पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा २०१६-१७ | |||||
न्यू झीलँड | पाकिस्तान | ||||
तारीख | ११ – २९ नोव्हेंबर २०१६ | ||||
संघनायक | केन विल्यमसन | मिस्बाह-उल-हक (१ली कसोटी) अझहर अली (२री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉस टेलर (१५०) | बाबर आझम (१४२) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउथी (१३) | मोहम्मद आमीर (७) सोहेल खान (७) |
दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंड दौरा केला.[१][२] दोन कसोटी सामन्यांसाठी ख्राईस्टचर्च आणि हॅमिल्टन या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.[३][४]
१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली.[५] परंतु पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
दुसऱ्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यू झीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.[६][७]
संघ
[संपादन]न्यूझीलंड[८] | पाकिस्तान[९] |
---|---|
- मिस्बाह-उल-हकच्या सासऱ्यांचे देहावसन झाल्याने त्याला दौरा अर्धवट सोडून जावे लागले आणि त्याच्या ऐवजी दुसऱ्या कसोटीसाठी अझहर अलीची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.[१०]
- त्यानंतर पहिल्या कसोटीमध्ये षटकांची गती कमी राखल्याने मिस्बाह-उल-हकवर एका सामन्याची बंदी लादण्यात आली आणि यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नसता.[११]
- दुसऱ्या कसोटीमध्ये न्यू झीलंड संघात जेम्स नीशॅम ऐवजी मिचेल सॅंटनरची निवड करण्यात आली.[१२]
- गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ट्रेंट बोल्ट ऐवजी डग ब्रेसवेलला दुसऱ्या कसोटीसाठी न्यू झीलंड संघात स्थान मिळाले.[१३]
सराव सामना
[संपादन]प्रथम श्रेणी: न्यू झीलंड अ वि पाकिस्तानी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड अ, फलंदाजी
- तीनही दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी
- पावसामुळे १ल्या दिवसाचा खेळ रद्द.
- कसोटी पदार्पण: जीत रावल आणि कॉलिन दी ग्रॅंडहोम (न्यू).
- कर्णधार म्हणून ५० कसोटी खेळणारा मिसबाह उल हक हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- कॉलिन दी ग्रॅंडहोम हा पदार्पणात पाच बळी मिळवणारा न्यू झीलंडचा आठवा गोलंदाज आणि पहिल्या डावातील त्याची गोलंदाजी कामगिरी ही १९५१ मधील इंग्लंडविरुद्ध ॲलेक्स मॉयरच्या कामगिरीला मागे टाकून न्यू झीलंडतर्फे पदार्पणातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१४]
- नील वॅग्नरचे (न्यू) १०० कसोटी बळी पूर्ण. सर्वात जलद १०० कसोटी बळी पूर्ण करणारा तो न्यू झीलंडचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज.[१५]
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, गोलंदाजी.
- १ल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचा खेळ होऊ शकला.
- ३ऱ्या दिवशी पावसामुळे फक्त ३८.१ षटकांचा खेळ होऊ शकला.
- कसोटी पदार्पण: मोहम्मद रिझवान (पा)
- अझहर अलीचा (पा) कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[१०]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व प्रमुख मालिकांचे सामने आणि तारखा". इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट: प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे". न्यू झीलंड हेराल्ड (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये दिवस-रात्र कसोटीच्या यजमान पदासाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड. २७ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यू झीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो. २७ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ख्राईस्टचर्च कसोटी ठरवलेल्या वेळेनुसार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "शेवटच्या नाट्यमय सत्रात न्यू झीलंडने विजयश्री खेचून आणली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानला बाद करून न्यू झीलंडचा थरारक २-० विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान कसोटीसाठी गुप्टिलला वगळले; रावल, टॉड ॲस्टलची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंड दौऱ्यासाठी शर्जील खानची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "मिसबाह हॅमिल्टन कसोटीला मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "षटकांची गती कमी राखल्याने मिस्बाह-उल-हकवर एका सामन्याची बंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "सॅंटनर ऐवजी नीशॅम". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दुसऱ्या कसोटी मधून बोल्ट बाहेर, ब्रेसवेलची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दी ग्रॅंडहोमच्या सहा बळींनी पाकिस्तान उध्वस्त". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वॅग्नर रेसेस टू १०० विकेट्स, अझहर क्रॉल्स टू ३१". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.