Jump to content

सदस्य चर्चा:Vinod rakte

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

[संपादन]
चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळावा, मुंबई
मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळावा, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )

[संपादन]
२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !

--हरकाम्या ०७:३६, २८ मे २००८ (UTC)

Tungi pinnacle Jain Pilgrimage.jpg चित्राबद्दल

[संपादन]

नमस्कार विनोद,

आपण नुकतीच चढवलेली चित्र:Tungi pinnacle Jain Pilgrimage.jpg ही संचिका पाहिली. या चित्राच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर चालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला संचिकेच्या पानावर मांडावे लागते.
कृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा; जेणकरून ती संचिका ठेवावी की काढावी, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे, यांबद्दल ठरवता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५६, १६ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार विनोद,
आपण चढवलेल्या चित्रांबद्दल प्रताधिकारविषयक (कॉपीराइटविषयक माहिती, उदा.: मूळ छायाचित्रकार, स्रोत, प्रताधिकारहक्क कुणाच्या आधीन आहेत इ.) माहिती पुरवाल काय?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:४६, १७ डिसेंबर २००९ (UTC)
माहितीबद्दल धन्यवाद विनोद. ही माहिती खरे तर, त्या-त्या संचिकेच्या पानावर लिहून ठेवलीत, तर खूप बरे होईल. संचिका चढवतानाच, ही माहिती भरली तर चांगले आहेच्ह; परंतु आतादेखील ही माहिती त्या-त्या संचिकेच्या पानावर जाऊन तुम्हांला लिहिता येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे, दाभोळकरांच्या संकेतस्थळावरील चित्र प्रताधिकारित असायची शक्यता आहे; कारण सहसा संकेतस्थळांवरील चित्रे, स्पष्टपणे 'प्रताधिकारमुक्त' (कॉपीराइट-फ्री) असे तेथे लिहिले नसल्यास, त्या-त्या संकेतस्थळांची किंवा मूळ चित्रकारांची प्रताधिकारित मालमत्ता समजली जाते. त्यामुळे सहसा संकेतस्थळांवरील चित्रे, त्यांवर बहुतांश वेळा प्रताधिकार असल्यामुळे, विकिपीडियावर चढवली जात नाहीत.
दाभोळकरांच्या चित्राबद्दल आणि तुम्ही चढवलेल्या अन्य चित्रांबद्दल संबंधित माहिती त्या-त्या संचिकेच्या पानावर लिहिलीत, तर वर्गीकरणाचे काम सोपे होईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:२७, १८ डिसेंबर २००९ (UTC)

अभिनंदन

[संपादन]
आपण आतापर्यंत मराठी विकिपीडियावर खूपशी ऊपयूक्त संपादने केली हे पाहून छान वाटले खालील काही पानांचे दुवे देत आहे त्यातील माहिती आपण सध्या जे काम करत आहात ते करताना उअपयोगाची होईल असे वाटते, यातील सहाय्य परिअपुर्ण आहे असे नाही पण त्या अनुषंगाने आपल्या काही शंका येतील त्यांना उत्तरे देतानाच अशा प्रश्नोत्तरांचा उपयोग पुढील काळात येणारर्‍या नवीन विकि सदस्यांनाही होईल असे वाटते.माहितगार ०७:३४, १६ डिसेंबर २००९ (UTC)
  • __NOTOC__ आपण काही लेख पानात लावताना आढळले. ते वापरून आपल्याला काय अपेक्षीत होते ते उमगले तर अधीक योग्य सहाय्य आणि टिपा उअपलब्ध करून देता येतील. सहसा विशिष्ट कारणाशिवाय लेखांमध्ये __NOTOC__ वापरण्याचे टाळले जाते. साधारणतः मुखपृष्ठपान दालने आणि क्वचीत प्रकल्प पानांवर __NOTOC__ गरज भासते त्याचे मराठी रूप आपल्याला विकिपीडिया:जादुई शब्द येथे अभ्यासता येईल.


वसंतगड

[संपादन]
महाराष्ट्रातील किल्ले संकीर्णाच्या महाराष्ट्रातील किल्ले मथळ्याच्या डावीकडे प • च • सं हि अगदी बारीक अक्षरे दिसतील त्यातील सं वरटिचकी मारली असता साचा:महाराष्ट्रातील किल्ले आपल्या संपादना साठी उघडतो.त्यात हवी ती माहिती भरावी. किंवा सरळ साचा:महाराष्ट्रातील किल्ले वर टिचकी मारू शकता आणि संपादन करून माहिती जोडू शकता. काही सहाय्य लागल्यास जरूर विचारा माहितगार १४:२४, १७ डिसेंबर २००९ (UTC)
बरोबर. माहीतगारांनी तुम्हांला योग्य मार्गदर्शन केले आहे. गोष्टी थोड्या अजून स्पष्ट करण्यासाठी काही बाबी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो :
साचा:महाराष्ट्रातील किल्ले हा साचा 'मार्गक्रमण साचा' (नॅव्हिगेशन टेंप्लेट) आहे. एखाद्या विषयाशी संबंधित पाने एकत्रित एखाद्या चौकटीत ठेवून त्या विभिन्न पानांमधून मार्गक्रमण करायला (पानांमधून नॅव्हिगेशन करायला) सोयीचे व्हावे या उद्देशाने 'मार्गक्रमण साचे' बनवले जातात. किल्ल्यांसंबंधीच्या प्रस्तुत विषयासंदर्भात महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या अनेक पानांमधून मार्गक्रमण करणे सोपे व्हावे, म्हणून 'साचा:महाराष्ट्रातील किल्ले' या साच्यात गडकिल्ल्यांच्या वेगवेगळ्या पानांचे दुवे नोंदवले आहेत. त्या चौकटीत दिसणारे दुवे आजवर मराठी विकिपीडियावर लिहिल्या गेलेल्या पानांचे आहेत. वसंतगड हे पान आपण नुकतेच विकसवले असल्याने, ते अजून त्यात कोणी नोंदवले नव्हते.. परंतु आता तुम्ही स्वतःदेखील 'साचा:महाराष्ट्रातील किल्ले' साचा संपादून त्यात सातारा जिल्ह्यासमोर वसंतगडाच्या पानाचा दुवा नोंदवू शकता. एकदा हा साचा बदलला, की हा साचा ज्या-ज्या पानांत जडवला असेल, त्या-त्या सर्व पानांवर वसंतगडाच्या दुव्याची भर घातलेली अद्ययावत मार्गक्रमण चौकट दिसू लागेल.
अजून काही शंका असल्यास, काही अडचणी आल्यास, मदत हवी असल्यास माहीतगार / अन्य सदस्य किंवा मला निस्संकोचपणे सांगा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४४, १७ डिसेंबर २००९ (UTC)

उ:वेदोक्त

[संपादन]

नमस्कार विनोद,

आपल्या संदेशाबद्दल धन्यवाद, पण मला नेमके कळले नाही की तुम्हाला काय म्हणायचे आहे. विशेषतः वादग्रस्त(आपल्या विचार सरणीमुळे)लेख हे दुवा देऊन च लिहावेत...

माझी विचारसरणी वादग्रस्त आहे कि मी केलेले बदल (०) वादग्रस्त आहेत? कि तुम्ही या लेखाबद्दल काही मदत/clarification मागत आहात?

कृपया अधिक विस्ताराने लिहिलेत तर तुमच्या तक्रार/टिप्पणीबद्दल काही करता येईल.

केले गेलेले बदल मुद्दामहून केले असे वाटत असतील तर ते कृपया उद्धृत करावेत म्हणजे जास्त प्रकाश पडेल. हा लेख सौरभ वैशंपायन यांनी लिहिला व माहितगारांनी त्यात काही बदल करून वाद आणि बदल साचे घातले असे दिसत आहे. माहितगारांनी वाद साचा लावण्याबद्दलचे कारण चर्चा पानावर लिहिलेच आहे.

कृपया उत्तर माझ्या चर्चापानावर द्यावे.

क.लो.अ.

अभय नातू २०:४८, १७ डिसेंबर २००९ (UTC)

स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे.
तुमचे मत वेदोक्त लेखाच्या चर्चापानावर जरुर लिहावे. जाणकार त्याला उत्तर देतील.
अभय नातू २१:१४, १७ डिसेंबर २००९ (UTC)

मुळात विकिपिडियावर वेदोक्त म्हणजे काय?याची माहीती हवी.याचा अतिशय पुढिल भाग म्हणजे वेदोक्त वाद.. अनुनासिक ऊच्चारातील फरक होय.काहीवेळा मुद्दामहुन संस्कृत श्लोकाचे पठन हे कुळ व जाती भेदामूळे अयोग्य ऊच्चारात वा नियमानुसार केले जात नाही.मुळात ही देव भाषा असा वेदिक व द्र्विड संस्कृतील समज.

तुम्ही थोडा वेळ काढून ही माहिती घालू शकाल? काही तांत्रिक मदत लागली तर मला (किंवा इतर सदस्यांना) जरुर कळवा.

अभय नातू २१:५३, १७ डिसेंबर २००९ (UTC)

तुम्ही घातलेल्या माहितीचे मी विकिकरण केले आहे. आशय बदलेला नाही. एकदा नजरेखालून घालावे.
अभय नातू २२:२१, १७ डिसेंबर २००९ (UTC)

कसं काय बुवा तुम्हास विकिकरण जमते? कळावे.लो.अ.

सराव.

अभय नातू ००:१५, १८ डिसेंबर २००९ (UTC)


आपली आपापसातील चर्चा चर्चा:वेदोक्त इथे हलवली गेल्यास त्या लेखावर सरळ पोहोचणार्‍या वाचकांना संदर्भ लगेच समजतील.लेखातील मजकुरा संबंधीत संदर्भ , संबधीत मजकुरा नंतर <ref>संदर्भ विवरण </ref> असे लिहून केल्यास इतर समालोचकांना संदर्भ पडतालून घेणे सोपे जाईल् असे वाटते.माहितगार ०६:३८, २१ डिसेंबर २००९ (UTC)


अभिनंदन

[संपादन]

नमस्कार Vinod rakte,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू

माहितगार ०७:०१, २१ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार, Vinod rakte आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद.

मराठी विकिपीडियावरील वनस्पती संबंधीत लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने 'विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे.

या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया दालन:वनस्पती आणि संबधीत प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!माहितगार ०७:०१, २१ डिसेंबर २००९ (UTC)

साचे बनविण्यासाठी मदत हवी.लेख लिहिता येत नाहित

[संपादन]

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


नमस्कार,
कोणत्या पद्धतीचे साचे बनविण्याचा तुमचा प्रयत्न आहे? माहितीचौकट हा एक साच्यांचा ढोबळ प्रकार आहे, ज्यापासून इतर अनेक प्रकारचे साचे बनविले जातात. सहसा या प्रकारचे साचे व्यक्ती किंवा वस्तू यांसाठी वापरले जातात. क्रम हा अजून एक प्रकार आहे, ज्यापरत्वे एखाद्या घटनेचा किंवा पदाचा क्रम दाखविला जातो, उदा. भारताचे पंतप्रधान (इंदिरा गांधी येथे पहा). याद्या लिहिण्यासाठीही वेगळे साचे असतात, उदा. साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००७, इ.
कोणत्या लेखमालेसाठी तुम्हाला साचा हवा आहे हे कळवलेत तर अधिक मार्गदर्शन करता येईल.
अभय नातू २१:२१, २१ डिसेंबर २००९ (UTC)
नमस्कार! तुम्हांला हव्या असलेल्या साच्याचा उद्देश, त्यातील विविध माहितीक्षेत्रांची सविस्तर यादी लिहिलीत, तर नेमके काय हवे आहे याची कल्पना येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:०३, २२ डिसेंबर २००९ (UTC)
नमस्कार! तुमचा ताजा संदेश वाचला. परंतु तुम्ही नेमके काय म्हणत आहात, ते अजूनही उलगडले नाही. कृपया त्रोटक/ संक्षिप्त वर्णनाऐवजी बैजवार सांगा. त्याशिवाय तुम्हांला नक्की काय हवे आहे, ते कळणार नाही आणि ते कळल्याशिवाय, तुम्हांला मदत कशी करू?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:२७, २२ डिसेंबर २००९ (UTC)

खालील बटनावर टिचकी मारून माहिती द्यावी


नमस्कार विनोद! साचे बनवण्याबद्दल मराठी विकिपीडियावर सहाय्यपान बनवायचे आहे; पण तोवर तुम्हांला दिग्दर्शक होतील अशी इंग्लिश विकिपीडिया व मेटाविकीवरील पाने सांगतो; ती चाळून तुमच्या धूळपाटीवर प्रयत्न करून बघा :
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३१, १३ जानेवारी २०१० (UTC)

किल्ल्यांची चित्रे

[संपादन]

नमस्कार,

तुमच्या विनंतीनुसार {{साचा:माहितीचौकट किल्ला}} यात आवश्यक ते बदल केले आहेत. आता यात चित्र, चित्रशीर्षक व चित्ररुंदी हे तीन नवीन parameters आहेत ज्यायोगे किल्ल्याचे छायाचित्र दाखवता येईल.

साच्याच्या कागदपत्रात (documentation) हे कसे वापरावे तेही लिहिले आहे, तसेच सिंहगड या लेखात त्याचे उदाहरणही आहे.

अधिक काही लागल्यास कळवालच.

अभय नातू १८:४८, २८ डिसेंबर २००९ (UTC)


शिराळा येथील बदलाबद्दल धन्यवाद.तो लेख सुंदर झाला आहे. जमल्यास तेथे एखादा फोटो टाकावा. वि. नरसीकर (चर्चा) ०७:१०, ६ जानेवारी २०१० (UTC)

शिराळा तालुका आणि शिराळा शहर असे लेख करता येतील. गणेश धामोडकर ०८:५१, ६ जानेवारी २०१० (UTC)

प्रकल्प बावन्नकशी २०१० निमंत्रण

[संपादन]

२०१० या वर्षात मराठी विकिमध्ये सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० सुरू करण्यात आला आहे. आपण सादर निमंत्रित आहात. गणेश धामोडकर ०७:४७, ६ जानेवारी २०१० (UTC)


सध्या खूपच व्यस्त आहे. लवकरच कळवितो.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:५६, ११ जानेवारी २०१० (UTC)


(१)माफ करा. मी तातडिने प्रतिसाद देउ शकलो नाही. सध्या व्यस्तता आहे म्हणुन.जसा जसा वेळ मिळेल तसा येथे(विकिपीडियावर) येत असतो. आपणास मार्गदर्शन लागले तर सदस्य:Mahitgar,सदस्य:sankalpdravid,सदस्य:अभय नातु यांचेकडुन घेउ शकता.ते विकिपीडियावर प्रचालक आहेत व माझेपेक्षा जास्त अनुभवी आहेत.ते योग्य मार्गदर्शन करतातच..

(२) आपण काही निरोप वा संदेश लिहिल्यावर, कळपटाच्या(की बोर्ड) डावे बाजुच्या वरच्या कोपर्‍यात 1 या कळीशेजारची ~ हे चिन्ह असलेली कळ चारवेळा वापरुन आपली सही करु शकता.(~~~~) त्याने आपणच हा संदेश लिहिला आहे किंवा कसे याची कोणास शंका रहात नाही.मला वाटते कि आपला problem सदस्य:Mahitgar यांनी एव्हाना सोडविलेला आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३४, ११ जानेवारी २०१० (UTC)

उ:पान वा संचिका हटवण्यासाठी काय करावे बरे

[संपादन]

नमस्कार,

एखादे पान वा संचिका हटवण्यासाठी त्या पानावर {{पानकाढा}} हा साचा लावावा. प्रशासकांपैकी एक हे पान एकदा नजरेखालून घातल्यावर विकिवरुन काढून टाकतील.

जर एखाद्या पानावरील मजकूर तुम्हाला वादग्रस्त वाटला तर पानांवर {{दृष्टिकोन}} हा साचा लावून तेथील चर्चा पानावर हा साचा का लावला (कोणता मजकूर चुकीचा किंवा व्यक्तिगत दृष्टिकोनातून लिहिल्यासारखा वाटतो हे लिहावे. मूळ लेखक त्याला तेथे उत्तर देऊ शकेल. जर एखाद्या लेखावरुन खूप वाद होत असतील किंवा खोडसाळपणे बदल होत असतील तर प्रशासकांना कळवावे म्हणजे तो लेख तात्पुरता संपादनासाठी बंद करता येतो.

अभय नातू १७:४२, ११ जानेवारी २०१० (UTC)

धन्यवाद

[संपादन]

प्रकल्प ५२कशी मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. काहीही शंका असल्यास आपले स्वागतच असेल. गणेश धामोडकर ०४:४८, १२ जानेवारी २०१० (UTC)

  • प्रकल्प ५२कशी मधील आपल्या लेखांचे विषय पाहूनच आपले चौफेर वाचन कळून येते. ज्याअर्थी आपण हे लिखाण करत आहात त्याअर्थी आपल्याकडे त्याविषयी काहीतरी संदर्भ असेलच. तो संदर्भ नमुद करता आला तर उत्तम. विकीमध्ये संदर्भविहीन लिखान अधिक काळ टिकू शकत नाही व ते इतर सदस्यांकडून डिलीट केले जाण्याची शक्यता असते. संदर्भ देण्याविषयी मदत हवी असल्यास कळवावे.
  • दुसरे म्हणजे लेखांचा पहिला उतारा हा इंट्रो रूपी असावा. यात लेखाविषयीची माहिती सारांशरूपात यावी असे अपेक्षित असते. पहिला उतारा इंट्रो देऊन मग पुढील भागांना सुरूवात करावी.
  • पुढील लिखाणास शुभेच्छा.
गणेश धामोडकर ०६:१७, १३ जानेवारी २०१० (UTC)

प्रताधिकार सूचना

[संपादन]

  • छायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त करत असल्याचे नोंदवा.
  • चित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.
  • प्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदाराकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्या शिवाय येथे मूळीच चढवू नये.(आंतरजालावर इतरत्रही उपलब्ध असेलतरीही हाच नियम लागू होतो)
  • छायाचित्रे/चित्रे/संचिका चढवण्यापूर्वी आपल्या शंकांचे निरसन विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा येथे करून घ्या.

माहितगार ०७:३०, १३ जानेवारी २०१० (UTC)

= चित्र:सोनकांबळे.jpg

[संपादन]

नमस्कार रकटे! तुम्ही नुकतेच चढवलेले चित्र:सोनकांबळे.jpg हे चित्र प्रताधिकारित आहे किंवा कसे , याबद्दल कृपया खुलासा करावा. तसेच, चित्र कुठून मिळाले याची माहिती/स्रोतही त्या पानावर लिहावा. म्हणजे चित्र ठेवायचे की काढून टाकायचे याबद्दल दिग्दर्शन होईल.

तसेच, ब्राह्मणे की ब्राह्मणके याबद्दल : मी प्राचीन संस्कृत वाङ्मयावरील कोशकार सिद्धेशवरशास्त्री चित्राव यांच्या ग्रंथांत पाहिले असता, त्यात 'तैत्तिरीय ब्राह्मण', 'गोपथ ब्राह्मण', 'शांखायन ब्राह्मण' असे शब्द आढळले. त्यानुसार वर्ग:ब्राह्मणे या नावाचा वर्ग व्याकरणदृष्ट्या योग्य आहे, असे दिसते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१६, १८ जानेवारी २०१० (UTC)

आकडे

[संपादन]

आपण लिहिलेल्या लेखांमधील अनेक ठिकाणी आकडे (figures) हे इंग्रजीतुन आहेत. कृपया तेथे मराठी आकडे टाकावेत.त्याने लेखास अधिक उठाव येईल. आपल्या लेखनास शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२८, १३ जानेवारी २०१० (UTC)

आपली छायाचित्र पाने तुमची तुम्हालाही पुर्नसंपादीत करता येतील {{क्रिकॉमन्स}} कोणत्याही पानात लावल्या नंतर कसा दिसेल ते खाली दर्शवतो आहे.त्याचे सध्याचे रूप सदस्यपानावर लावण्याच्या दृष्टीने अधीक योग्य वाटते. साचातील सध्याची भाषा अनुरूप न वाटल्यास पर्यायी वाक्य सुचवावे तसा साचा मीही तुम्हाला बनवून देईन.माहितगार ०५:२०, २५ डिसेंबर २००९ (UTC)
सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवानाअनेक परवाने संबंधीची पाने पहा.


गाण्यांसंबंधी

[संपादन]

नमस्कार विनोद! आपण मी बोलले न काही नुसतेच पाहिले व तत्सम काही अन्य गाण्यांचे स्वतंत्र लेख तयार केल्याचे पाहिले. परंतु, त्यात गाण्याचे शब्द, गीतकार/कवी, (चाल बांधली असल्यास) संगीतकार वगैरेच शब्द आहेत. सहसा गाण्यांचे नुसतेच शब्द लिहिण्यासाठी लेख बनवू नयेत; कारण ही गाणी आंतरजालावर पुष्कळ ठिकाणी वाचता/ऐकता येतात. मराठी विकिपीडियावर केवळ शब्दरचना नोंदवण्यासाठी त्यांचे स्वतंत्र लेख नोंदवण्याचे प्रयोजन नाही. परंतु जर विश्वकोशीय स्वरूपाची माहिती (उदा., गाण्याच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी/ कारणमीमांसा, गाण्याच्या सादरीकरणाचा इतिहास वगैरे उल्लेखनीय गोष्टी) असली, तरच स्वतंत्र लेख बनवावेत. पुष्कळदा 'वंदे मातरम्' किंवा तत्सम अतिमहत्त्वाच्या गाण्यांबाबतच अशी उल्लेखनीय माहिती उपलब्ध असते; त्यामुळे त्या गाण्यांवर लेख लिहिले तर ते 'विश्वकोशीय' ठरतात. परंतु "पाडगावकरांच्या नुसत्या कवितेसाठी मी मराठी विकिपीडियावर कशाला वाचायला येऊ?", असा वाचकाच्या दृष्टीने रास्त मुद्दा उपस्थित होतो. शिवाय, या कविता प्रकाशित झाल्या असतील, तर त्या संबंधित लोकांकडून प्रताधिकार न मिळवता विकिपीडियावर चढवणे योग्य ठरत नाही.

स्वतंत्र लेख लिहिण्याऐवजी तुम्ही पाडगावकरांच्या लेखात विश्वासार्ह संकेतस्थळांचे बाह्य दुवे नोंदवलेत, तर ते एखाद वेळेस चालू शकतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:३९, १४ जानेवारी २०१० (UTC)

>वेद विभागात वर्ग:ब्राह्मणे असा आहे.खरं म्हणजे ब्राह्मणके वा ब्राम्हणके असा वर्ग असावा. कळावे. < मी या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ आहे.सदस्य:Sankalpdravid सदस्य:Mahitgar किंवा सदस्य:अभय नातू यांचेशी कृपया चर्चा करावी. वि. नरसीकर (चर्चा) ०९:५२, १५ जानेवारी २०१० (UTC)

दुसरी विनंती अशी कि जागरण करुन किंवा कोणत्याही प्रकारचा अतिशय ताण घेउन कृपया लेखन करु नये. किल्ले मध्ये काल आपण रात्रभर लेखन केले असे दिसते.हा एक मित्रत्वाचा म्हणा किंवा एक senior माणसाचा म्हणा, अनाहुत सल्ला आहे.गैर अर्थाने कृपया घेउ नये. वि. नरसीकर (चर्चा) ०९:५२, १५ जानेवारी २०१० (UTC)

शैव-अ-शैव(वैष्णव) वाद

[संपादन]

माझ्या माहिती प्रमाणे येणारा शैव आणि शैवेतर हा सिद्धांत/वाद ब्राम्हणेतर चळवळीच्या संदर्भाने मांडला जाणारा नवीनतम वाद आहे. याचे संदर्भ प्राचीन शैव-(वैष्णव) वादा पेक्षा वेगळे आहेत.त्यामुळे येथे वैष्णव शब्द वापरू नये असे माझे मत आहे.आपला प्रतिसाद चर्चा:ब्राह्मणेतर चळवळ चर्चा पानावर दिल्यास अधीक बरे असेल माहितगार १५:५९, १५ जानेवारी २०१० (UTC)

बाकी वेद आणि संबधीत पूर्णच वर्गीकरणे आपण तपासून सूचना , चावडीवर चर्चा आणि बदल केलेत तर ते अधीक योग्य असेल मागच्या वर्गीकरण केलेल्या व्यक्तींना वर्गीकरणे कशी करावीत याची कल्पना असेल पण बारकावे माहितच असतील असे नव्हे

माहितगार १६:०३, १५ जानेवारी २०१० (UTC)

संपादनपद्धतीविषयी अतिशय महत्त्वाची सूचना

[संपादन]

नमस्कार विनोद! गेल्या काही दिवसांपासून मराठी विकिपीडियावरील तुमचा सहभाग निरखतोय. तुमचा सहभाग उत्साही खचितच आहे; परंतु त्यात एक अतिशय महत्त्वाची सुधारणा सुचवू इच्छितो - तुम्ही संपादलेल्या बहुसंख्य लेखांमधील तुमची दरएक वेळेची संपादने अतिशय छोटी असतात; पुष्कळदा एक-दोन शब्दांमधली दुरुस्ती => पान जतन करणे => पुन्हा वेगळ्या काही शब्दांची भर => पुन्हा जतन करणे => पुन्हा किरकोळ दुरुस्ती / भर => पुन्हा जतन करणे, अशा स्वरूपाची दहा-दहा वीस-वीस संपादने एकेका लेखावर एकेका दिवसात तुम्ही करत असल्याचे दिसत आहे. अशा संपादनप्रक्रियेत वरकरणी आक्षेपार्ह काही नसले, तरीही त्यामुळे विकिपीडियाच्या विदागारात (= डेटाबेसात) व आर्काइव्हांमध्ये उगाचच भर पडत जाते (एखाद्या लेखाच्या इतिहास पानावरील आवृत्त्या पाहिल्यास, एकेका संपादन क्रियेमागे विकिपीडियाचे सॉफ्टवेअर काही शेकड्यांनी बाइट साठवत असेल, अशी कल्पना करता येऊ शकते); व विकिपीडिया सर्व्हरांवर निष्कारण बोजा पडतो. त्यामुळे संपादनपद्धत अधिक किफायतशीर व गुणात्मक दृष्टीनेही अधिकाधिक चांगली होण्यासाठी खालील उपाय अनुसरावेत :

  • लेखात एका वेळेस सरासरीने किमान एक-दोन ओळींची भर पडेल असे पाहावे (अर्थात एक-दोन ओळी हा ढोबळ सल्ला झाला. एखाद्या वेळेला एकच अतिशय महत्त्वाचा शब्द, ज्याने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, असा संपादल्यास हरकत नाही. परंतु सहसा वर नोंदवलेला सर्व्हरांवरील बोज्याचा मुद्दा लक्षात घेऊन थोडीतरी लक्षणीय शब्दसंख्या/ वाक्यसंख्या असावी, हा मुद्दा ध्यानात ठेवावा.)
  • लेखात संपादन केल्यानंतर ते थेट जतन (= सेव्ह) करून ठेवू नये; त्यापेक्षा त्याची एकदा 'झलक' (= प्रीव्ह्यू) पाहावी आणि मग सर्व बरोबर असल्याची खातरजमा करून मगच लिखाण जतन करावे. 'जतन करा' व 'झलक पाहा' ही दोन्ही बटणे संपादन-चौकटीच्या खालीच दिसतात.

या सूचना तुमचे कष्ट हलके व्हावेत, संपादनप्रक्रिया तुम्हांला सोपी व्हावी व विकिपीडिया आर्काइव्हांवरील अकारण बोजा टाळावा, या उद्देशानेच केल्या आहेत. कृपया गैरसमज नसावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४९, १८ जानेवारी २०१० (UTC)

रकटे, तुम्ही माझ्या चर्चापानावर काय संदेश लिहू इच्छित होता? माझ्या चर्चापानावर मला अर्धवट संदेश दिसतोय. काय घोळ झाला असावा?
बाकी, चित्र:माज्या जल्माची चित्तरकथा.png हे चित्र पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून फोटो/स्कॅन करून घेतले असे दिसते. मराठी विकिपीडियावर अशी चित्रे मूळ प्रताधिकार-मालकांच्या लेखी परवानगीशिवाय चढवू नयेत; ज्याची कारणे मी आधीही वेळोवेळी तुम्हांला कळवली आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:५६, २० जानेवारी २०१० (UTC)
सोनकांबळ्यांच्या पुस्तकांच्या चित्रांबद्दल काही मुद्दे :
  1. पुस्तकाचे प्रताधिकार कायम लेखकाकडेच असतात असे नाही; काही वेळा प्रकाशकही पुस्तकाचे प्रताधिकार लेखकाकडून विकत घेतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल काही वेळेस स्वतंत्र प्रताधिकार असू शकतात.
  2. समजा ते प्रताधिकार लेखकाकडेच असतील, तरीही नंतर ते त्यांच्या मुलाला मिळतातच असे नाही; कारण प्रताधिकाराबद्द्ल हयातीनंतर काय करायचे याबद्दल मूळ लेखक व प्रकाशक यांच्यात प्रकाशनावेळी करार झालेला असू शकतो.
  3. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की बह्सुअंख्य प्रसंगांत लेखक/कलाकाराच्या मृत्यूपश्चात ६०-१०० वर्षे पुस्तक/चित्र/कलाकृती प्रताधिकारितच मानली जाण्याची तरतूद बहुसंख्य देशांच्या कायद्यांमध्ये आहे (भारताच्या प्रताधिकार कायद्यानुसारही ६० वर्षांची मुदत आहे.)
तात्पर्य : गृहित धरून चित्रे चढवण्यापेक्षा, सबंधित लोकांकडे प्रताधिकार आहेत का, याची खात्री पटवून, मग त्यांच्याकडूनच प्रताधिकारमुक्त वापराची लेखी परवानगी घ्यावी. तूर्तास तरी, कुठल्याही लेखी/ईमेल परवानगीशिवाय ते चित्र चढवले असल्याने मी ते चित्र 'प्रताधिकारित आहे, असेच नोंदवलेले आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३३, २० जानेवारी २०१० (UTC)
नमस्कार विनोद! एखादी संचिका प्रताधिकारांची शहानिशा न करता कुठल्याशा संकेतस्थळावरून विकिपीडियावर चढवून फक्त 'प्रताधिकारित संचिका' म्हणून वर्गीकरण केले, की सर्व काही 'चालेल' असा अर्थ होत नाही. सध्या प्रताधिकारित संचिका वर्गात असलेल्या संचिका कालांतराने प्रताधिकारांच्या कारणास्तव विकिपीडियावरून हटवल्या जाऊ शकतात.
खेरीज, मी स्वतःहून प्रताधिकार-परवानगी न मिळवता संचिका चढवणार नाही; कारण पुढे-मागे एखाद्या संचिकेच्या प्रताधिकार-उल्लंघनावरून तक्रार / खटलेबाजी उदभवली, तर चढवणार्‍या व्यक्तीवर भारतीय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
विकिपीडियावर प्रताधिकार हा मुद्दा मूलभूत तत्त्व म्हणून हाताळला जातो. यासंबंधी सविस्तर माहिती (इंग्लिश भाषेत) येथे उपलब्ध आहे. ती काळजीपूर्वक वाचल्यास, बहुसंख्य शंका निरसतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:१६, २३ जानेवारी २०१० (UTC)

संचिकांसंबधी

[संपादन]
तुम्ही मराठी विकिपीडियावर चढवलेले चित्र इंग्रजी हिंदी किंवा संस्कृत विकिपीडियात दिसणार नाही कारण प्रत्येक विकिस स्वतंत्र चित्रे साठवण्याची व्यवस्था आहे त्या प्रमाणेच इंग्रजी किंवा हिंदी विकिपीडियाची सुद्धा स्वतंत्र चित्र ठेवण्याची व्यवस्था आहे ती चित्रे मराठी विकिपीडियावर दिसण्याकरिता पुन्हा चढवावी लागतात.
हा प्रॉब्लेम कमीत कमी यावा याकरिता विकिमीडिया कॉमन्सची व्यवस्था आहे. विकिमीडिया कॉमन्सवरची चित्रे एकाच वेळी कोणत्याही किंवा सर्व विकिपीडियात दिसू शकते.
माहितगार ०५:४३, २२ जानेवारी २०१० (UTC)

इतर विकिवरून चित्रे घेतल्यावर ती दिसत नाहीत.त्यामूळे ती मराठी विकिवर download करून परत चढवावी लागतात. का?

प्रितीसंगम

[संपादन]
पानास नि:संदिग्धीकरण पानाची आवश्यकता ल़क्षात आल्यामूळे आपले काम चालू असताना मध्येच नाक खुपसले त्याबदल क्षमस्व. मी ऑनलाईन वृत्तातून माहिती घेऊन लावली आहे अप्रस्तूत आणि चूकीची माहिती वगळण्याहस काहीच हरकत नाही.प्रिती संगमच्या निमित्ताने कृष्णा नदी हा लेखही लिहून पूर्ण करता आलातर पहावा. मी मागे गोदावरी नदी लेखात योदगदान केलेले त्यात विस्तृत माहितीचा समावेश आहे. कृष्णे बद्दलचा लेख त्या मानाने खूपच मागे आहे.
मला माहित नाही म्हणून संदर्भ हवा चा साचा लावला . मला वृत्तपत्रातील फोटोतील माहिती वाचता आली.विशीष्ट संदर्भाची आवश्यकता नाही माहिती बरोबर असल्याशी मतलब
कराड वेगळे व सांगली मध्ये कर्‍हा नदिच्या काठी असणारे कर्‍हाड वेगळे हे माहित नव्हते माहिती बद्दल धन्यवाद.माहितगार ०६:४१, २३ जानेवारी २०१० (UTC)
वृत्तपत्रीय उपसंपादक डूलक्या घेत असतील :) पण त्यांना जागेकरण्याकरिता आपल्यासारखे कराडकर समर्थ आहेत त्या मूळे काळजी नसावी माहितगार ०७:००, २३ जानेवारी २०१० (UTC)
फक्त कराड शहरा संबधी माहिती कराड तालुका येथून कराड येथे स्वडीनुसार हलवल्यास वाचकांना बरे पडेल.माहितगार ०७:०३, २३ जानेवारी २०१० (UTC)

पुर्ननिर्देशन क्से काढावे ?

[संपादन]
अंबरनाथ तालुका लेख अंबरनाथ कडे पुर्ननिर्देशित झाला आहे. अंबरनाथ तालुका येथे टिचकी मारून अंबरनाथ येथे पोहोचल्या नंतर (अंबरनाथ तालुका या पानावरून पुनर्निर्देशित) अशी ओळ वाचावयास मिळेल त्यातील अंबरनाथ तालुका हा शब्द निळ्या अक्षरात दिसत असेल तीथे पुन्हा एकदा टिचकी मारा म्हणजे तुम्ही अंबरनाथ तालुका या पुर्निर्देशित झालेल्या मूळ पानावर पोहोचाल.
  • तीथे पोहोचल्या नंतर Redirect किंवा पुर्ननिर्देशन लिहिलेले आढळेल जो असेल तो शब्द वगळावा. पुर्ननिर्देशन किंवा स्थानांतरण रद्द होईल.
अर्ध्या मिनीटाचे काम सोपे आहे करून पहा , न जमल्यास आम्ही आहोच ०५:३८, २७ जानेवारी २०१० (UTC)

मला याबद्द्ल अंबरनाथ तालुकाअंबरनाथ हे दोन वेगळे लेख निर्माण करायचे आहेत.एक लेख तालुका तर दुसरा हा रेल्वे स्थानक .हे लेख एकमेकांत स्थानंतरीत केले आहेत्.त्यामुळे काही करता येत नाही .आपण मदत करा.

विनोद रकटे १६:१३, २६ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार

[संपादन]

नमस्कार विनोद,

व्य.नि. बद्दल धन्यवाद. वेळ मिळेल त्याप्रमाणे आपल्या ज्योती बसू या लेखात मी माझ्यापरिने नक्कीच भर टाकेन.

संभाजीराजे २०:१९, २८ जानेवारी २०१० (UTC)

गौरव

[संपादन]
अविरत संपादक पदक
जानेवारी, २०१० महिन्यात मराठी विकिपीडियावर १,००० पेक्षा जास्त संपादने केल्याबद्दल.



साचा:मुंबई महानगर क्षेत्र हा मार्गक्रमण साचा बनवल्याबद्दल धन्यवाद! छान काम केलेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३७, ५ फेब्रुवारी २०१० (UTC)
ता. क.: साचा:महानगर क्षेत्र विस्तार साचा बनवण्यात बहुधा चूक झाली आहे. हा साचा कुठे वापरल्याचेही दिसत नाही. हा साचा बदलावा की हटवावा, याबद्दल आपले मत जरूर कळवावे.

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख

[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

वर्ग:साम्राज्ये (वर्ग:साम्राज्य नव्हे)

[संपादन]

नमस्कार! विकिपीडियावर वर्गांची नावे सहसा॑ अनेकवचनी ठेवतात; कारण एका सामायिक गुणधर्माच्या लेखांचा समुच्चय एका वर्गात असतो (उदा.: मराठा साम्राज्य, रोमन साम्राज्य, चिनी साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य या नावाचे बिल्ले एकत्रपणे एका डब्यात ठेवले, तर त्या डब्याला 'साम्राज्य' असे एकवचनी नावाचे लेबल चिकटवणे योग्य नव्हे; त्याऐवजी समुच्चयदर्शक असे 'साम्राज्ये' हे अनेकवचनी लेबल चिकटवणे उचित ठरते.). त्यानुसार मी सर्व लेख 'वर्ग:साम्राज्ये' या लेखात अंतर्भूत केले होते व 'वर्ग:साम्राज्य' हा लेख वगळला होता. तुम्ही संक्षिप्त सूची या मुखपृष्ठावरील चौकटीत पाहिलेला दुवा मी आज दुरुस्त केला आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:२६, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)


आभारी आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०६:३६, २४ फेब्रुवारी २०१० (UTC)

राष्ट्रभाषा

[संपादन]

होय नक्कीच ह्या लेखाचे पुनःर्लेखन होणे आवश्यक आहे आधीचा लेख संपूर्णपणे काढून तो पुन्हा लिहीण्यात यावा.त्याबाबतीत जो कोणी त्यात जाणकार असेल त्याची मदत घ्यावी.जमल्यास मी देखील खारीचा वाटा उचलेन.क.लो.अ. Prasannakumar ०६:३६, १४ मार्च २०१० (UTC)

वनस्पतींविषयी

[संपादन]

आपणांस वनस्पती विषयांत अधिक रूची असल्याने आपणांस एक पुस्तक सूचवावेसे वाटले कदाचीत ते तूम्हास ठाऊक असेलही परंतु तरी देखील इथे मुद्दाम नमुद करावेसे वाटले ,पुस्तकाचे नाव आहे "वनस्पती बाड" (मराठीत आहे)खूपचा छान पुस्तक आहे, जवळपास सर्वच वनस्पती- झाडांची माहिती त्यात इत्यंभूत दिलेली आहे ते जर आपणास मिळाले तर लिखाणास अधिक विषय मिळतील.लेखकाचे नाव नक्की आठवत नाही पण पुस्तक माझ्या पहाण्यात आल्याचे निश्चीत आठवते.Prasannakumar ०६:४५, १४ मार्च २०१० (UTC)


सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


कोट/दूर्ग / किल्ले

[संपादन]

ह्या संबंधातील लेखात अधिक माहिती लवकरच भरली जाईल.सध्या फक्त लेख निर्माण करुन ठेवले आहेत.Prasannakumar ११:४३, १४ मार्च २०१० (UTC)

राष्ट्रभाषा लेखासंदर्भात

[संपादन]

आपणास मागेच माझे मत कळविले होते त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही लेख अजूनही त्याच अवस्थेत आहे व वेगळ्या पद्धतीने मांडला जात आहे कृपया आपले काय मत आहे आणि योग्य ती कृती करावी.तत्पूर्वी चर्चा विभागात काही सूचना देत आहे त्याविषयी देखील आपल्याकडून प्रतिसाद हवा आहे.क.लो.अ.Prasannakumar ११:२१, १५ मार्च २०१० (UTC)

धन्यवाद

[संपादन]

झक्कास मस्तच,धन्यवाद योग्य असाच बदल करण्यात आला आहे.

>>नमस्कार आपण खूप दिवसानी विकीवर दिसलात.बरं वाटलं.

धन्यवाद राकटे साहेब! -विसोबा खेचर ऊर्फ तात्या.

धन्यवाद

[संपादन]

वीजेचे भारनियमन या लेखास दुवे जोडल्याबद्दल धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:२५, २७ एप्रिल २०१० (UTC)

संत महिपती

[संपादन]

विनोद जी संत महिपती यांची संचिका पाहिली. धन्यवाद. त्यांचे मुळ चित्र मिळवण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यांच्या हस्ताक्षरातील पोथी सुद्धा मिळाल्यास त्यांचे अक्षर व मुळ चित्र जरूर पाठविल. आपल्या सहकार्या बद्धल हार्दिक आभार. --विप्र ०७:४४, २९ एप्रिल २०१० (UTC)

आडनावांवरील लेखांमधील प्रसिद्ध व्यक्तींची यादी

[संपादन]

नमस्कार विनोद!

आपण आडनावांवरील काही लेखांमध्ये केलेल्या संपादनांवरून एक गोष्ट ध्यानात आली, म्हणून एक सूचना नोंदवायची आहे : आडनावांवरील लेखांमध्ये 'प्रसिद्ध व्यक्ती' विभागातील यादीत नावे लिहिताना ती देवनागरी वर्नक्रमानुसार (अकारविल्हे - क, ख, ग, घ इत्यादी. थोडक्यात मराठी शब्दकोशातील क्रमानुसार) नोंदवावीत. उदाहरण द्यायचे झाल्यास देसाई लेखात 'कादंबरी देसाई' हे नाव 'नितीन देसाई' या नावाअगोदर येईल.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:२७, ९ मे २०१० (UTC)

नमस्कार! उदयोन्मुख लेख सदर गेले काही आठवडे बदलता आले नाही; त्याबद्दल क्षमस्व. सध्या नोकरीतील अतिकामामुळे पुरेसा वेळ मिळत नाही. परंतु या भागाची पाइपलाइन लावून ठेवेन; जेणेकरून सदर चालू राहील.
साच्यावर काम करायला मात्र या वीकेंडाशिवाय वेळ मिळेल असे दिसत नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२७, ११ मे २०१० (UTC)

साचा

[संपादन]

साचा क्षेत्र माझ्या आवाक्याबाहेर आहे. माफ करा. त्यात मी काहीच मदत करु शकत नाही.आपण कृपया माहितगार वा मैहुंडॉन यांचेशी संपर्क साधावा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०६:२४, ११ मे २०१० (UTC)

नमस्कार

[संपादन]

काही नाही. बरेच दिवसांनी दिसलात म्हणुन फक्त नमस्कारासाठीच हा प्रपंच.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३०, १९ जुलै २०१० (UTC)

Mumbai Wikipedia Meetup

[संपादन]

Wikipedia:Meetup/Mumbai

माहितगार ०८:३५, २७ नोव्हेंबर २०१० (UTC)

मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा

[संपादन]
मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत आपण मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्‍या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्‍या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
en:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी,प्रबोध,मनोज आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

नवीन संदेश

[संपादन]

माहितगार १५:००, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

विकी संमेलन

[संपादन]

विनोद नमस्कार,

आपणास विकी संमेलना बाबत मदत हवी असल्यास अभय नातू काहीच करू शकणार नाही. हा माणूस मुंबई, महाराष्ट्र तर सोडा भारतात सुद्द्धा नाही. हो त्याला फक्त उंटावरून शेळ्या चागल्या हाकलता येतात. विकी संमेलना बाबत त्याचे विकीवर फक्त एकच पोस्टिग दिसते तेही निगेटिव ह्यावरून त्याच्यातील विग्घ्न सातोशी भावनेची कल्पना यावी, आणि उद्या मराठी स्थानिकांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटायला हा सर्वात पुढे राहणार. तुम्ही मंदार कुलकर्णी ह्याची मदत घेऊन पाहावे त्यांच्या वृत्तपत्रातील मुलाखातींवरून ते विकी संमेलन समितीशी संबधित असल्याचे जाणवते. - मी राजाराम बोलतोय

विकी संमेलन

[संपादन]

नमस्कार विनोद,

मी विकिसंमेलनाशी थेट निगडीत नाही. मंदार कुलकर्णी, राहुल देशमुख किंवा माहितगार तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतील. ऑफलाइन मंडळींमध्ये सुधन्वा जोगळेकर, अश्विन बैंदुर हे या कामात मग्न आहेत.

अभय नातू २०:५६, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

ता.क. विकिसंमेलनात तुमच्यासारखी अनुभवी आणि सुज्ञ मंडळी भाग घेत आहेत हे कळल्यावर बरे वाटले. तुम्हाला माहिती असेलच की गेल्या काही आठवड्यात मुख्य संमेलन आयोजकांनी मराठी विकिपीडियाला फाटा देण्याचा घाट घातलेला होता. मंदार, सुधन्वा, अश्विन यांच्या प्रयत्नांनी आपल्याला एक ट्रॅक मिळालेला आहे. तेथे तुम्ही उपस्थित रहाल अशी आशा आहे.

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१८, १ जानेवारी २०१२ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

[संपादन]

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०४, ११ जून २०१२ (IST)[reply]

आपले मत कळवावे

[संपादन]

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.

Mrwiki reforms (चर्चा) ००:४८, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

Article requests for the Marathi Wikipedia

[संपादन]

Hi! Do you do article requests for the Marathi Wikipedia? There is an article I would like to see in Marathi.

Thank you WhisperToMe (चर्चा) १२:२९, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा

[संपादन]

नमस्कार Vinod rakte,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Vinod rakte,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

File to Commons

[संपादन]

Dear Vinod. Would it be possible for you to upload the attached file to Commons [१], so that it can be used in other Wikipedias as well? I would like to used it on the Karad Caves article in English Wikipedia [२]. Thank you!! पाटलिपुत्र (चर्चा) १४:५९, २ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

I will do whenever I will get time. विनोद रकटे २१:२३, ८ ऑक्टोबर २०२१ (IST)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.