एआयएक्स कनेक्ट
| ||||
स्थापना | २८ मार्च २०१३ | |||
---|---|---|---|---|
हब | केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगळूर) | |||
विमान संख्या | ३ | |||
पालक कंपनी |
एरएशिया (४९%) टाटा उद्योगसमूह (३०%) टेलेस्ट्रा (२१%) | |||
मुख्यालय | चेन्नई, भारत | |||
प्रमुख व्यक्ती | एस. रामदुराई | |||
संकेतस्थळ | www.airasia.com |
एर एशिया इंडिया प्रा.लि.[१] ही भारतामधील एक कमी दरात विमानसेवा पुरवणारी कंपनी आहे. एरएशिया, टाटा समूह आणि टेलेस्ट्रा ट्रेडप्लस या तीन कंपन्यांच्या माध्यामातून संयुक्त उदयम म्हणून एर एशिया इंडिया ही कंपनी 19 फेब्रुवारी 2013 रोजी स्थापन करण्यात आली. एकूण गुंतवणूकीमध्ये एर एशियाचा 49 %, टाटा समूहाचा 30%, आणि टेलेस्ट्रा ट्रेडप्लसचा 21% वाटा आहे. या कंपनीद्वारे साठ वर्षानंतर टाटांनी विमान वाहतूक सेवेमध्ये नव्याने प्रवेश केलेला आहे.[२][३]
भारतामध्ये 1.25/प्रति किलोमीटर इतक्या स्वस्त दराने विमानसेवा पुरविणारी ही पहिली सहाय्यकारी परकीय कंपनी आहे.[४] यासाठी आवश्यक असणा-या इंधनाचा साठा या कंपनीकडे आहे आणि प्रत्येक अर्ध्या तासानंतर सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.[५] एर एशियाकडे सध्या एरबस ए३२० बनावटीची तीन विमाने आणि 200हून अधिक कर्मचारीवर्ग आहे.
इतिहास
[संपादन]ज्यावेळेस भारताबाहेर स्वस्त दरात विमान सेवा पुरविण्या-या कंपनीसाठी हवाई वाहतूक आणि त्यावरील करप्रणाली अनुकूल होती त्या वेळेस ऑक्टोबर 2012 मध्ये या मूळ मलेशियन कंपनीने हवाईसेवा सुरू करण्याचा विचार केला. भारतीय सरकारने त्याच दरम्यान 49 % पर्यंतच्या परकीय गुंतवणूकीस परवानगी दिलेली होती. त्यावेळी एर एशियाने भारतामध्ये विमान वाहतूक करण्याचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळासमोर ठेवला आणि एप्रिल 2013 मध्ये परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने एर एशियाच्या गुंतवणूक प्रस्तावाला मान्यता दिली होती.[६] त्यावेळी एरएशियाने टाटा समूह आणि टेलेस्ट्रा ट्रेडप्लेस यांच्याबरोबर संयुक्त करार करून कंपनी स्थापन केल्याचे घोषित केले. एर एशियाच्या मंडळामध्ये टाटा समूहाच्या दोन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टरांचा समावेश आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांची विमान वाहतूक सेवा सुरू झाली.[७] त्यांची सेवा सुरू झाल्यानंतर भारतातील विमान सेवेची समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याचे जोरदार मत हवाई क्षेत्रात व्यकत केले जात आहे.[८]
एरएशिया यांनी हवाई वाहतूकीध्ये सुरुवातीस 50 दशलक्ष यू.एस.डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. भारतामध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकीट विक्री एजन्टांशी संपर्क साधून बोलणी चालू केलेली आहे. यापूर्वी भारतामध्ये कमी तिकीट विक्री झाल्यामुळे विमानसेवेवर विपरीत परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे आहेत आणि हे टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या कंपनीकडून केले जात आहेत.[९]
3 मार्च 2013 रोजी परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने एरएशियाला विमाने भाडयाने/लीझवर पुरविण्यास आणि माल वाहतूक करण्यास परवानगी दिली.[१०] त्यानंतर सदर कंपनीस प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव सदर मंडळाने 6 मार्च 2013 रोजी मान्य केलेला आहे.[११] विमानवाहतूक सुरू करण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर फार कमी कालावधीमध्ये संयुक्त उदयम म्हणून एर एशिया इंडिया प्रा.लि. ही कंपनी अस्तित्वात आली.[१२] एप्रिल 2013 मध्ये विमानामध्ये काम करण्यासाठी आवश्यक अधिकारी/कर्मचा-यांची निवड प्रकीया सुरू करण्यात आली आणि बंगलोर येथे इच्छूक वैमानिक व इतर अधिका-यांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्याच्या प्रकीयेस सुरुवात झाली.[१३]
व्यवस्थापन
[संपादन]कंपनीचा प्रमुख टॉनी फर्नांडीस यांनी रतन टाटा यांना सुरुवातीस कंपनीचे सचिव म्हणून घेण्याचे निश्चित केले होते. परंतु नंतर रतन टाटांना कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचा प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले.[१४][१५] 15 मार्च 2013 रोजी मित्तू चांडिल्य यांची व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून व 17 जून 2013 रोजी एस.रामदुराई यांची सचिवपदी नियुक्ती केली गेली.[१६][१७]
गंतव्यस्थाने
[संपादन]शहर | IATA | ICAO | विमानतळ |
---|---|---|---|
बंगळूर | BLR | VOBL | केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हब |
चंदीगड | IXC | VICG | चंदीगड विमानतळ |
चेन्नई | MAA | VOMM | चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ |
गोवा | GOI | VOGO | गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ |
कोची | COK | VOCI | कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ |
जयपूर | JAI | VIJP | जयपूर विमानतळ |
पुणे | PNQ | VAPO | पुणे विमानतळ |
नागपूर | NAG | VANP | डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ |
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ ""एरएशिया भारतीय कंपनीबरोबर एकत्रितरीत्या काम करण्यास तयार."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""एरएशियाने नवीन विमानसेवेसाठी भारतातील टाटा समूहाशी बांधून घेतले."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""टाटा समूह, टेलेस्ट्रा ट्रेडप्लस आणि एर एशिया मिळून एर एशिया इंडिया बनली."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""6 मार्च रोजी एरएशिया इंडियाच्या प्रवेशाचा प्रस्ताव एफआयपीबी ला मान्य."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""स्वस्त दरात विमान प्रवास व वाहतूक सेवा."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""एरएशिया इंडिया ने आकाश गाठले"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""एर एशियाबरोबर टाटांच्या विमानाने घेतली आकाशात भरारी"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""एरएशिया इंडियाची एक गोड बातमी – खूप स्पर्धा"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""विक्री तडाखेबाज होण्यासाठी एर एिशियाचा प्रवासी एजन्टांशी संपर्क"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""विमाने लिजवर देण्यास एर एशिया, टाटा समूह यांना परवानगी"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""भारतात गुंतवणूक करण्यास एर एशियाला परवानगी"" (इंग्लिश भाषेत). 2015-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""एर एशियाचा भारताशी संयुक्त् उदयम, कागदपत्रे एमसीए कडे सादर"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""एर एशियामध्ये नियुक्तीसाठी भरघोस प्रतिसाद"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""रतन टाटा एरएशियाच्या प्रमुखपदी"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""रतन टाटा बनणार एर एशिया इंडियाचे प्रमुख सल्लगार"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ""सिंगापूरस्थित मिथू चांडिल्य एर एशिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "टीसीएसचे एस रामदुराई हे एर एशियाचे सचिव" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)