अॅल्युमिनियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲल्युमिनियम (रासायनिक सूत्र Al) (अणुक्रमांक १३) हा एक धातुरूप रासायनिक पदार्थ आहे.

१३ ॲल्युमिनियम


Al

Al-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक ॲल्युमिनियम, Al, १३
दृश्यरूप


अणुभार  ग्रॅ·मोल−१


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ॲल्युमिनियमसंबंधी आयुर्वेदाची मते[संपादन]

अ‍ॅल्युमिनियम हे प्रामुख्याने आपल्या स्मरणशक्तीवर घातक परिणाम करते, असे जगात अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ब्रिटन, नॉर्वे, फ्रान्स आदी ठिकाणी हे संशोधन झाले आहे. अल्झायमर्स रिसर्च इन्स्टिट्टयूचे संचालक डॉ. मायकेल वैनर यांनी केलेल्या संशोधनात अ‍ॅल्युमिनियमच्या अधिक वापराने स्मृतिभ्रंश निर्माण होतो, असे म्हटले आहे.

अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांत अन्न शिजवणे घातक[संपादन]

युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी मेडिकल सेंटर येथे झालेल्या संशोधनात अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांत शिजवलेल्या अन्नाचे सेवन केले तर प्रत्येक वेळी त्यातील २ ते ४ मिलिग्रॅम अ‍ॅल्युमिनियम शरीरात जाते. सामान्यत: एका दिवसात जास्तीत जास्त २० मिलिग्रॅम एवढे अ‍ॅल्युमिनियम शरीरात निर्धोकपणे शोषले जाऊ शकते. अन्न शिजवण्यासाठी तसेच चहा बनविण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमची भांडी मोठ्ठया प्रमाणावर वापरली जातात. हे लक्षात घेऊन त्या भांड्यांचा सर्रास होणारा वापर थांबविणे गरजेचे आहे.

औषधातूनही अ‍ॅल्युमिनियम[संपादन]

आधुनिक वैद्यकाच्या काही जंटासिड्डसमधून (अ‍ॅसिडिटीसाठीचे औषध) अ‍ॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा घटक धोकादायक प्रमाणात शरीरात जातो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. थोडे पित्त वाढले की, अशा गोळ्या खाणा‍‍र्‍यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी या गोळ्यांचा वापर कमीत कमी करणे आवश्यक आहे.

कुपोषण रोखण्यासाठी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अंगणवाडी योजना तसेच गेल्या १५ वर्षांपासून शालेय पोषण आहार योजना अशा विविध योजना भारत सरकारच्या वतीने राबवल्या जातात. या योजनांमध्ये बहुतांशी ठिकाणी अन्न शिजवताना अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्डयांचा उपयोग केला जातो. वरील संशोधनात सांगितलेला स्मृतिभ्रंशाचा आणि अ‍ॅल्युमिनियमचा संबंध लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्टेनलेस स्टीलची किंवा चांगली कल्हई केलेली पितळेची पातेली वापरात येणे आवश्यक आहे. सोडियम अ‍ॅल्युमिनियम फॉस्फेट नावाचा घटक बेकिंग पावडरमध्येही वापरला जातो. विशेषत: काही केक्स तसेच काही प्रकारचे चीज बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. याचे सेवनही बरीच मंडळी करत असतात. त्यातून माणसाच्या पोटात अ‍ॅल्युमिनियम जाते. काही रासायनिक शाम्पूमध्येही अ‍ॅल्युमिनियमचा वापर केला जातो. त्यामुळे नेहमी असे शाम्पू वापरणार्‍यांनी सावध राहणे गरजेचे आहे, कारण अ‍ॅल्युमिनियम हे शरीरामध्ये पोटातून, त्वचेवाटे तसेच फुप्फुसावाटेही शोषले जाते. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांमध्ये घाम न येण्यासाठी वापरल्या जाणा‍या काहींमध्ये अ‍ॅल्युमिनियमचा वापर होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अर्थात अशुद्ध पाण्यातूनही अ‍ॅल्युमिनियम माणसाच्या पोटात जाऊ शकते. ‘युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्टयूट ऑफ एन्व्हायरन्मेंटल स्टडीज्’मधील संशोधकांनी अ‍ॅल्युमिनियमच्या अति वापराबद्दल अशीच चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात अ‍ॅल्युमिनियम पोटात जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वाचा विचार करता अ‍ॅल्युमिनियम हा घटक आरोग्याला घातक असून स्मृतिभ्रंशाचे एक मोठे कारण आहे हे सिद्ध होते. त्यामुळे त्याचा वापर टाळणे हेच आवश्यक असून अ‍ॅल्युमिनियमची भांडी न वापरणे गरजेचे आहे.