Jump to content

पहिले महायुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पहिले जागतिक महायुद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिले महायुद्ध
वरून सव्य पद्धतीने: पश्चिम आघाडीवरील खंदक, खंदक ओलांडताना ब्रिटिश मार्क ४ रणगाडे, दार्दानेल्लेच्या लढाईत पाणसुरूंगास धडकून एचएमएस इर्रे‍झिस्टिबल हे रॉयल नेव्हीचे लढाऊ जहाज बुडताना, गॅस-मुखवटे घालून व्हिकर्स मशीनगन चालवणारे सैनिक, जर्मन आल्बाट्रोस डी.३ जोडपंखी विमाने
वरून सव्य पद्धतीने: पश्चिम आघाडीवरील खंदक, खंदक ओलांडताना ब्रिटिश मार्क ४ रणगाडे, दार्दानेल्लेच्या लढाईत पाणसुरूंगास धडकून एचएमएस इर्रे‍झिस्टिबल हे रॉयल नेव्हीचे लढाऊ जहाज बुडताना, गॅस-मुखवटे घालून व्हिकर्स मशीनगन चालवणारे सैनिक, जर्मन आल्बाट्रोस डी.३ जोडपंखी विमाने
दिनांक इ.स. १९१४ - इ.स. १९१८
(युद्धबंदी)
२८ जून, इ.स. १९१९ रोजी घडलेला व्हर्सायचा तह
स्थान युरोप, आफ्रिका, मध्यपूर्व, प्रशांत महासागरी बेटे, चीन & उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका
परिणती दोस्त राष्ट्रांचा विजय
  • प्रशियन, रशियन, ओस्मानी, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यांचा अस्त
  • युरोप व मध्यपूर्वेत नवीन देशांची निर्मिती
युद्धमान पक्ष
दोस्त राष्ट्रे
फ्रान्स फ्रान्स
युनायटेड किंग्डम ब्रिटिश साम्राज्य,
रशिया रशियन साम्राज्य
इटलीचे राज्य
Flag of the United States अमेरिका
रोमेनिया रोमेनियाचे राज्य
जपान जपानी साम्राज्य
सर्बिया सर्बियाचे राज्य
बेल्जियम ध्वज बेल्जियम
ग्रीस ग्रीसचे राज्य
पोर्तुगाल पोर्तुगाल
मॉंटेनग्रो
केंद्रवर्ती सत्ता
जर्मन साम्राज्य जर्मन साम्राज्य
ऑस्ट्रिया-हंगेरी
ओस्मानी साम्राज्य
बल्गेरिया
सेनापती
फ्रान्स रेमॉं प्वांकारे

फ्रान्स जोर्ज क्लेमेन्सो
फ्रान्स फेर्डिनॉंड फॉश
युनायटेड किंग्डम एच.एच. आस्क्विथ
युनायटेड किंग्डम डेव्हिड लॉइड जॉर्ज
युनायटेड किंग्डम डग्ल्स हेग
रशिया दुसरा निकोलाय
रशिया निकोलाय निकोलायव्हिच
आंतोन्यो सालांद्रा
वित्तोरियो ओर्लांडो
लुइजी कादोर्ना
अमेरिकावूड्रो विल्सन
अमेरिकाजॉन पर्शिंग

जर्मन साम्राज्य दुसरा विल्हेल्म

जर्मन साम्राज्य पाउल फॉन हिंडनबुर्ग
जर्मन साम्राज्य एरीख लूडेनडॉर्फ
पहिला फ्रांत्स योसेफ
पहिला कार्ल
कोनराड फॉन ह्यॉट्झेनडोर्फ
पाचवा मेहमेद
एन्वेर पाशा
मुस्तफा कमाल अतातुर्क
पहिला फेर्डिनान्ड
निकोला शेकोव्ह

सैन्यबळ
रशियन साम्राज्य १२,०००,०००,

युनायटेड किंग्डम ब्रिटिश साम्राज्य ८,८४१,५४१
फ्रान्स फ्रान्स ८,६६०,०००
इटलीचे राज्य ५,०९३,१४०
Flag of the United States अमेरिका ४,७४३,८२६
रोमेनियाचे राज्य १,२३४,०००
जपान जपानी साम्राज्य ८००,०००
सर्बिया सर्बियाचे राज्य ७०७,३४३
बेल्जियम ध्वज बेल्जियम ३८०,०००
ग्रीस ग्रीसचे राज्य २५०,०००
पोर्तुगाल पोर्तुगाल २००,०००
मॉंटेनग्रो ५०,०००
एकूण:४२,९५९,८५०

केंद्रवर्ती सत्ता

जर्मन साम्राज्य १३,२५०,०००
७,८००,०००
२,९९८,३२१
१,२००,०००
एकूण: २५,२४८,३२१

बळी आणि नुकसान
२२,४७७,५०० १६,४०३,०००

पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू अँड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.

दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंतॉंत (रशियन साम्राज्य, फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजूने युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले.

२८ जून् १९१४ रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रांझ फर्डिनांड यांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. या आधीच्या दशकात झालेल्या विविध करारांनी युरोपातील सर्वच देश परस्परांशी बांधले गेले होते. त्यामुळे जेव्हा २३ जुलै रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला निर्वाणीचा इशारा पाठवला, तेव्हा एक राजनैतिक पेचप्रसंग निर्माण झाला. काही आठवड्यांतच प्रमुख सत्ता युद्धात उतरल्या, आणि जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.

सर्वात आधी २४-२५ जुलै रोजी रशियाने आपलया सैन्याची अंशतः जमवाजमव सुरू केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रो-हंगेरियन लोकांनी सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले त्यापाठोपाठ रशियाने ३० जुलै रोजी जाहीरपणे सैन्याची जमवाजमव सुरू केली. जर्मनीने ही जमवाजमव थांबवण्यासाठी रशियाला ३१ जुलैच्या मध्यरात्री रशियाला निर्वाणीचा खलिता पाठवला. रशियाने ही मागणी अमान्य केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध जाहीर केले. रशियाबरोबरच जर्मनीने फ्रान्सलादेखील निर्वाणीचा खलिता पाठवला, आणि फ्रान्सच्या तटस्थतेची हमी म्हणून फ्रेंचांच्या ताब्यातील दोन किल्ले जर्मनीच्या ताब्यात् देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास फ्रान्सने असमर्थता दर्शवली आणि १ ऑगस्ट रोजी सैन्याची जमवाजमव सुरू केली.३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील सीमा दोन्ही बाजूंनी मजबूत होती. त्यामुळे श्लिफेन योजनेनुसार, जर्मनीने तटस्थ बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर आक्रमण करून उत्तरेकडून फ्रान्सवर चढाईची तयारी केली. यात बेल्जियन तटस्थतेचे उल्लंघन झाल्यामुळे ब्रिटनने ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. मार्नच्या लढाईत जर्मन सैन्याची आगेकूच थोपवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले. त्यानंतर पश्चिम आघाडीवरच्या लढाईला एका प्रचंड वेढ्याचे स्वरूप आले आणि दोन्ही सैन्यांकडून खंदकांची एक मोठी साखळी तयार झाली. १९१७ सालापर्यंत या साखळीत फारसा फरक पडला नाही. पूर्व आघाडीवर रशियाने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध यश मिळवले, पण जर्मन सैन्याने टॅनबेनबर्ग आणि मासुरियन लेक्सच्या युद्धात रशियाचे पूर्व प्रशियावरील आक्रमण परतवून लावले. नोव्हेंबर १९१४ मध्ये, ओस्मानी साम्राज्य केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाले आणि कॉकेशस, मेसोपोटेमिया आणि सिनाई येथे नव्या आघाड्यांवर युद्धाला सुरुवात झाली. १९१५ मध्ये इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाला; १९१६ मध्ये रोमेनिया आणि १९१७ साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले.

मार्च १९१७ मध्ये रशियन सरकार कोसळले आणि नोव्हेंबरमध्ये एक क्रांती झाली आणि पुढील लष्करी पराभवानंतर रशियाला ब्रेस्ट लिटोव्हस्कच्या तहनीद्वारे सेंट्रल पॉवर्सशी संबंधित अटींचा लाभ झाला, ज्यामुळे जर्मनांना महत्त्वपूर्ण विजय मिळाला.१९१८ च्या वसंत ऋतू मध्ये वेस्टर्न फ्रंटला एक आश्चर्यकारक जर्मन आक्षेपार्ह साम्राज्य निर्माण केल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी प्रतिस्पर्धी हल्ल्यांच्या मालिकेमध्ये जर्मन सैन्याला परतवून लावले. ४ नोव्हेंबर १९१८ रोजी, ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्य एक युद्धकलापात मान्य झाले आणि जर्मनीला क्रांतिकारकांशी स्वतःची समस्या होती, ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धनौकेवर सहमती दर्शवली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या विजयाची लढाई संपली.

युद्धाच्या अखेरीस किंवा काही काळानंतर जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य अस्तित्वात नव्हते. नॅशनल बॉर्डरची पुनर्मुद्रण करण्यात आली, अनेक स्वतंत्र राष्ट्रांनी पुनर्संचयित केले किंवा तयार केले, आणि जर्मनीच्या वसाहतींना व्हिक्टर्समध्ये फेकून दिले गेले. १९१९ च्या पॅरिस शांतता परिषदेदरम्यान, बिग फोर (ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इटली) यांनी त्यांच्या करारांची एक श्रृंखला दिली. अशा संघर्षाची पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली. हा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आर्थिक उदासीनता, नूतनीकरण नवीकरण झालेली उत्तराधिकारी राज्ये, आणि अपमान (विशेषतः जर्मनीमध्ये)च्या भावनांनी अखेरीस द्वितीय जागतिक महायुद्धाच्या सुरुवातीला योगदान दिले.

घटनानुक्रम

[संपादन]

इ.स. १९१२

[संपादन]

ऑक्टोबर - पहिल्या बाल्कन युद्धाची सुरुवात

पहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रोबल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली.

युद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते.

महासत्तांची प्रतिक्रिया[संपादन]

[संपादन]

युरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते.

  • रशियाचा बाल्कन लीगच्या स्थापनेत मोठा सहभाग होता. बाल्कन लीगच्या विजयामुळे ऑस्ट्रिया-हंगेरीवर लक्ष ठेवणे रशियाला सुकर होते.
  • फ्रान्सचा बाल्कन युद्धाला संपूर्ण विरोध होता व आपण युद्धात उतरणार नसल्याचे फ्रान्सने रशियाला कळवले.
  • ब्रिटनचा ओस्मान्यांना पाठिंबा होता. परंतु युद्धानंतरच्या वाटणीमध्ये बल्गेरियाला अधिक भूभाग मिळणे तसेच त्राक्या प्रदेशावर रशियापेक्षा बल्गेरियाचे अधिपत्य ब्रिटनच्या दृष्टीने फायदेशीर होते.
  • जर्मनीने ओस्मान्यांना पाठिंबा देत ह्या युद्धाला विरोध दर्शवला. परंतु बल्गेरियाला आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी जर्मनीने सुप्त हालचाली सुरू केल्या.

इ.स.१९१३

[संपादन]

जून - दुसरे बाल्कन युद्ध

दुसरे बाल्कन युद्ध इ.स. १९१३ साली बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रोरोमेनिया असे झाले. पहिल्या बाल्कन युद्धातील विजयादरम्यान ओस्मानी साम्राज्याकडून काबीज केलेल्या भूभागाची वाटणी करण्यात आली. ही वाटणी बल्गेरियाला मान्य नव्हती. ह्यावरून जून १९१३ मध्ये बल्गेरियाने ग्रीससर्बियावर आक्रमण केले. बल्गेरियाच्या रोमेनियासोबतच्या वादामुळे रोमेनियाने देखील ह्या युद्धात सामील होण्याचे ठरवले. युद्धाचा फायदा घेऊन ओस्मानी साम्राज्याने पहिल्या युद्धादरम्यान गमावलेला काही भूभाग परत मिळवला.

सुमारे दीड महिन्यांच्या संघर्षानंतर बल्गेरियाने माघार घेतली. रशियाने ह्या युद्धात न पडण्याचे ठरवल्यामुळे रशिया-बल्गेरिया दोस्ती संपुष्टात आली. ह्याची परिणती रशिया-सर्बिया संबंध बळकट होण्यात झाली ज्यामुळे बाल्कन प्रदेशामध्ये सर्बियाचे वर्चस्व वाढले. ह्यामधूनच ऑस्ट्रिया-हंगेरी व सर्बियामधील संघर्षाला सुरुवात झाली ज्याचे रूपांतर पहिल्या महायुद्धामध्ये झाले. ह्या कारणास्तव दुसरे बाल्कन युद्ध साधारणपणे पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत मानले जाते.

इ.स. १९१४

[संपादन]

जून - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड याची सर्बियामध्ये हत्या झाली. हा ऑस्ट्रिया-हंगेरीचा वारसदार होता.
जुलै - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. फ्रान्स, जर्मन साम्राज्यरशिया यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.
ऑगस्ट - प्रशियाने रशियाफ्रान्सवर युद्धाची घोषणा केली. व बेल्जियमवर हल्ला केला. ब्रिटिश साम्राज्य यामुळे युद्धात ओढले गेले.
सप्टेंबर - मार्न नदी येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेन्चांनी रोखले.
ऑक्टोबर - ओस्मानी साम्राज्य प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.

इ.स. १९१५

[संपादन]

एप्रिल - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच विषारी वायूचा वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला.
मे - इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.

इ.स. १९१६

[संपादन]

फेब्रुवारी - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला १० महिने युद्ध करून घेतला.
मे - जटलॅंडच्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या.
जुलै ते नोव्हेंबर - सोमच्या युद्धात प्रथमच रणगाड्याचा वापर करण्यात आला.

इ.स. १९१७

[संपादन]

एप्रिल - अमेरिका युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
जुलै ते नोव्हेंबर - पास्सकेन्नडायलचे युद्ध.

इ.स. १९१८

[संपादन]

मार्च - प्रशिया व रशिया यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्क येथे युद्धबंदी केली. प्रशियाने पश्चिमेकडे जबरदस्त आघाडी घेतली.
जुलै - प्रशियाची घोडदौड थांबली.
ऑगस्ट - अमेरिकेच्या मदतीने दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या सीमेपार गेली.
ऑक्टोबर - इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. ऑस्ट्रिया-हंगेरी व ओस्मानी साम्राज्याने शांततेची मागणी केली.
नोव्हेंबर - प्रशिया व दोस्त राष्ट्रे यांनी युद्धबंदी केली.

इ.स. १९१९

[संपादन]

जून - व्हर्सायचा तह

व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली.

व्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये.

युद्धमान पक्ष

[संपादन]

दोस्त राष्ट्रे

[संपादन]

कंसात राष्ट्रे युद्धात सहभागी झाली तो दिवस

  • बेल्जियम (४ ऑगस्ट १९१४)
  • ब्राझील (२६ ऑक्टोबर १९१७)
  • ब्रिटिश साम्राज्य (४ ऑगस्ट १९१४)
  • चीन (१४ ऑगस्ट १९१४)
  • कोस्टा रिका (२३ मे १९१८)
  • क्यूबा (७ एप्रिल १९१७)
  • फ्रान्स (३ ऑगस्ट १९१४)
  • ग्रीस (२ जुलै १९१७)
  • ग्वातेमाला (२३ एप्रिल १९१८)
  • हैती (१२ जुलै १९१८)
  • होंडुरास (१९ जुलै १९१८)
  • इटली (२३ मे १९१५)
  • जपान (२३ ऑगस्ट १९१४)
  • लायबेरिया (४ ऑगस्ट १९१७)
  • मोंटेनेग्रो (५ ऑगस्ट १९१४)
  • निकाराग्वा (८ मे १९१८)
  • पनामा (७ एप्रिल १९१७)
  • पोर्तुगाल (९ मार्च १९१६)
  • रोमानिया (२७ ऑगस्ट १९१६)
  • रशिया (१ ऑगस्ट १९१४)
  • सान मारिनो (३ जून १९१५)
  • सर्बिया (२८ जुलै १९१४)
  • सयाम (थायलंड) (२२ जुलै १९१७)
  • अमेरिकेची संयुक्त संस्थाने (६ एप्रिल १९१७)

केंद्रवर्ती सत्ता

[संपादन]
  • ऑस्ट्रिया-हंगेरी (२८ जुलै १९१४)
  • बल्गेरीया (१४ ऑक्टोबर १९१५)
  • प्रशिया (१ ऑगस्ट १९१४)
  • ओस्मानी साम्राज्य (३१ ऑक्टोबर १९१४)

पा‍र्श्वभूमी

[संपादन]
ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक प्रान्सिस फर्डिनांड

२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियमफ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

युरोपाच्या पश्चिम आघाडीवरील युद्ध

[संपादन]

प्रशियाला बेल्जियम जिंकून फ्रान्समध्ये घुसायचे होते व त्यानंतर पॅरिस जिंकून फ्रान्सचा पाडाव करायचा होता. पण मार्ने नदीच्या युद्धात फ्रान्सने प्रशियाला रोखले.

सोमची लढाई

[संपादन]
मुख्य लेख: सोमची लढाई

१ जुलै, इ.स. १९१६ रोजी दोस्त राष्ट्रांनी सोम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांच्या युद्धानंतर दोस्तांचे सैन्य केवळ ८ किलोमीटर खोल पोचू शकले. या लढाईत १० लाख बळी पडले.

पासंडालेची लढाई

[संपादन]

जुलै इ.स. १९१७मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्‍न केला. या खेपेस ३ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही.

वेर्डनची लढाई

[संपादन]
मुख्य लेख: वेर्डनची लढाई

वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. वेर्डन शहराच्या उत्तरेला टेकड्यांमध्ये ही लढाई झाली.

विमी ब्रिजची लढाई

[संपादन]

विमी ब्रिजची लढाई फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले या प्रदेशात लढली गेली. ब्रिटन व प्रशियामध्ये ही लढाई झाली. ९ ते १२ एप्रिल १९१७ या कालावधीत ही लढाई झाली.

लष्करभरती

[संपादन]

युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सक्तीची लष्करभरती करण्यात आली.

देशानुसार सैन्य
देश सैनिकांची संख्या
रशिया रशियन साम्राज्य १,२०,००,०००
जर्मन साम्राज्य प्रशिया १,१०,००,०००
युनायटेड किंग्डम ब्रिटिश साम्राज्य ८९,०४,४६७
फ्रान्स तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ८४,१०,०००
साचा:देश माहिती ऑस्ट्रिया-हंगेरी ७८,००,०००
Flag of the United States अमेरिका ४३,५५,०००

युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध

[संपादन]

युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध मुख्यतः प्रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया या देशांमध्ये झाले. हे युद्ध पश्चिम आघाडीकडील युद्धापेक्षा भयानक होते. येथील युद्ध मुख्यतः उघड्या मैदानात खेळले गेले. इ.स. १९१४ साली ओस्मानी साम्राज्याने रशियावर हल्ला केल्यानंतर युद्ध आशिया खंडापर्यंत पोहोचले. ओस्मानी साम्राज्याने सीरियापॅलेस्टाईनवर हल्ला चढवण्याची धमकी दिली, तेव्हा ब्रिटिश साम्राज्याने इजिप्तमधील आपले सैन्य सीरियापॅलेस्टाईन भूप्रदेशांत उतरवले.

टानेन्नबर्गची लढाई

[संपादन]

मुख्य लेख:टानेन्नबर्गची लढाई
युद्धाच्या सुरुवातीला प्रशियारशियन साम्राज्य यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला.

मासुरियन तलावाची लढाई

[संपादन]

मुख्य लेख:मासुरियन तलावाची पहिली लढाई, मासुरियन तलावाची दुसरी लढाई

  • मासुरियन तलावाची पहिली लढाई

प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.

  • मासुरियन तलावाची दुसरी लढाई

केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेला..

रशियन क्रांती

[संपादन]

मुख्य लेख:रशियन क्रांती (१९०७)
१९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी अलेक्झांड्रा हिच्या व ग्रिगोरी रास्पुतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पुतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला.
मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले.
हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या बोलशेव्हिक पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा तह झाला. यानुसार फिनलॅंड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले.

आफ्रिकेतील युद्ध

[संपादन]

आफ्रिका खंडात प्रशिया, फ्रान्स व युनायटेड किंग्डम इत्यादी युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. पहिल्या महायुद्धात या वसाहतींमध्ये लढाया होत असत. ७ ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी फ्रान्स व ब्रिटनने प्रशियाच्या आधिपत्याखालील टोगोलॅंड जिंकून घेतले. १० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जर्मन नैर्ऋत्य आफ्रिकेतील प्रशियाचे सैन्य दक्षिण आफ्रिकेत शिरले.

आशिया व प्रशांत महासागर क्षेत्रातील युद्ध

[संपादन]

न्यू झीलंडने जर्मन सामोआ (वर्तमान सामो‌आ) ३० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जिंकून घेतले. ११ सप्टेंबर, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन बेटावर हल्ला केला.

:पहिल्या महायुद्धातील सहभागी देश: दोस्त राष्ट्रे हिरव्या रंगात, तर केंद्रवर्ती सत्ता पिवळ्या रंगात

दक्षिणेकडील युद्ध

[संपादन]

बाल्कन युद्ध

[संपादन]

रशियाविरुद्ध लढत असल्यामुळे ऑस्ट्रीया-हंगेरीने स्वतःचे एक तृतीयांश सैन्य सर्बियात घुसवले व सर्बियाची राजधानी बेलग्रेड जिंकून घेतली. कोलुबाराच्या लढाईत सर्बियाने यशस्वीपणे ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. यामुळे १९१४ च्या शेवटी ऑस्टिया-हंगेरीचे सैन्य सर्बियातून परतले.

नवीन डावपेच

[संपादन]

पहिल्या महायुद्धाआधीचे सैनिकी डावपेच व युद्धतंत्रे पहिल्या महायुद्धात निष्फळ ठरली. यामुळे नवीन डावपेच शोधणे आवश्यक ठरले. कुंपणासाठीच्या काटेरी तारा, आधुनिक तोफखाना, मशीन गन यांमुळे खुल्या मैदानात लढणे कठीण झाले. प्रशियाने प्रथमच विषारी वायू वापरला, व या घटनेनंतर सर्वच राष्ट्रांची सैन्ये विषारी वायूंचा वापर करू लागली.

युद्धकाळात नवीन शस्त्रे व युद्धसाहित्य शोधण्याकडे दोन्ही बाजूंचा कल होता. रणगाडे हे यांतील ठळक उदाहरण होय. ब्रिटन व फ्रान्स या राष्ट्रांनी प्रथमच रणगाडे वापरले. प्रशियाने दोस्त सैन्यांकडून जप्त केलेले रणगाडे व स्वतःचे काही रणगाडे, यांचा वापर युद्धात केला.

मार्ने नदीच्या पहिल्या लढाईनंतर दोस्त राष्ट्रांच्या व केंद्रवर्ती सत्तांच्या सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू केला.

नवीन शस्त्रे

[संपादन]

रणगाडा

[संपादन]
मार्क ५ रणगाडा
मार्क ५ रणगाडा

ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य मशीनगनने शत्रूवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलीकडे जात असे.

विमान

[संपादन]

युद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर मशीनगनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते.

मशीन गन

[संपादन]

मशीनगनमुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते.

आरमारी युद्ध

[संपादन]

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत क्रुझर नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले.

युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने प्रशियाची नाविक नाकेबंदी केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरूंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोहचे.

इ.स. १९१६ साली झालेली जुटलॅंडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात उत्तर समुद्रात लढली गेली.

युद्धाचे परिणाम

[संपादन]

आरोग्य व आर्थिक परिणाम

[संपादन]

इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्यरशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया या राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.
१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते.

पहिल्या महायुद्धावरील मराठी पुस्तके

[संपादन]
  • पहिले महायुद्ध (लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे)
  • पहिले महायुद्ध : का झाले? कसे झाले? (लेखक : पंढरीनाथ सावंत)
  • युद्धस्य कथा रम्या (आगामी -लेखक : माणिक वाळेकर)