प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
Appearance
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (इं:Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही भारत सरकारद्वारा सन २०१६मध्ये विमोचित केल्या गेलेली एक योजना आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे उद्देश: या योजनेद्वारे भाररातील दारिद्ऱ्य रेषेखाली असणाऱ्या सुमारे ५ कोटी महिलांना घरघुती एलपीजी गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत.
योजनेचे उद्देश
[संपादन]- महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे.
- स्वयंपाक करतांना लाकडी जळण वापरण्यामूळे होणारे दुष्परिणाम कमी करणे.
- स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे भारतात होणारे मृत्यू कमी करणे.
- घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी दूर करणे
- पर्यावरण संरक्षण
- ग्रामीण लोकसंख्येला चांगले आरोग्य पुरवणे
- स्वयंपाकासाठी आरोग्यदायी इंधन पुरविणे
तपशील
[संपादन]"प्रधानमंत्री उज्ज्वला योजना" ही एक भारत सरकारची, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सन २०१६ मध्ये विमोचित केली गेलेली कल्याणकारी योजना आहे.[१][२]
यात, २१ जुलै २०१६ च्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना सुमारे १७,६६,२५४ जोडण्या दिल्या गेल्या..[३]
संदर्भ
[संपादन]- ^ टाईम्स ऑफ इंडिया: "उज्वला योजनेत दारिद्ऱ्य रेषेखालील कुटुंबाना रु.९९० मध्ये एलपीजी शेगडी मिळणार" Check
|दुवा=
value (सहाय्य). टाईम्स ऑफ इंडिया. - ^ इंडियन एक्सप्रेस: "प्रधानमंत्री उज्वला योजना : 'यूपीए सरकारने वंचितांना अदत्त ठेवले, ज्याद्वारे आम्हास त्रास होत आहे'" Check
|दुवा=
value (सहाय्य). इंडियन एक्सप्रेस. - ^ "ओरिसाडायरी.कॉम हे संकेतस्थळ". 2016-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-12 रोजी पाहिले.