पंचधारा नदी
पंचधारा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
पंचधारा नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | वर्धा जिल्हा, महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | वर्धा नदी |
पंचधारा नदी ही महाराष्ट्रातील एक उपनदी आहे. ती वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यातून मधून वाहते. या नदीवरच्या धरणाला पंचधारा धरण किंवा पंचधारा तलाव म्हणतात.
इतर पंचधारा
[संपादन]सुरुवातीला पाच धारांनी वाहणाऱ्या अनेकदा पंचधारा नाव पडते. अशी पंचधारा नावाच्या नद्या पालघ जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यात आणि जळगाव जिल्ह्यातही आहे. ताडोबाच्या जंगलात पंचधारा नावाचा झरा आहे.
हिमालयातील बद्रीनाथ तीर्थाच्या उत्तरेला दीड किलोमीटरवर पाच झऱ्यांचा उगम होतो. त्यांची नावे इंदिरा धारा, उर्वशी धारा, कूर्म धारा, ध्रुव धारा, प्रल्हाद धारा आणि भृगू धारा. या पाच झऱ्यांच्या समूहाला पंचधारा म्हणतात. ऊर्वशी धारा ऋषिगंगा नदीच्या उजव्या हाताला आहे, भृगू धारा अनेक गुहांमधून वहात वहात येते, कूर्मधारेचे पाणी अतिशय थंड तर प्रल्हाद धारेचे कोमट आहे.
कोयना धरणाच्या परिसरात पंचधारा नावाचा धबधबा आहे.
रायपूर नजीकच्या पंचधारा नदीवरील धबधब्याला उगमापाशीच एक धबधबा आहे, त्याला पंचधारा धबधबा म्हणतात.
मध्य प्रदेशात पंचमढी या हिल स्टेशनाच्या आसमंतात एक पंचधारा नावाचा धबधबा आहे.
कोयनानगर पासून साधारण तीन किलोमीटरच्या अंतरावर नवजाच्या दिशेला भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक उद्यान बनविण्यात आले आहे. या उद्यानाचे भूमिपूजन स्वतः नेहरूंनी केले होते. या उद्यानात एक घुमट आहे, त्याला पंचधारा घुमट म्हणतात.
आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेच्या त्रैमासिक मुखपत्राचे नाव पंचधारा आहे. हे नियतकालिक इ.स. १९५७पासून चालू आहे.
पहा : जिल्हावार नद्या
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |