सुशील कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुशील कुमार (कुस्तीपटू) या पानावरून पुनर्निर्देशित)
सुशील कुमार
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सुशील कुमार सोलंकी
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान हरयाणा, भारत
जन्मदिनांक २६ मे, १९८३ (1983-05-26) (वय: ४०)
जन्मस्थान बाप्रोला, हरयाणा
उंची १६६ सेंटीमीटर (५.४५ फूट)
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाईल कुस्ती


सुशील कुमार (जन्म मे २६,१९८३) हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. २०१२ उन्हाळी लंडन ऑलिंपिक खेळात त्याने ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारा तसेच सलग दोन ऑलिंपिक खेळात वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. २०१० मध्ये मॉस्कोत झालेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तसेच २००८ बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाइल ६६ कि.ग्रा. विभागात कांस्यपदक पटकावले.[१] कुमारने कझाकस्तानच्या लियोनिद स्पिरिदोनोवला रिपिचेज फेरीत हारवून कांस्यपदक पटकावले.[१] भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा ने पुरुष १० मीटर एर रायफल मध्ये मिळवलेले सुवर्णपदक तसेच बॉक्सर विजेंदर कुमार ने मिडलवेट प्रकारात मिळवलेले कांस्यपदकानंतरचे हे भारतासाठी बीजिंग स्पर्धेतील हे तिसरे पदक होते. खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये मिळवलेल्या कांस्यपदकानंतरचे ऑलिंपिक कुस्तीतील हे पहिलेच पदक आहे.[२] जुलै २००९ मध्ये सुशिल कुमार यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ह्या पुरस्काराने भारत सरकारने संन्मानित केले.[३]

माहिती[संपादन]

सुशील कुमारचा जन्म हरयाणामधिल बाप्रोला खेड्यातील जाट कुटुंबात झाला. कुमारचे वडील दिवान सिंग सोलंकी हे एमटीएनएल मध्ये वाहनचालक म्हणुन कार्यरत होते व आई कमलादेवी गृहिणी आहेत. त्यांना पहेलवान होण्याची स्फुर्ती त्यांचे पहेलवान भाऊ संदिप तसेच वडील जे स्वतः पहेलवान होते यांच्या कडून भेटली. पैशाची कमतरता तसेच, भारतात कुस्तीसाठी खराब प्रशिक्षण सुविधा असल्यामुळे, २००८ ऑलिंपिक स्पर्धेसाठी सुद्धा, त्याच्या कुटूंबाला त्याच्या जेवणाची काळजी घ्यावी लागली.[४][५]

कुमार सध्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक कमर्शियल मॅनेजर पदावर कार्यरत आहे.[२]

कारकीर्द[संपादन]

कुमारयांनी कुस्तीचे प्रशिक्षण छत्रसाल मैदानाच्या आखाड्यात वयाच्या १४व्या वर्षी सुरू केले. सुरुवातीला त्यांना भारतीय पहेलवान यशवीर आणि रामफळ, नंतर अर्जुन पुरस्कार विजेते सत्पालरेल्वे मधील प्रशिक्षक ग्यान सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

२००८ बीजिंग ऑलिंपिक[संपादन]

२०१० विश्व कुस्ती अजिंक्यपद[संपादन]

पुरस्कार व मान्यता[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व दुवे[संपादन]

  1. ^ a b "कुमार ला कांस्यपदक". 2008-08-20. Archived from the original on 2008-09-01. 2008-08-20 रोजी पाहिले.
  2. ^ a b Masand, Ajai (2008-08-20). "Meet Sushil, the shy guy[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Archived from the original on 2008-09-01. 2008-08-21 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ मेरी कोम, विजेंदर आणि सुशिल यांनी खेळ रत्न (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
  4. ^ Ganesan, Uthra (2008-08-21). "Najafgarh hails golden bronze boy". Archived from the original on 2008-09-22. 2008-08-21 रोजी पाहिले.
  5. ^ "Sushil puts Boprala on wrestling map of the world". 2008-08-20. 2006-04-21 रोजी पाहिले.

हेसुद्धा पहा[संपादन]