Jump to content

जेटलिट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेटलाइट या पानावरून पुनर्निर्देशित)
जेट लाईट (जेटकनेक्ट)
आय.ए.टी.ए.
S2[१]
आय.सी.ए.ओ.
JLL[१]
कॉलसाईन
LITE JET[२]
स्थापना २० सप्टेंबर, इ.स. १९९१ (1991-09-20) (as Sahara Airlines)
बंद १७ एप्रिल, इ.स. २०१९ (2019-04-17)
हब इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली)
फ्रिक्वेंट फ्लायर जेट प्रिविलेज
गंतव्यस्थाने २२ (फेब्रुवारी २०१७)
पालक कंपनी टेलविंड्स लिमिटेड
मुख्यालय मुंबई, भारत
प्रमुख व्यक्ती नरेश गोयल (मालक)
संकेतस्थळ www.jetairways.com

भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी आहे.[३] ही विमान कंपनी जेट एरवेझच्या मालकीची असून भारतामधील मुख्य शहरांपर्यंत सेवा देते. जेटलाईट या नावाने सुरुवात केली असली तरी २०१२ पासून जेटकनेक्ट या नावाने सेवा दयायला सुरुवात केली.[४]

इतिहास

[संपादन]

सहारा इंडिया परिवार समूहाच्या सहारा एरलाईन्सकडून २० सप्टेंबर १९९१ रोजी या विमानकंपनीची स्थापना झाली असून ३ डिसेंबर १९९३ पासून २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या मदतीने विमान वाहतूकीस सुरुवात झाली. या कंपनीने दिल्ली हे मुख्यालय मानून भारतातल्या उत्तर प्रांतामध्ये सुरुवात करून नंतर सर्व देशामध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. २ ऑक्टोबर २००० रेाजी सहारा एरलाईन्सचे एर सहारा असे नामकरण झाले. २२ मार्च २००४ रोजी चेन्नई ते कोलंबो आणि नंतर लंडन,[५] सिंगापूर, मालदीव [६] आणि काठमांडू पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस सुरुवात झाली. २००६ च्या हिवाळयामध्ये भारतीय विमानसेवा चीन मधील गॉंगझू पर्यंत नेउुन अशा प्रकारची सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी होण्याचा या कंपनीचा मानस होता [७] परंतु तो अदयापपर्यंत प्रत्यक्षात येउु शकला नाही. भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये मंदी आल्यामुळे कंपनीचा बाजारभाव सरासरी जानेवारी २००६ मध्ये ११ टक्कयावरून एप्रिल २००७ मध्ये ८.५ टक्के इतका घसरणीला लागला हेाता.

जेट एरवेझची सरुवात

[संपादन]

१९ जानेवारी २००६ रोजी जेट एरवेझ ने ५० कोटी अमेरिकन डॉलर इतकी किंमत रोख देऊन एर सहारा ही पहिली कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा व्यवहार जेट एरवेझला खूप महागात पडला असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत होते. भारतीय नागरी वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली होती परंतु किंमतीवरून आणि एर सहाराच्या मंडळावर जेटचे सचिव नरेश गोयल यांच्या नियुक्ती करण्याच्या मुददयावरून मतभेद झाल्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही व दोघांनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.[८]

१२ एप्रिल २००७ रोजी दोन्ही पक्षांमध्ये समेट होवून जेट एरवेझने दुसरा यशस्वी प्रयत्न करून एर सहाराला १४ अब्ज ५० कोटी रुपये देण्याचे कबूल केले. या करारामुळे जेटला स्थानिक बाजारपेठेमधला ३२ टक्के वाटा काबीज करता आला.

१६ एप्रिलला जेट एरवेझने एर सहाराचे नामकरण जेटलाईट असे केले.[३] २० एप्रिलला जेट एरवेझ ने रु.४०० करोड इतकी रक्कम अदा केल्यानंतर कंपनी ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली.

स्थानके

[संपादन]

ऑक्टोबर २०१३ रोजी जेटकनेक्ट खालील स्थानाकांपर्यंत सेवा देत होती.[९]

उडडाणे

[संपादन]

जेट कनेक्टच्या वेगवानते मध्ये, ऑक्टोबर २०१३ च्या बातमीनुसार खालील विमाने ज्यातील काही जेट आणि जेट कनेक्टच्या आवरणच्या रूपात चालवल्या जातात.[१०]

जेटकनेक्टचा तांडा
विमान सेवेमधील मागणी प्रवासी शेरा
ए टी आर ७२-५०० ६८
ए टी आर ७२-६०० 3 ६८
बोइंग ७३७ – २०० १४४
१४९
बोइंग ७३७-८०० १८६
बोइंग ७३७-९००ER २०२
एकूण १८

अंतर्गत सेवा

[संपादन]

विमानातील प्रवाशांना जेटकॅफेमधून खादयपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ९ डब्लयू सांकेतांक असलेल्या आणि २०००-२९९९ अशा क्रमांकाच्या विमानांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे.[११]

घटना आणि दुर्घटना

[संपादन]

८ मार्च, इ.स. १९९४ रोजी सहारा एरलाइन्सचे (जी नंतर जेटकनेक्ट झाली) बोइंग ७३७-२आर४सी (नोंदणीकृत व्हीटी-एसआयए) या विमानामध्ये ३ वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना शिकाऊ वैमानिकाच्या चुकीमुळे विमान एरोफ्लोत इल्युशिन ८६ विमानावर आदळले. या अपघातामध्ये एरोफ्लोतचे दोन कर्मचारी, एक रशियन अभियंता आणि विमानतळावरील एक कामगार जागीच ठार झाले.[१२]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
 1. ^ a b "JetLite". ch-aviation. 11 December 2016 रोजी पाहिले.
 2. ^ "7340.2F with Change 1 and Change 2 and Change 3" (PDF). Federal Aviation Administration. 15 October 2015. p. 3–1–56. 9 December 2016 रोजी पाहिले.
 3. ^ a b ""एर सहाराच्या जेटलाईटच्या नावांत बदल."" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
 4. ^ ""ओन्-बोर्ड जेटकनेक्ट"" (इंग्लिश भाषेत). 2013-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 5. ^ ""लंडनमध्ये एर सहाराचा प्रवेश"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
 6. ^ "एर सहारा नेटवर्कशी मालदीव मधील मेल हे शहर जोडले जाते" (इंग्लिश भाषेत). 2013-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 7. ^ ""एरसहाराची सेवा आता आंतरराष्ट्रीय होणार"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
 8. ^ ""बीबीसी न्युज"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
 9. ^ ""नेटवर्क"" (इंग्लिश भाषेत). 2014-05-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 10. ^ ""जेटकनेक्ट फलीट."" (इंग्लिश भाषेत). 2014-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 11. ^ ""जेटकॅफे"" (इंग्लिश भाषेत). 2012-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 12. ^ ""एएसएन च्या बोईंग ७३७-२आर४सी व्हीटी-एसआयए विमानाचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात."" (इंग्लिश भाषेत). 2012-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)