बेकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेरोजगारी या पानावरून पुनर्निर्देशित)

बेकारी म्हणजे किमान वेतन स्विकारून व्यक्ती काम करण्यास तयार असणे परंतु कामाची उपलब्धता नसणे. बेकारी म्हणजे व्यक्तीला उत्पन्नाचे साधन कुठलेही नसणे असेही म्हणता येते. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा कामाची उपलब्धता कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेत बेकारी किंवा बेरोजगारी आहे असे म्हणता येते. भारतात विशेषत: ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या तीव्र आहे असे मानतात कारण कामाची उपलब्धता कमी आहे. बेकारीमुळे दारिद्र्य येते. देशातील करण्याजोग्या वयोगटातील एकूण [[लोकसंख्या] भागिले बेरोजगार लोकांची संख्या असा भागाकार मांडला की देशातील बेकारी दर काढता येतो. अशी सरासरी काढताना अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात जसे देशाच्या शासनाची धोरणे, देशातील जनतेचा वयोगट वगैरे. बेकारी ही समाजासाठी एक वाईट गोष्ट आहे तरीही काही प्रमाणात बेकारी असणे नैसर्गिक आहे.

उपाययोजना[संपादन]

बेकारी वाढल्यावर सरकार रोजगार वाढविण्याच्या ध्येय ठेवते व नवीन प्रकल्प हाती घेते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळून नवीन नोकऱ्या तयार होतात. परिणामी बेकारी कमी होते. परंतु सरकारी खर्च वाढतो. त्यामुळे कर वाढतात. शिक्षणाचे प्रमाण वाढल्यावर नोकरी मिळते असे नाही. मात्र कौशल्याधारीत शिक्षण जसे की इलेक्ट्रिशियन, घेतले तर नोकरीची शक्यता जास्त असते. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे रोजगार निर्मितीचा प्रश्न कमी होऊ शकतो. परंतु ही दुधारी तलवार आहे. काही वेळा यामुळे प्रश्न वाढतो. औद्योगिकीकरणातून बेकारी कमी होऊ शकते. काही वेळा सरकार रोजगार विनिमय केंद्र चालवते. जगातील काही भागांमध्ये, बेरोजगार लोकांना मदत करणारे असणे सामाजिक संस्था आहेत. या स्ंस्था कौशल्याप्रमाण काम शोधण्यास मदत करतात.