"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
+ {{मृत दुवा}} ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ १४: ओळ १४:
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = sa
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = sa
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = san
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = san
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=san san]
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=san san]{{मृत दुवा}}
|नकाशा =
|नकाशा =
}}
}}

०२:५०, १७ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

संस्कृत
संस्कृतम्
स्थानिक वापर भारत
पर्व अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० (वैदिक संस्कृत). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
लोकसंख्या सुमारे १४,०००
भाषाकुळ
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत (उत्तराखंड)
भाषा संकेत
ISO ६३९-१ sa
ISO ६३९-२ san
ISO ६३९-३ san[मृत दुवा]

संस्कृत ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले वेदवाङ्‌मय हे सर्वात प्राचीन वाङ्‌मय आहे. असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

संस्कृत भाषेला लेखकांची कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-

संस्कृत भाषेची निर्मिती

पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.

प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा

‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.

संस्कृत भाषेत एकेका देवाला अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णुसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही काही जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.

संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६०च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १००च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८०च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत.

वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे

वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्‌।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’)

एकात्म भारताची खूण

प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.

मोगल आणि संस्कृत

मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउटर्स – संस्कृत अ‍ॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.

राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती

‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ?

सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)

कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे.

ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.

जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.

इतिहास

ही भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की त्यामुळे भारतीय भाषांत सर्वाधिक प्रमाणात संस्कृत शब्द आहेत. म्हणून भाषातज्ज्ञांच्या मते ही सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक म्हणतात.

लिपी

संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखित अनेक लिप्यांत लिहिले जात असे; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.

अक्षरमाला

प्रणव

ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.

स्वर

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ, अं, अ:

= व्यञ्जने

क् ख् ग् घ् ङ्

च् छ् ज् झ् ञ्

ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्

प् फ् ब् भ् म्

य् र् ल् व् श्

ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ्

जोडाक्षरे

क्ष्, ज्ञ्

रूपे आणि वाक्यशास्त्र

संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्‍येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्‍यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.

उपसर्ग

धातुविमर्श

संस्‍कृत साहित्य

व्‍याकरण Sanskrit dhatu

संस्कृत भाषेची आताची स्थिती

२१व्या शतकात भारतात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा जाण्याचा प्रयत्‍न करत नाहीत, तिची किंचितही स्तुति-प्रशंसाही करत नाहीत.

संस्कृतचा अभ्युद्धार

संस्‍कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. विविध विषयांतला ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.

ग्रंथ संपदा

  • वेद
  • ऋक्‌संहिता
  • उपनिषद्
  • बृहत्‌संहिता
  • रसार्णव
  • अगस्त्य संहिता
  • वैशेषिक संहिता
  • दर्शने
  • न्यायदर्शने
  • न्यायकंदली
  • सूर्यसिद्धान्त
  • सिद्धान्त शिरोमणी

भारतात संस्कृतचा प्रचार करणार्‍या संस्था आणि व्यक्ती

  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे, वगैरे)
    • Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत)
    • श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८)
  • श्री.भा. वर्णेकर
  • प. वसंतराव गाडगीळ
  • अजित मेनन
  • शारदा मासिक
  • हरियाणा संस्कृत अकादमी
  • संस्कृत गुरूकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.)
  • श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)
  • राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती)
  • राष्ट्रीय संस्कृत संस्थान (देवप्रयाग, उत्तराखंड); (नवी दिल्ली)
  • जगद्गुरु रामानन्दाचार्य राजस्थान संस्कृत विश्वविद्यालय (मडाऊ, जयपूर)
  • महर्षि संदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान (भरतपूर, उज्जैन)
  • संस्कृत भारती (अखिल भारतीय संस्था, मुख्यालय - नवी दिल्ली)
    • सम्भाषण सन्देश (मासिक)
  • मिथिला संस्कृत विद्यापीठ (बिहार)
  • कौशलेन्द्र संस्कृत विद्यापीठ (दुर्ग, मध्य प्रदेश)
  • कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक, महाराष्ट्र)
  • संस्कृत विद्यापीठ (विशालखंड, गोमतीनगर, लखनौ)
  • श्री श्रद्धा संस्कृत विद्यापीठ (लक्ष्मणगढ-सीकर, राजस्थान)
  • संस्कृत महाविद्यालय (आणि विद्यापीठ, कलकत्ता) - स्थापना इ.स. १८२४)
  • Dr Ambedkar Hindi Sanskrit Vidyapeeth Bihar Cum Education And Training (ब्रेगुसराई, बिहार)
  • नेपाळ संस्कृत विश्वविद्यालय
    • रूरू संस्कृत विद्यापीठ (ऋदी, नेपाळ)
    • शारदा संस्कृत विद्यापीठ (महेंद्रनगर, नेपाळ)
    • हरिहर संस्कृत विद्यापीठ (खिदीम, नेपाळ)
    • जनता संस्कृत विद्यापीठ (बिजौरी, नेपाळ)
    • कालिका संस्कृत विद्यापीठ (नेपाळ)
    • संस्कृत पाठशाळा (राजेश्वरी-काठमांडू, नेपाळ)
    • वाल्मीकी विद्यापीठ आणि राणीपोखरी संस्कृत माध्यमिक शाळा (काठमांडू, नेपाळ)
      • तीनधारा संस्कृत हॉस्टेल (काठमांडू, नेपाळ)
  • संस्कृत कॉलेज (बनारस)
  • शारदा संस्था (प्रकाशन संस्था, वाराणशी)
  • संस्कृत साकेत (नियतकालिक)
  • भारतधर्म (नियतकालिक)
  • श्रीकाशी पत्रिका (नियतकालिक)
  • विद्या (नियतकालिक)
  • शारदा (पत्रिका)
  • आनंद-पत्रिका (नियतकालिक)
  • गीर्वाण (नियतकालिक)
  • ब्राह्मण महा-सम्मेलनम्‌ (नियतकालिक)
  • श्री (नियतकालिक)
  • उषा (नियतकालिक)
  • संस्कृत ग्रंथमाला
  • भारतश्री (नियतकालिक)
  • संस्कृत भवितव्यम्‌ (नियतकालिक)
  • दिव्यज्योति (नियतकालिक)
  • विश्व संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • स्विद्‌ (नियतकालिक)
  • सुप्रभातम्‌ (नियतकालिक)
  • प्रभातम्‌ (नियतकालिक)
  • गाण्डीवम्‌ (नियतकालिक)
  • लोक संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • व्रजगंधा (नियतकालिक)
  • श्यामला (नियतकालिक)
  • दैनिक संस्कृत (कानपूर)
  • संस्कृत श्री (नियतकालिक)

इ.स. १९९६मध्ये उत्तर प्रदेशातून एकूण ४८ संस्कृत निततकालिके प्रकाशित होत असत, त्यांमध्ये ३ दैनिके, ७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, १५ मासिके, १३ त्रैमासिके आणि ६ अन्य प्रकारची नियतकालिके होती.

बाहेरील दुवे

हिन्दी/इंग्रजी दुवे

हेसुद्धा पाहा

  • मणिप्रवाळम (संस्कृत आणि तमिळ भाषेच्या संगमाने तयार झालेली प्राचीन भाषा)