वूड्रो विल्सन
| थॉमस वूड्रो विल्सन | |
| |
| सही | |
|---|---|
थॉमस वूड्रो विल्सन (इंग्लिश: Thomas Woodrow Wilson) (डिसेंबर २८, इ.स. १८५६; स्टाँटन, व्हर्जिनिया, अमेरिका - फेब्रुवारी ३, इ.स. १९२४, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हा अमेरिकेचा २८वा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १९१३ ते ४ मार्च, इ.स. १९२१ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूर्त्रे सांभाळली. इ.स. १९१२ सालातल्या निवडणुकींत प्रोग्रेसिव्ह पक्षाचा उमेदवार थियोडोर रूझवेल्ट व रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार विल्यम हॉवार्ड टाफ्ट यांच्यात पारंपरिक रिपब्लिकन मतदार विभागले गेल्यामुळे डेमोक्रॅट उमेदवारीवर उभा राहिलेला विल्सन अध्यक्षपदी निवडून आला. अध्यक्ष होण्यापूर्वी हा इ.स. ११ ते इ.स. १९१३ या काळात न्यूजर्सी संस्थानाचा ४५वा राज्यपाल होता.
याच्या अध्यक्षपदाच्या कालादरम्यान पहिले महायुद्ध झाले. विल्सन प्रशासनाने फेडरल फार्म लोन ऍक्ट, अंडरवूड टॅरिफ, शेरमान अँटीट्रस्ट ऍक्ट सारखे महत्त्वाचे कायदे केले, तसेच फेडरल ट्रेड कमिशन व फेडरल रिझर्व सिस्टिम या निमसरकारी संस्था उभारल्या.
बाह्य दुवे[संपादन]
- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश मजकूर).[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "वूड्रो विल्सन: अ रिसोर्स गाइड (वूड्रो विल्सन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश मजकूर). लायब्ररी ऑफ काँग्रेस.
| कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |