती, रेती, दगड, कॉक्रिट, औष्णिक विद्युत केंद्रातील राख अथवा चून्याची बनलेलीही असू शकते. वीटा या अनेक पदार्थानी, अनेक वर्गीकरणात, अनेक आकारात व प्रकारात बनविल्या जातात. या सर्व गोष्टीत स्थानांनुसार व कालावधीनुसार बदल घडतो.त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यातील दोन मुख्य प्रकार म्हणजे भाजलेल्या व न-भाजलेल्या वीटा होय.

यातील 'ठोकळा' हा प्रकार बांधकामासाठी असलेल्या आयताकार एककाकडे निर्देश करतो. तोही वेगवेगळ्या साहित्याचा बनविलेला व वेगवेगळ्या आकारात राहू शकतो.साधारण वीटेपेक्षा हा थोडा वजनी असतो. त्याला हलका करण्यास मध्ये एक पोकळी निर्माण केली जाते.

भाजलेल्या वीटा हे पुष्कळ काळ टिकणारे व मजबूत बांधकाम साहित्य आहे.त्याचा उल्लेख 'कृत्रिम दगड' असाही कधीकधी करण्यात येतो. याचा उपयोग ५००० ख्रिस्तपूर्व या काळापासून करण्यात येत आहे. न-भाजलेल्या व नुसत्या हवेत वाळवलेल्या वीटांचा इतिहास तर त्याहीमागे जातो. त्यात एक जास्तीचे साहित्य म्हणून तणस अथवा गवत रहात होते. ते वापरुन तयार केलेली वीट एकसंध रहात असे व ती पाण्याने ओघळण्याची शक्यता अतिशय कमी रहात असे.

बांधकामादरम्यान वीटा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने रचण्यात येतात. त्यांना एकत्रितपणे सांधण्यासाठी वापरण्यात येणारा 'बंधक' (बांधणारा या अर्थाने) (अथवा स्थानिक भाषेत मसाला) हा वेगवेगळ्या पदार्थापासून बनविण्यात येतो. त्याने या वीटांची बांधणी होते व एक बांधकाम उभे राहते.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.