तीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तीळ

तीळ हा एक तेलबियांचा प्रकार आहे.

वर्णन[संपादन]

तीळ (Sesamum indicum) कुळ- पेडालीएसी ("Pedaliaceae") हे एक फुले येणारे लागवडयोग्य झाड आहे. आफ्रिकेत याचे पुष्कळ जंगली भाउबंद आहेत व भारतातही हे मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या तेलबियांसाठी त्याची बहुतेक सगळीकडे लागवड केली जाते. याची फुले साधारणतः पिवळी असतात मात्र काहीवेळा निळ्या आणि जांभळ्या रंगांची फुलेही या झाडाला आल्याचे आढळते.

हे एक बहुवार्षिक झाड असून ते सुमारे ०.५ ते १ मीटर उंच वाढते. याची पाने विरुद्ध दिशेला असतात व सुमारे ४ ते १४ सेंटीमीटर लांब असतात. मुळाकडे याची पाने रुंद असून पुष्प-शाखेकडे ती छोटी होत जातात. फुले ही पांढरी ते जांभळी, नलीकाकार,३ ते ५ सेंटीमीटर लांब व तोंडाशी चार पाकळ्या असणारी असतात. यात असणाऱ्या बिया याच मुख्यत्वेकरून वापरल्या जातात. या बियांचा रंग सामान्यतः पांढरा, मात्र काहीवेळा किंचित गुलाबी,लालसर व काळाही असतो.या तेलबिया आहेत. याच्यापासून उच्च दर्जाचे खाद्यतेल निघते.

तीळ पौष्टिक आहेत, त्यांच्यात स्निग्धपणा आहे म्हणून तिळाचे तेल अंगाला लावतात.भारतात मकर संक्रांतीचे (तिळसंक्रांती)चे दिवशी तिळगुळ वाटण्याचा प्रघात आहे.

मुळ वस्ती[संपादन]

तिळाच्या अनेक जंगली जाती आफ्रिकेत सापडतात,परंतु, भारतात याला सर्वप्रथम माणसाने लागवडीखाली आणले. हरप्पासिंधु नदी या संस्कृतीत ख्रिस्तपूर्व २२५० व १७५० मध्ये तीळ वापरले जात असल्याचे पुरातत्त्वशास्त्रीय पुरावे आहेत.

नामोद्भव[संपादन]

sesame या इंग्रजी शब्दाचे मुळ, लॅटेन भाषेतिल sesamum या शब्दापासुन आहे.भारतात,उत्तर भागात याला सर्व भाषांमध्ये तिळ अशीच संज्ञा आहे.(संस्कृत,हिंदी,गुजराती,बंगाली इत्यादी).परंतु,दक्षिण भारतात याला वेगवेगळी नावे आहेत.(तमिळ(எள்ளு), मल्याळम्(എള്ള്) and कन्नड(ಎಳ್ಳು) मध्ये एल्लु म्हणुन तर तेलगुत (నువ్వులు) याला "नुव्वुलु" नावाने ओळखतात.

मुळात,या सर्व नावांची व्युत्पत्ती,संस्कृत शब्द[तैल] यापासून झालेली आहे,जसे, इतर भाषांतील शब्द “olive”पासून इंग्रजी शब्द “oil”ची निर्मिती झाली आहे. [१]

पुराणकालीन पार्श्वभूमी[संपादन]

हिंदु मान्यतेनुसार,तिळाचे तेलासतुपानंतर दुसरे स्थान आहे.काळे तिळाचा वापरही धार्मिक कार्याततर्पण होतो. शनी देवास तीळाचे तेल वाहण्याची पद्धत आहे.आयुर्वेदात पण याचा पुष्कळ वापर होतो.तिळाच्या तेलाचे मर्दन करून मग अभ्यंग स्नान करतात. [२].

भोजन व खाद्यपदार्थात वापर[संपादन]

पांढऱ्या तिळाचे उदात्तीकृत चित्र

पश्चिमी व मध्यपुर्वेकडील देशांत याचा वापर आहे. खाद्यपदार्थात याचा वापर संपूर्ण तीळ वा कूट करूनही होतो.त्याने पदार्थास एक प्रकारचा सुवास येतो. याचा वेगवेगळ्या चटण्या करण्यासाठीपण वापर होतो.बेकरी पदार्थातही याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. .[३] मणीपुर , नागालॅंड,आसाम येथे याचा भरपुर वापर होतो.भारतातल्या अनेक प्रदेशातही हा मुबलक प्रमाणात भोजनात व खाद्यपदार्थात वापरल्या जातो. प्रसिद्ध तिळगुळ यापासुनच बनतो.इतरही देशात याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर आहे,तो त्यापासुन मिळणाऱ्या पोषणमुल्यामुळे.तीळ संक्रातीला मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतात.तिळाच्या पोळ्या,लाडू,चिक्की, काही प्रमाणात भाज्यामध्ये पण वापर केला जातो.

पोषणमुल्ये व घटक[संपादन]

तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत ठेवायला मदत होते. तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्ल जास्त प्रमाणात असते.याच्या तेलातिल आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाहीत.यात लोह ,मॅग्नेशियम ,मॅगनिज ,तांबे ,कॅल्शियम भरपुर प्रमाणात असते.[४] [५] They contain lignans, including unique content of sesamin, which are phytoestrogens with antioxidant and anti-cancer properties. Among edible oils from six plants, sesame oil had the highest antioxidant content.[६]

जुन्या काळात बॅबिलॉन येथिल स्त्रिया तरुणपणा व सौंदर्य टिकावे म्हणुन तीळापासुन केलेला हलवा खात असत. रोमन योद्धे बल व उर्जेसाठी याचे सेवन करीत.[७]

तीळाचे तेल हे शरीरच्या मसाजस ठी व आरोग्यासाठी वापरतात.अभ्यंगशिरोधारा या क्रियेसा ठी याचा वापरआयुर्वेद।आयुर्वेदात होतो.यात या तेलालाफारच महत्त्व आहे.

लागवड[संपादन]

सन २००५ मधील उत्पादन

जगात याची सर्वठिकाणी लागवड होते.(20,000 km2). भारतासह अनेक देशात जसे, चिन, म्यानमार, सुदान, इथियोपिया, युगांडानायजेरीया. आशिया खंडात याचे उत्पादन सुमारे ७०% आहे तर २६% हे आफ्रिकेत. [८] अमेरीकेच्या टेक्सास प्रांतातही याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले.[९]

हे सुद्धा बघा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Spice Pages: Sesame Seeds (Sesamum indicum)". Archived from the original on 2007-03-14. 2009-08-28 रोजी पाहिले.
 2. ^ "WHFoods: Sesame seeds". Archived from the original on 2010-02-08. 2009-08-28 रोजी पाहिले.
 3. ^ Food, Industrial, Nutraceutical, and Pharmaceutical Uses of Sesame Genetic Resources
 4. ^ "United States Department of Agriculture". Archived from the original on 2015-03-03. 2009-08-28 रोजी पाहिले.
 5. ^ WHFoods: Sesame seeds.
 6. ^ Cheung SC, Szeto YT, Benzie IF. (2007). Antioxidant protection of edible oils. Plant Foods Hum Nutr. 2007 March; 62(1):39-42. Abstract.
 7. ^ Positive Health Magazine - Article Abstract. Archived 2009-01-21 at the Wayback Machine.
 8. ^ Sesame Profile. Archived 2009-04-10 at the Wayback Machine.
 9. ^ Growing Sesame: Production tips, economics, and more Archived 2010-11-03 at the Wayback Machine..
 • Bedigian, D. 1984. Sesamum indicum L. Crop origin, diversity, chemistry and ethnobotany. Ph.D. dissertation, University of Illinois, Urbana-Champaign.
 • Bedigian, D. 1985. Is še-giš-i sesame or flax? Bulletin on Sumerian Agriculture 2: 159-178.
 • Bedigian, D. 1988. Sesamum indicum L. (Pedaliaceae): Ethnobotany in Sudan, crop diversity, lignans, origin, and related taxa. In P. Goldblatt and P.P. Lowry, eds. Modern Systematic Studies in African Botany 25: 315-321. AETFAT Monographs in Systematic Botany, Missouri Botanical Garden, St. Louis, MO.
 • Bedigian, D. 1998. Early history of sesame cultivation in the Near East and beyond. Pages 93–101 In A.B. Damania, J. Valkoun, G. Willcox and C.O. Qualset, eds. The Origins of Agriculture and Crop Domestication. The Harlan Symposium. ICARDA, Aleppo. CGIAR
 • Bedigian, D. 2000. Sesame. Pages 411-421 In K.F. Kiple and C.K. Ornelas-Kiple, eds. The Cambridge World History of Food, Vol. I. Cambridge University Press, NY.
 • Bedigian, D. 2003. Evolution of sesame revisited: domestication, diversity and prospects. Genetic Resources and Crop Evolution 50: 779-787.
 • Bedigian, D. 2003. Sesame in Africa: origin and dispersals. Pages 17–36 In K. Neumann, A. Butler and S. Kahlheber, eds. Food, Fuel and Fields - Progress in African Archaeobotany. Africa Praehistorica. Heinrich-Barth-Institute, Cologne.
 • Bedigian, D. 2004. Conspectus of Sesamum. Annex III. Pages 61–63 In IPGRI. Descriptors for Sesame (Sesamum spp.). International Plant Genetic Resources Institute, Rome, Italy. CGIAR Archived 2008-12-17 at the Wayback Machine.
 • Bedigian, D. 2004. History and lore of sesame in Southwest Asia. Economic Botany 58(3): 329-353.
 • Bedigian, D. 2006. Assessment of sesame and its wild relatives in Africa. Pages 481-491 In S.A. Ghazanfar and H.J. Beentje, eds. Taxonomy and Ecology of African Plants, their Conservation and Sustainable Use. Royal Botanic Gardens, Kew.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत