मंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

देशाचे सर्वसाधारण देशांतर्गत उत्पादन (gross domestic product) जर सलग दोन त्रैमासिकांमध्ये कमी झाले तर त्याला मंदी असे म्हणतात. यामुळे अर्थकारण मंदावत. सर्वसाधारण विश्वास कमी होउन आर्थिक संस्था (बँका) अधिक हमी मागतात. विमा कंपन्या त्यांच्या हप्त्यांचे दर वाढवतात. उद्योग जोखिम घेऊ शकत नसलल्याने गुंतवणूक मंदावते, काही वेळा थांबते. नवीन गुंतवणूक नाही आणि वाढीची संधी दिसत नसल्याने अर्थिक जोखीम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर कपाती केल्या जातात. त्यामुळे लोकांचा खर्च करण्याचा कल कमी होतो. पैसा बाजारात्‌ येईनासा होतो.

अशा रितीने सर्वच अर्थ व्यवस्था थंडाऊ लागते.

उपाय[संपादन]

देशाची रिझर्व बँक व्याजाचे दर कमी करते. खेळते भांडवल वाढवण्याचा प्रयत्न होतो. तसेच सरकार अनुदाने वाढवते.