रणगाडा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१ मे हा दिवस भारतात रणगाडा दिन (आर्मर डे) म्हणून साजरा केला जातो. १ मे १९३८ रोजी द सिंध हॉर्स या घोडदळाच्या पहिल्या रेजिमेंटचे रणगाडा दलामध्ये रूपांतर करण्यात आले होते
हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) देशातला पहिला मानवरहित रणगाडा तयार केला आहे. या रणगाड्याचे तीन प्रकार असून यातील एक रणगाडा सुरूंगात लपवून ठेवलेला दारुगोळा शोधून काढेल, तर दुसरा गस्त घालून शत्रुंच्या हालचालींची अचूक माहिती टिपेल आणि तिसरा हल्ल्यांची माहिती देण्याचे काम करणार आहे. या रणगाड्याचे नाव मंत्रा असे ठेवण्यात आले आहे. संपूर्ण देशी बनावटीचे हे रणगाडे असून लढाऊ वाहने संशोधन आणि विकास विभागाने (CVRDE) या रणगाड्याची निर्मिती केली आहे.
नक्षल प्रभावित क्षेत्रात हे रणगाडे उपयुक्त ठरू शकतात असे निमलष्करी दलाने म्हटले आहे. तसेच त्यांच्या रचनेत थोडाफार बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिमोट कंट्रोलच्या मनुष्यहानी टाळता येईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राजस्थानच्या वाळवंटात ५२ अंश सेल्सियस तापमानात या रणगाड्यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अत्याधुनिक सामुग्रीने सज्ज असलेल्या या रणगाड्यांमध्ये कॅमेरा व लेझर रेंज फाइंडर बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे १५ किलोमीटर अंतरावरूनही शत्रूंच्या हालचाली टिपता येणार आहेत.