बावनथडी नदी
Appearance
बावनथडी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | वैनगंगा नदी |
बावनथडी नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून जाणारी आणि गोंदिया जिल्हा व भंडारा जिल्हा या जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे. तिचा उगम मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातल्या परसवाडा डोंगरात आहे. पूर्वी एखाद्या मोठा नाल्यासारखी असणारी बावनखडी मध्य प्रदेशातील वाळू उपश्याच्या अतिरेकामुळे मोठी नदी झाली आहे. हिला दरवर्षी पूर येतो आणि महाराष्ट्रातल्या बपेरा गावातील शेतजमीन वाहून जाते. ही नदी पुढे जाऊन वैनगंगा नदीला मिळते. या नदीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांची सरकारे संयुक्तपणे, बावनथडी प्रकल्प (राजीवसागर) नावाचे धरण बांधीत आहेत.
पहा: जिल्हावार नद्या