Jump to content

सिंपलीफ्लाय डेक्कन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किंगफिशर रेड या पानावरून पुनर्निर्देशित)
किंगफिशर रेड (पूर्वी एर डेक्कन)
चित्र:किंगफिशर रेड मानचिह्न.jpg
आय.ए.टी.ए.
DN
आय.सी.ए.ओ.
DKN
कॉलसाईन
DECCAN
स्थापना ऑगस्ट २५, २००३
बंद इ.स. २०११
हब
मुख्य शहरे
अलायन्स स्टार अलायन्स (२००८ पासून))
विमान संख्या ४१ (अधिक ५७ येण्याच्या मार्गावर)
ब्रीदवाक्य द चॉइस इझ सिंपल (निवड सोपी आहे.)
पालक कंपनी युनायटेड ब्रुअरीझ ग्रूप
मुख्यालय बंगळूर, भारत
प्रमुख व्यक्ती जी.आर. गोपीनाथ
विजय मल्ल्या
संकेतस्थळ संकेतस्थळ

किंगफिशर रेड भारतातील स्वस्तदराने विमानप्रवास उपलब्ध करणारी विमान कंपनी होती. याचे नाव पूर्वी सिम्पलीफलाय डेक्कन आणि त्याहीपूर्वी एर डेक्कन होते. त्याचे मुख्यालय भारतातील मुंबई येथे होते.[] किंगफिशर रेड कडून खास प्रवाशांसाठी प्रकाशित होणारे साईन ब्लिटझ मासिक विमानामध्ये उपलब्ध करून दिले जायचे. २८ सप्टेंबर २०११ रोजी या कंपनीचे सचिव विजय मल्ल्या यांनी स्वस्त दरामध्ये सेवा देणे शक्य नसल्याने किंगफिशर रेडची सर्व सेवा बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.[]

इतिहास

[संपादन]

एर डेक्कन ही डेक्कन एव्हियेशनच्या मालकीची कंपनी. कॅप्टन जी.आर. गोपीनाथ यांनी ही भारताची पहिली स्वस्त विमान प्रवासाची सेवा देणारी विमान वाहतूक कंपनी चालू केली. २३ ऑगस्ट २००३ रोजी या कंपनीचे बंगळूर ते हुबळी असे पहिले विमानोड्डाण केले.[] ही कंपनी सर्वसामान्यांसाठी चालू करण्यात आलेली असून याचे बोधचिन्ह त्याचे निदर्शक होते. आकाशात झेप घेणाऱ्या पक्षाच्या पंखासारखे दोन जोडलेले तळहात हे त्याचे बोधचिन्ह आणि ‘ सहज उडा ’ म्हणजे कोणालाही सहज उडता येणे शक्य आहे हे त्याचे ब्रीदवाक्य होते. भारतीय नागरिकाला आयुष्यामध्ये एकदा तरी विमानप्रवास करता आला पाहिजे हे कॅप्टन गोपीनाथ यांचे एक स्वप्न होते. बंगलोर आणि चेन्नईसारख्या मोठया शहरांमधून हुबळी, मंगलोर, मदुराई आणि विशाखापट्टणम यासारख्या छोटया शहरांपर्यंत विमानाने नेणारे हे एकमेव आणि पहिले एरलाइन्स ठरले. एर डेक्कनने अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर भारतामध्ये त्यानंतर ब-याचशा छोटया छोटया एरलाइन्स कंपन्याचा उदय झाला. स्पाईसजेट, इंडीगो एरलाइन्स, जेट लाईट आणि गोएर यासारख्या कितीतरी विमान कंपन्या स्पर्धेसाठी किंगफिशरसमोर उभ्या राहिल्या. या कंपन्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे विमान कंपन्याना विमान प्रवासाच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट करावी लागली.

२५ जानेवारी २००६ रोजी डेक्कनची सेबी ( सिक्युरीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ) मध्ये नोंदणी होउुन लोकांच्या सहभागासाठी खुली करण्यात आली. लोकांचा सहभाग २५ टक्के असावा या हेतूने १८ मे २००६ रोजी शेअर बाजारात विक्रीला सुरुवात केली. पंरतू शेअर बाजार मंदीमध्ये असल्याच्या कारणास्तव विक्रीच्या तारखेची मुदत वाढवून आणि रक्कम कमी करून देखील लोकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.[]

२७ फेब्रुवारी २००७ रोजी एर डेक्कनने रेडीक्स आंतरराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे आरक्षण केल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत झपाटयाने वाढ झाली. त्यापूर्वी दिल्लीतील इंटरग्लोब टेक्नॉलॉजीकडून आरक्षण केले जात होते.[]

किंगफिशरचे विलीनीकरण व पुनर्निर्माण

[संपादन]

भारतीय विमान वाहतूक क्षेत्रामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एर डेक्कनसारख्या बऱ्याच विमान प्रवास कंपन्याना नुकसान सोसावे लागले आहे. १९ डिसेंबर २००७ रोजी एर डेक्कनचे किंगफिशर एरलाइन्स मध्ये विलीनीकरण करण्याचे जाहीर करण्यात आले. भारतीय विमान वाहतूक कायदयानुसार कंपनीला पाच वर्षे स्थानिक प्रवासाचा अनुभव असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास करण्यास परवानगी देता येत नाही. त्यामुळे किंगफिशर एरलाइन्समध्ये विलीनीकरण करण्याऐवजी डेक्कन एव्हिएशनमध्ये विलीनीकरण केले गेले व त्यानंतर त्याचे नाव किंगफिशर एरलाइन्स असे दाखविण्यात आले. आंतरराष्ट्रीय उड्डाणास परवानगी देताना सर्वांत जुन्या एर डेक्कनला व आताच्या किंगफिशर एरलाइन्सला परवानगी देण्यात आली. ऑक्टोबर २००७ मध्ये त्याचे नामांतर सिम्पलीफ्लाय डेक्कन असे करण्यात आले. त्याचे बोधवाक्य होते सर्वांत साधी सोपी निवड करा. नामांतर झाल्यानंतर एर डेक्कनच्या बोधचिन्हाऐवजी किंगफिशरचे बोधचिन्ह ठेवण्यात आले. विमानाचा रंग जो पूर्वी निळा आणि पिवळा होता तो किंगफिशरच्या विमानांसारखा लाल आणि पांढरा करण्यात आला.[] अशा प्रकारे पूर्वीच्या एर डेक्कनचा चेहरामोहरा संपूर्णपणे बदलून किंगफिशर एरलाइन्सच्या विमानांमध्ये रूपांतर झाले.

देशी-आंतरराष्ट्रीय सेवा

[संपादन]

किंगफिशर रेडची विमाने काही भारतीय आणि काही आंतरराष्ट्रीय स्थानकांकडे प्रवास करतात.[]

उड्डाण

[संपादन]

एर डेक्कनकडून वारसा हक्काचे मिळालेली ए-३२० आणि एटीआर-७२ ही विमाने किंगफिशरने पूर्ण वेळ प्रवासासाठी वापरण्यास घेतली.[]

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

२४ सप्टेंबर २००३ रोजी हैद्राबादकडून विजयवाडयाला जाणाऱ्या विमानाला, २९ मार्च २००४ रोजी गोव्यावरून बंगलोरला जाणाऱ्या विमानाला आणि ११ मार्च २००६ रोजी कोईमतूर वरून बंगलोरला जाणाऱ्या विमानाला अपघात झाला होता.[][१०][११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "किंगफिशर एरलाईन्स – संपर्क साधा - दिल्ली, मुंबई,बंगलोर, हैद्राबाद, पुणे येथे विमानोड्डाण" (इंग्लिश भाषेत). 2014-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "किंगफिशरची स्वस्त दराची सेवा रद्द" (इंग्लिश भाषेत). 2011-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "एर डेक्कन विषयी" (इंग्लिश भाषेत). 2014-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "डेक्कन आयपीओ लवकरच बुडीत खात्यात" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "एर डेक्कन ने रेडिक्स आरक्षण व्यवस्था स्वीकारली" (इंग्लिश भाषेत). 2014-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "एर डेक्कनचा कायापालट" (इंग्लिश भाषेत). 2008-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "किंगफिशर रेड" (इंग्लिश भाषेत). 2014-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "स्वस्त दरातील सेवतून किंगफिशर बाहेर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ अवर ब्यूरो / हैद्राबाद ,२५ सप्टेंबर २००३. "एर डेक्कनला आग" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "मोठा विमान अपघात टळला" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "स्वस्त दरातील सेवा धोक्यात" (इंग्लिश भाषेत). 2014-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]