Jump to content

अग्रणी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्रणी नदीचे खोरे (mr); Afon Agrani (cy); Agrani River (en); Agrani River (ceb); Abhainn Agrani (ga); अग्रणी नदी (hi); அக்ராணி ஆறு (ta) río de la India (es); ভারতের নদী (bn); cours d'eau de l'Inde (fr); ભારતની નદી (gu); river in Karnataka, India (en); Fluss in Indien (de); rio da Índia (pt); river in India (en-gb); भारतका नदी (ne); річка в Індії (uk); rivier in India (nl); نهر في الهند (ar); भारत में नदी (hi); ഇന്ത്യയിലെ ഒരു നദി (ml); river in India (en-ca); river in Karnataka, India (en); rivero en Barato (eo); ভাৰতৰ নদী (as); abhainn san India (ga) Agrani (en)
अग्रणी नदीचे खोरे 
river in Karnataka, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनदी
स्थान सांगली जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ५२६ m
Map१६° ३९′ ४१″ N, ७४° ५७′ ५०″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अग्रणी नदी ही भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधून वाहणारी नदी आहे. ही नदी कृष्णा नदीची एक उपनदी आहे. अग्रणी नदीचा उगम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो.[] तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाल्याचे सांगितले जाते. ही नदी सांगली जिल्ह्यातील ६२ किमी प्रवास करून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हुल्लगबल्ली गावात जाऊन कृष्णा नदीस मिळते.

भौगोलिक माहिती

[संपादन]

अग्रणी नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील चार तालुके (खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ) आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुका येतात. सांगली जिल्ह्यातील १०७ गावे या खोऱ्यात समाविष्ट आहेत.[] या नदीच्या खोऱ्यात एकूण सात पाणलोट क्षेत्रे आहेत. अग्रणी नदीला पाणलोटक्षेत्र KR-38 मधून महांकाली नदी नावाची २२.५ किमी लांबीची उपनदी येऊन मिळते.[]

पुनरुज्जीवन

[संपादन]

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र सांगली जिल्ह्याने राज्याला दिला; परंतु काही काळापूर्वी अग्रणी नदीचे अस्तित्व गाळ, माती आणि झाडाझुडपांमुळे लुप्त झाले होते. ४० वर्षांनंतर अग्रणी नदी पुन्हा वाहू लागली.[] पूर्वी या ठिकाणी नदी होती असे सांगावे लागत होते, अशी परिस्थिती होती. मात्र, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शासन आणि लोकांच्या सहभागाने २०१३ मध्ये अग्रणी नदीचे पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले.[] या कामामुळे खानापूर तालुक्यात ८ ऑक्टोबर २०१५ रोजी झालेल्या परतीच्या पावसाने अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित झाली.[] २०१९ मध्येही परतीच्या पावसाने अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली, आणि ती पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली.[] या पुनरुज्जीवनाच्या कामाला राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[]

सांस्कृतिक महत्त्व

[संपादन]

अग्रणी नदीच्या खोऱ्यातील गावे प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. या नदीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होतो, आणि पुनरुज्जीवनानंतर या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

संदर्भ

[संपादन]
  1. "सांगलीतील खानापूरच्या ग्रामस्थांनी केले अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन". लोकसत्ता. ७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  2. गरिमा, मिश्रा (१ एप्रिल २०१७). "Sangli: 107 villages join hands to rejuvenate Agrani River Basin". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  3. "Location and drainage map of the Agrani River". ResearchGate (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२५ रोजी पाहिले.
  4. "४० वर्षांनंतर अग्रणी नदी पुन्हा वाहती". ई-सकाळ. ११ ऑक्टोबर २०२०. २६ मार्च २०२५ रोजी पाहिले.
  5. "सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन". लोकसत्ता. ११ ऑक्टोबर २०२०. २६ मार्च २०२५ रोजी पाहिले.
  6. "अग्रणी नदी पुन्हा वाहू लागली". लोकसत्ता. ११ ऑक्टोबर २०१५. २६ मार्च २०२५ रोजी पाहिले.
  7. "अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन" (PDF). केसरी. ९ ऑक्टोबर २०१७. 2018-12-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  8. "राष्ट्रीय जल पुरस्काराने सांगलीतील अग्रणी नदीच्या पुनर्वसनाचा गौरव". ई-सकाळ. २२ नोव्हेंबर २०२०. २६ मार्च २०२५ रोजी पाहिले.