Jump to content

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महानगर टेलीफोन निगम लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.500108
एन.एस.ई.MTNL
उद्योग क्षेत्र दूरसंचार
स्थापना १ एप्रिल इ.स. १९८६
मुख्यालय भारत नवी दिल्ली, भारत
सेवांतर्गत प्रदेश मुंबई, दिल्ली
महत्त्वाच्या व्यक्ती ए.के. गर्ग
उत्पादने दूरध्वनी, मोबाईल फोन, इंटरनेट सेवा
महसूली उत्पन्न $ ७८.८७ कोटी
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
$ -५६.७५ कोटी
मालक भारत सरकार
कर्मचारी ४५,००० (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.mtnldelhi.in
www.mtnlmumbai.in

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (इंग्लिश: Mahanagar Telephone Nigam Limited, बी.एस.ई.500108, एन.एस.ई.MTNL, संक्षेप: एम.टी.एन.एल.) ही भारत देशामधील एक दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे. एम.टी.एन.एल. देशाच्या दिल्लीमुंबई ह्या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते. १०० टक्के भारत सरकारच्या मालकीची असलेली व भारतामधील नवरत्‍न कंपन्यांपैकी एक असलेली एम.टी.एन.एल. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तोट्यात चालत आहे. भारतामधील मोबाईल फोन वापरामध्ये झालेली लक्षणीय वाढ व खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत एम.टी.एन.एल.ची कमकुवत व विस्कळीत सेवा हे ह्यामागील प्रमुख कारण मानले जाते.

भारत संचार निगम लिमिटेड ही दुसरी सरकारी दूरसंचार कंपनी दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त भारताच्या इतर भागांमध्ये दूरध्वनी सेवा चालवते.

बाह्य दुवे

[संपादन]