काटेपूर्णा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काटेपूर्णा नदी
उगम काटा(अजिंठा पर्वतराजी)
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत महाराष्ट्र
लांबी ९७ किमी (६० मैल)

काटेपूर्णा नदी ही महाराष्ट्रातील अकोला व वाशीम जिल्ह्यांतून वाहणारी एक नदी आहे. अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणाऱ्या पूर्णा नदीची ही उत्तरवाहिनी उपनदी आहे. नदीची लांबी सुमारे ९७ किमी. नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशीम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावून मंगरूळ, अकोला आणि मूर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते.