ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिविस्ट
Appearance
(ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिविस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲक्रेडेटेड सोशल हेल्थ एक्टिविस्ट / Accredited Social Health Activists (ASHA), आशा हे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते आहेत. भारत सरकारने २००५ साली सुरू केलेली ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचा (एनआरएचएम) एक भाग आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय ही योजना राबवते. भारतातील "प्रत्येक खेड्यात आशा" असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आशा स्वयंसेविका माता व बाल आरोग्याविषयी गावातील महिलांमध्ये प्रबोधन करणे, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या इ.ची माहिती मातांना देणे असे काम करतात.