पर्यावरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी शब्दबांधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याखेनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात.[१] वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तपमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. [२] मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणार्‍या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय.[३]


मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात.[४] सजीवांना त्यांच्या जीवन संघर्ष आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात.[संदर्भ हवा] पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलेते असतात.[५]


पर्यावरण विषयक ग्रंथ[संपादन]

ललित[संपादन]

ललितेतर[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]


संदर्भ[संपादन]