ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९४५-४६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, १९४५-४६
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख २९ – ३० मार्च १९४६
संघनायक वॉल्टर हॅडली बिल ब्राउन
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा मर्व्ह वॉलेस (२४) बिल ब्राउन (६७)
सर्वाधिक बळी जॅक कोवी (६) बिल ओ'रायली (८)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९४६ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने प्रथमच न्यूझीलंडचा दौरा केला होता. २२ ऑगस्ट १९३९ रोजी इंग्लंड-वेस्ट इंडीजमध्ये कसोटी झाल्यानंतर दुसरे महायुद्ध सुरु झाले. त्यामुळे ६ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प पडले होते. जर्मनीचा पाडाव आणि जपानच्या विनाशर्त शरणागतीने दुसरे महायुद्ध संपले आणि क्रिकेटला वाव मिळाला. लागलीच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डांनी मालिका खेळविण्याचे ठरविले. ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडच्या चार प्रथम-श्रेणी संघांशी सराव सामने खेळत दौऱ्याला सुरुवात केली. शेवटचा सामना न्यूझीलंड XI सोबत होता. सामना खेळताना त्याला कसोटी दर्जा दिला नव्हता. परंतु, मार्च १९४८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनानी सामन्याला कसोटी दर्जा म्हणून मान्यता दिली.

या एकमेव कसोटी सामन्यात एकूण १३ खेळाडूंनी पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद बिल ब्राउनकडे होते तर वॉल्टर हॅडली याने न्यूझीलंडचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने एकमेव कसोटी १ डाव आणि १०३ धावांनी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी[संपादन]

२९-३० मार्च १९४६
धावफलक
वि
४२ (३९ षटके)
व्हेर्डुन स्कॉट १४
बिल ओ'रायली ५/१४ (१५ षटके)
१९९/८घो (७४ षटके)
बिल ब्राउन ६७
जॅक कोवी ६/४० (२१ षटके)
५४ (३२.२ षटके)
मर्व्ह वॉलेस १४
बिल ओ'रायली ३/१९ (१७ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०३ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन